अक्षरशः कोरोना काळात या पुस्तकाने एक सुंदर अशी आत्मशांती दिलीये.लहान मुलांचे निरागस भावविश्व सर्वांनाच आवडते.त्यांच्या असंबंध बडबडीने आपला वेळ फुलपाखारांसारखा रंगेबेरंगी होतो.
अशा चिमुकल्यांना मात्र शाळा नावाचे दुसरे घर असेच मोकळे पाहिजे तर ती खऱ्या अर्थाने रुजतील. त्यांचा स्वाभाविकता जपायचे कठीण काम असते ,ते त्यांच्या शिक्षकांचे...
त्तोत्तोचान या पुस्तकाच्या मुळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी(मराठी अनुवाद-चेतना सरदेशमुख गोसावी) .
या जपानच्या शाळेतून काढलेली मुलगी ते प्रसिद्ध दूरदर्शन कलाकार हा प्रवास ‘तोमोई’ या त्यांच्या दोन वर्षाच्या शाळेतील शिकवणुकीमुळे कसा होता हे मांडले आहे.जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काही वर्षे आधी ‘तोमोई’नावाची मुक्त शाळा कोबायाशी या हरहुन्नरी आणि संवेदनशील शिक्षकाने फुलविली असते.
“सगळे मुले स्वभावात: चांगली असतात,पण आजूबाजूच्या वातावरणाच्या दुष्प्रभावाने बिघडू शकतात आणि हे होऊ नये ह्या चांगुलपणा ची रुजवात करून ती वाढीला लावण्याच म्हणजे मुले मोठी होताना त्यांची वैयक्तीकता टिकून रहावी.”
यासाठी निसर्गाशी सांगड घालत निर्माण केलेली ‘तोमोई’ ही शाळा!
तोत्तोला सतत नवनवीन जाणून घेण्याची इच्छा असते.त्यामुळे ती सतत उद्योगी असते.या उद्योगांना कंटाळून पारंपारिक शाळा तिला काढून टाकते(जे तिला मोठे झाल्यावर कळते).तोत्तोचे आईवडील दोघेही पुढे काय या विचारात असताना ,’तोमोई’ या आगळ्या शाळेत तोत्तोला घालतात.नवीन शाळेचे वर्ग चक्क आगगाडीच्या बंद डब्यात भरत असतात.तेथे कोणतेही वेळाप्रतक नसत ,मुलांच्या आवडीप्रमाणे विषय शिकवले जात.मुलांनी डब्यात काय आणावे यासाठीचा नियमही मजेशीर “समुद्रातील काहीतरी,डोंगरावरचे काहीतरी”,म्हणजे समतोल आहाराचे महत्व समजावले जात.संगीत कवायत ,गरम झर्याची सहल,पहिले नाटक,शेतीचे शिक्षण ,रानातला स्वयंपाक ,इंग्रजी बोलणारा मुलगा ,ग्रंथालयाचा डब्बा ,क्रीडादिन ,धीटपनाची परीक्षा हे भाग वाचताना ,तोमोई मधील अवघे ५०विद्यार्थी किती भरभरून शिकली असतील हे दिसते.
तोत्तो हि धडपडणारी मुलगी प्रत्येक गोष्टीचा शोध लावताना ती पडतेच,आणि पुन्हा असे करणार नाही म्हणत पुन्हा एकदा धडपडते हे ‘उडी मारण्यापूर्वी पहा” वाचतांना खूप हसू येते.
रिबीन ,वेण्या,तू खरोखरीच चांगली मुलगी आहेस,जखमी जवानांशी भेट,नवरी,आरोग्य साल ,मला हेच हवय,यासुकीचान देवाघरी गेला,रॉकी नाहीसा होतो हे भाग वाचाताना तोत्तो जेवढी गोंधळी तेवढीच शांत गोष्टी समजावून घेणारी शांत मुलगी आहे हे लक्षात येते.
दृष्ट लागावी अशी तोमोई आणि तोत्तोचान यांच्या सहवासाला युद्धाचे संकट गिळून घेते आणि शाळा जाळून बेचिराख होते.
“पुढची शाळा कुढल्या प्रकारे बांधू या रे “ कोबायाशी यांचे हे वाक्य शिक्षणाबद्दलाचे अतोनात प्रेम व इच्छाशक्ती दर्शवते.
तोत्तोचान मात्र कोबायाशी यांना दिलेले तोमोईसाठी शिक्षिका होण्याचे वचन पूर्ण न करू शकल्याने त्यांच्याविषयी पुस्तक लिहून एक श्रद्धा देण्याचे ठरवते.या पुस्तकाची दखल जागतिक होऊन त्यांची युनिसेफचा सद्भावना दूत अशी निवड करण्यात येते.
तशी अनेक वाक्य ,सरळ सोप्पे लिखाण मन वेधत राहते ,पण काही उत्तमच..
-मुलांना त्यांच्या स्वभावानुसार वाडू डे .त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नाहूनही विशाल आहेत.ती पायदळी तुडवू नका.
-एखादा जर त्याच्या मुळापासून तुटला असेल म्हणजेच अधांतरी आयुष्य जगात असेल तर त्याला ‘तो खिडकीशी उभा आहे .असे म्हणा
-जोर लगाके हैय्य्या कामगार एका सुरात गात होते आणि त्याच तालावर सूर्यही हळूहळू वर येत होता.
-डोळे असतात पण सौंदर्यदृष्टी नसते,कान असतात पण सन्गीत ऐकलेलं नसत,मन असत पण सत्याच भान नसत,हृदय असत पण जगातली दु:ख तिथवर पोचत नाहीत.या गोष्टींची भीती वाटली पाहिजे ;कारण त्या माणसाला माणूसपणापासून दूर नेतात.
---भक्ती
वाचने
7569
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते पुस्तक सुंदरच आहे.
छान लिहिलंय.
वा !
बहुदा पुढारी किंवा लोकमत निट
:)
In reply to बहुदा पुढारी किंवा लोकमत निट by भीमराव
मस्त पुस्तक आहे हे
हे पुस्तक १५० पेक्षा जास्त
वाह! मस्तच वाटलं वाचून :)
In reply to हे पुस्तक १५० पेक्षा जास्त by विजुभाऊ
माझे सर्वात आवडते पुस्तक आहे
अजून अशी निरागस पुस्तके सुचवा.. :)
खुप संदर पुस्तक परिचय
खूप छान लिहिले आहे.
खुप छान पुस्तक ओळख . अशीच
चुक आणि गेक
In reply to खुप छान पुस्तक ओळख . अशीच by सिरुसेरि
सर्वांचे धन्यवाद
"वाचेन" ..... वाचेल नाही हो
In reply to सर्वांचे धन्यवाद by Bhakti
हसावे रडावे स्मायली..
In reply to "वाचेन" ..... वाचेल नाही हो by विजुभाऊ
संदर पुस्तक परिचय.