लेखनप्रकार
कुणी काही माहिती सांगायला लागलं कि "लिंक दे"
कुणी काही मत मांडले रे मांडले कि "लिंक दे"
एखादा विचार मांडायला लागलं, कि (त्याच्या पुष्ट्यर्थ) "लिंक दे"
ह्यात ज्ञानोपासनेचा भाग असेलही बापडा !! पण मला पुष्कळ वेळा ऐकू येते ते असे
"तुला काही नवीन मुद्दा सापडलाय का , त्याला पुष्ट्यर्थ काही लिंक नसेल तर तू , तुझं बोलणं आणि तुझा मुद्दा व्यर्थ ..."
किंवा मग
"तु कुणाला काही उद्धृत करू पाहतोयस का ? मग तुझी वायफळ बडबड बंद कर आणि ज्याने कुणी ते मुळात काय म्हटलं आहे ते साल्या तू कुठून वाचलं ते आधी सांग. मी माझं स्वतंत्र बघून माझं मत मी बनवीन. मुळात त्या निमित्ताने तू कोणकोणत्या सोर्सेस कडून माहिती घेतोस त्यावर तुझी प्रतवारी ठरवीन. त्या नंतर त्या सोर्सेस मधल्या माहितीच्या दुर्बोधते वर त्याची अधिकृतता ठरविन ...जमलं तर त्या सोर्सेस कडून त्यांच्या माहितीच्या #लिंका मागवीन काहीही करिन."
किंवा मग
समजा ती लिंक नासा किंवा लॅन्सेट वगैरे शी संबंधित असेल तर "तुला लेका नासा वगैरे च्या लिंका काय समजणार, दे ती लिंक मला. मी ती लिंक रुपी भगवद्गीता वाचून तुला त्यावरचे माझे प्रतिपादन ज्ञानेश्वरी सारखे समजावून देईन.....आन ती लिंक"
किंवा मग
"छ्या दाराशा ला लेफ्ट हॅन्ड चा अड्वन्टेज आहे ...किंवा मग मिस मोहनींनी सर्व्हिस सुधारायला हवी टाईप..लखू गिरी करायला आपण मोकळे"
खरे सांगतो मंडळी मला ह्या ज्ञानोपासनेचा इतका धसका बसलाय कि बस ....अहो डॉक्टरांनी दिलेलं औषध दिवसात ३ वेळा घ्या म्हटलं कि निमूट घेणारी आमची सवय...पण हि लोक म्हणजे " हे काय? झिकतोमायसिन दिलंय ?? त्यापेक्षा फुकंटोमायसिन द्यायला हवे वगैरे उद्गार काढून तसे साक्षात त्या डॉक्टरांनाही सुचवतात. हल्ली शिल्लक नाहीत फारसे, पण त्या कम्पाउंडर्स इतकी सुद्धा माहिती नसते ह्यांना पण "जेहेंत्ते काळाचे ठायी .....द्या ठोकून तिज्यायला !!!"
*ह्याचाच अजून एक चुलत प्रकार म्हणजे "दे रेसिपी"*
अरे आज आमच्याकडे थालीपीठ मस्त झालं होतं म्हणायचं अवकाश "दे रेसिपी"
आमच्या इथल्या हॉटेलात फलाने कोफ्ते मस्त मिळतात असं कुणी सांगायला लागलं रे लागलं कि लगेच *"शोध रेसिपी"*
म्हणजे ह्यांचे म्हणणे चालले असते तर भीमसेन जोशींना भर मैफिलीत सांगितले असते "बुवा अहो तोडीत षड्ज ऋषभ मींड जिथून शिकलात ती जरा लिंक द्या बघू !!, आणि ते XXXX त्यात गंधाराचा कण जसे आणतात तसे अजून जमत नाही तुम्हाला" कदाचित ते नेमके कसे करायचे हे गाऊन सुद्धा दाखवले असते ....
च्यामारी रोज आमटीभात आणि भाजीपोळी खाणारी लोक आपण ...उगीच त्या चिकन कोकोवीं (असला उच्चार असणाऱ्या ) पदार्थाच्या रेसिपीज जाणून काय करतो ?? रेसिपी सोडा त्यातील घटक पदार्थ आपण ऐकलेले सुद्धा नसतात, वापरणं तर दूर ...पण नाही ...दे रेसिपी
एक साधी पुरण पोळी...आईची चव वेगळी, हिच्या हातची चव वेगळी माझी काकू करते त्या लुसलुशीत त्याची चव वेगळी....च्यायला ती चव घेऊन तृप्त व्हायचं का त्याच्या "दे दे लिंक दे , रेसिपी दे प्रूफ दे रे " म्हंणत गायला लागायचं ??
मी किती ऑर्गनाईझ्ड , मी किती सव्यसाची , मी किती ज्ञानार्थी , मी किती कलासक्त, मी किती सिस्टिमॅटिक मी किती सायंटिफिक अप्रोच वाला, मी कसा तत्वनिष्ठ , मी कसा सर्वंकष समृद्ध जीवनाचा पांथस्थ ह्या अभिनिवेशा पुढे सहज सोपं वागायचं बंद झालंय का
इंटरनेट आणि गुगल शपथ खरे सांगतो, मी भेदरून गेलोय हो ह्या लोकांमुळे
मिसळपाव
:)
"दे रेसिपी"चाच अजून एक दूरचा
तुमच्या म्हणण्याला काही आधार?
लाखमोलाचा प्रश्न आहे ...
In reply to लाखमोलाचा प्रश्न आहे ... by मूकवाचक
काहीवेळा जेव्हा तरुण वयात
In reply to लाखमोलाचा प्रश्न आहे ... by मूकवाचक
मार्मिक
In reply to लाखमोलाचा प्रश्न आहे ... by मूकवाचक
अगदी अगदी
In reply to लाखमोलाचा प्रश्न आहे ... by मूकवाचक
मूकवाचक
मस्त लेख !
In reply to मस्त लेख ! by चौथा कोनाडा
व्वा, चौ को,
मस्त लेख !
छान लेख
अगदी विकीमध्येही "लिंकांचे महत्त्व"
लिंक मागण्यात मला काही गैर वाटत नाही.
झक्कास लेख
मस्त लिहिलंय
सोपा उपाय ..
In reply to सोपा उपाय .. by चौकटराजा
वाईट काहीच नाही
मजेशीर लेख . लखुगिरी करणे
वडील भाऊ
मी कसा सर्वंकष समृद्ध जीवनाचा
In reply to मी कसा सर्वंकष समृद्ध जीवनाचा by सुबोध खरे
अजूनही
In reply to अजूनही by उन्मेष दिक्षीत
खरे आहे.
In reply to अजूनही by उन्मेष दिक्षीत
काही शंका...
याचाच अजून एक चुलतभाऊ
In reply to याचाच अजून एक चुलतभाऊ by उपयोजक
याचाच अजून एक सावत्रभाऊ
In reply to याचाच अजून एक चुलतभाऊ by उपयोजक
+ १
In reply to याचाच अजून एक चुलतभाऊ by उपयोजक
असेल हिंमत तर अडवा!
In reply to असेल हिंमत तर अडवा! by उपयोजक
बरोबर आहे अरबी समुद्रातली मिठाची पातळी
शा वि कु
लिंक मागण्यात किंवा संदर्भ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkar