Skip to main content

मुक्तक

माझ्याच त-हा

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 19/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच त-हा =========================== . . सांभाळलेला गारवा.. सांभाळलेला झरा.. अन तो सांभाळलेला कवडसा.. नाहीच मुळी मजहून वेगळा. . मीच गारवा मीच झरा. ऊन कवडसे माझ्याच त-हा!! अवखळ वेल्हाळ धबधबा लागला आता सपाटीला. . खंडी खंडी गाळतळा माझ्याच मी दाबला. एक प्रवाह अन किती धारा.. ओळखेना माझॆ मला!! . तो पहिला वेगळा माझा थेंब कोणता?...... . . ========================== स्वाती फडणीस...................... २००७

(विचारणा)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 19/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती ताइंची संवेदना!! वाचुन नको त्या संवेदना!! जाग्रुत झाल्या. आणी पडले विडंबन लाल भडक तर्रीवाली तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी? ती ज्वालामुखी नंतरच्या लाव्हारसा सारखीच दिसते.. लाल! तिखट रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी.. जिभेचे चोचले पुरवणारी.. तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त! त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे सात्विक बुळबुळीतपणच वाईट..! सोसत नसुनही खाल्ल्यावर वारंवार लागते ना घाई.. ही तर फक्त संपलेली... आतडी.. ! गळून जाणारी. गळेलच..!!! मग पुन्हा होइल..
Taxonomy upgrade extras

संवेदना!!

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 19/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
संवेदना!! =================================== शुष्क.. निबर काळी.. बोथट खपली.. बघितली आहेस कधी? ती ज्वालामुखी नंतरच्या मुरमाड जमिनी सारखीच दिसते.. राठ! जखमेचा रसरसता लाल रंग लपवणारी.. जागच्या जागी गोठलेली.. तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त! त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे निःसत्व दगडपणच वाईट..! कातळी लाव्ह्याच्या प्रस्थरांवरही फुटते ना पालवी.. ही तर फक्त खपलेली... कातडी.. ! गळून जाणारी. गळेलच..!!! मग पुन्हा हसेल.. संवेदना!! मिरवेल वीरश्री!!!.. =================================== स्वाती फडणीस..... ०३-१२-२००८
Taxonomy upgrade extras

यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... भाग २

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 18/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी आता आम्ही आमच्या लेखाचा दुसरा भाग मोठ्ठ्या आनंदाने, उत्साहात आणि नेहमीच्याच जोशात प्रसिद्ध करत आहोत. पण पहिला पार्ट कुठे आहे असे विचारुन आम्हाला अडचणीत नका आणु. पहिला भाग तुम्हाला " यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... " येथे पहायला मिळेल. ह्याच लेखाला तुम्ही पर्यायाने टारुबाबाच्या "अवांतर प्रतिसादांवर उपाय ह्याचाही "भाग-२" म्हणु शकता. असो.

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 08/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे.

पाळणा हलला!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 07/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
`वर्षा' बंगल्यावर मोठी लगबग सुरू होती. सगळ्या बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली होती. उत्साह ओसंडून वाहत होता. घरात चार वर्षांनी पाळणा हलला होता. बारशाचा कार्यक्रम अगदी झोकात, थाटामाटात होणार होता. सगळे नातेवाईक, पाव्हणेरावळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले आप्तजन जमले होते. दिल्लीच्या विशेष पाहुण्यांना खास आमंत्रण होते. सगळे जण गटागटाने उभे होते. पहिला मान आपल्यालाच मिळावा, असा प्रत्येकाचा हट्ट होता. बंगल्याचे सध्याचे मालक आले. आता ते घर सोडून जाणार होते. त्यामुळे पाळण्याला पहिला झोका देण्याचा मान त्यांचा होता. त्यांनी तो पार पाडला आणि ते बाजूला झाले.

अरे पुन्हा आयुष्याच्या..

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 05/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अरूण शौरी इंडियन एक्स्प्रेस मध्ये आपल्या पश्चिम समुद्रकिनार्‍याविषयी लिहितातः Surprised?. आणि टाइम्स मधली ही बातमी आपल्या पूर्व किनार्‍याविषयी.
Taxonomy upgrade extras

असेच काहीतरी

लेखक चेतन यांनी मंगळवार, 02/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
एक असाच काहीतरी अस्पष्ट विचार बरेच दिवस मनात चालला होता आज तो लिहुन काढला एव्हढच् तुझी आठवण सांजवेळी, मन माझे कातर करते | हुदयातुन पुढे सरकत, वेळीअवेळी डोळ्यात दाटते || पोटपाण्याच्या नित्यक्रमात, काही तास निघुनही जातात | कामाच्या गडबडगोंधळात, काहि आठवणी विझुन जातात || दुपारच्या गडबडी नंतर, संथ झुलत संध्याकाळ येते | परत एकदा स्म्रुती जागवुन, भावनांच्या म्रुगजळात नेते || पुन्हा मन पेटुन उठतं, समंधालाही उधाण येतं | चंद्र येतो सोबतिला अन्, झुळुक वार्‍याची मंद वाहते || या मंद वार्‍याबरोबर, आठवणीही कुंद होतात | मला एकटाल्याच सोडुन, कुठल्याकुठे वाहुन जातात || थोडे दिवस पुन्हा
Taxonomy upgrade extras

गोंधळ

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 29/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
होतोय गोंधळ.. नक्की होतोय गोंधळ! कुणाचा? कुणा कुणाचा? माझा! नक्कीच होतोय गोंधळ!! समोरून अनोळखी येताच मी आतून भेदरतो, तोंडदेखलं हसतो अंदाज घेतो लपवलेल्या बंदुकीने हा घालणार तर नाहि ना गोंधळ!! समोरून ओळखीचा येताच मी वरून सावरतो, आतून बावरतो अंदाज घेतो याच्याकडच्या एखाद्या बातमीने उडणार नाहि ना गोंधळ!! समोरच ते बाळ आतून बाहेरून कीती निश्चिंत आहे घरातून आक्रोश याच्या बालपणातच उडाला नसु दे रे देवा एक भयंकर गोंधळ!! कालच बघितलं होतं तिला झाडाच्या पाठी त्याच्याबरोबर त्याला डोळ्यांतून वेधणारी ती आज शोधतेय जमवतेय आपल्याच हृदयाचे तुकडे, ज्यात मावत नाहिये गोंधळ! तो बघा .... "तरी सांगत होते..

(काही कविता का प्रश्न ?)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 28/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
रामदास भाउंच्या 'काही कविता' वाचल्यापासून मनात होतं की याच्या एक दशांश जरी काही लिहू शकलो तरी चिक्कार आहे. नंतर मग या कवितांवर चतुरंगांची चॉफेर टोलेबाजी आली. आज दोन दिवस बातम्या आणि मिपावरील चर्चा वाचून डोक सुन्न झालं होतं. मनात आलं काहीतरी लिहावं आणि हे लिहलं.
Taxonomy upgrade extras