Skip to main content

मुक्तक

डुक्करताप, मी अन घबराट

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 16/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यातल्या एका सुरम्य पहाटे (असे आपले म्हणायचे असते बरं का!) मी छान झोपलो होतो अन सगळे जग गदागदा हलत असावे तशी जाणीव झाली. आयला! काय भुकंप झालाय का? असा विचार अर्धवट झोपेत करेतो मोठमोठे आवाज कानात घुमायला सुरुवात झाली. काही सेकंदातच आवाजाची ओळख पटली अन तिकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडु शकेल हे ही कळले. आवाज होता बायकोचा. अरे उठ! असा गजर करत ती मला गदागदा हलवत होती. डोळे उघडुन भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर फक्त साडेसहा वाजले होते. "काय आहे! जरा झोपु दे की," मी कुरकुरलो अन धडाम-धुडुम तोफखाना सुरु झाला. "इकडे मुलाच्या शाळेत स्वाईन फ्ल्यु आलाय अन म्हणे झोपु दे.

`आयडिया'ची कल्पना

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबैतल्या शाळा सात दिवस बंद ठेवायचा निर्णय उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी घेऊन टाकल्याने महापालिकेचे आयुक्त जयराज फाटक यांची स्थिती केविलवाणी झालीय. एवढी चांगली `आयडिया' प्रत्यक्षात आणून `लोकशाही' (डेमोक्रसी) कशाला म्हणतात, ते दाखवूने द्यायच्या श्रेयाचे पहिले मानकरी ठरण्याचे त्यांचे स्वप्न भुजबळांनी पार धुळीला मिळवले. लोकशाहीत जनमताला किती किंमत असते, याचा एक वस्तुपाठ फाटकांनी घालून दिला असता, तर ती प्रथा पुढे घातक ठरू शकते, अशी भीती कदाचित भुजबळांना वाटली असेल... (शाळा बंद करायच्या की सुरू ठेवायच्या, हे लोकांना विचारायचे?

मी आणि माझा फोन

लेखक अनामिक यांनी गुरुवार, 13/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अबे अभितक तु यही फोन युज कर रहा है, अब तो बदल ले... - एक मित्र जरूरत क्या है? - मी आज कल तो कितने सही सही मॉडेल्स मिलते है... कबतक वही डिब्बा युज करेगा... - एक मैत्रिण वो सब ठिक है, पर मेरे लिये यही ठिक है. और ऑफिसका सेलभी है मेरे पास. - परत मी पर वो भी तो डिब्बाही है.. तु आय फोन, या एल जी व्ह्यु क्यों नही लेता... या फिर ब्लॅकबेरी तो ले ही ले... - दुसरा मित्र कितनी कंजुसी करेगा... नही तो हम सब काँट्री करके तुझे सेलफोन गिफ्ट करते है... - मित्रांपैकीच कुणीतरी अरे लेकीन फोन किसलिये होता है? बात करनेके लिये ना? मेरा डिब्बा वो काम कर लेता है... मुझे नये फोन की जरूरत नही लगती....

हे सारे कोठून येते?

लेखक नंदन यांनी शुक्रवार, 07/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच वाचलेल्या दोन बातम्या. एक टांझानियात अल्बिनोंवर होत असलेल्या अत्याचारांची (अल्बिनो म्हणजे मेलॅनिनच्या अभावामुळे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर सफेद कोड उठल्यासारखे वाटण्याची स्थिती) आणि दुसरी सातारा जिल्ह्यात सुखेड आणि बोरी गावच्या महिलांत दरवर्षी नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी भरणार्‍या शिवीगाळीच्या सामन्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या विरोधाची. . . . आपल्या ज्या काही म्हणून मूलभूत भावना आहेत - आनंद, दु:ख, द्वेष इ.; त्यांची बीजं उत्क्रांतीमध्येच आपल्यात रोवली गेली असावीत.

काहीच्या काही...

लेखक विमुक्त यांनी गुरुवार, 06/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला पावसाळा... सुरु झाल्या शाळा... जपा तुमच्या बाळा... swine flu ला घालू आळा... आहे आजार हा काळा... परदेश्यां मुळं पडला आपल्या गळा... सारा देश सोसतोय त्याच्या झळा... रात्री पालकांचा लागत नाही डोळा... मंत्र्यांचा भाषणांचा सोहळा... नुसता शब्दांचा खुळखूळा... त्यांचा होवो चोळामोळा... NIV करेलच उपाय गोळा... खरंतर आला होता कंटाळा... तेवढ्यात दिसला कागदाचा बोळा... म्हणून सुचला हा चाळा... चांगलं काही असेल तर हे वाचणं टाळा...

डंकर्कचे विद्धविवेचन

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 06/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
इस्पिक राजा आणि किल्वर राणीचा सुकुमार धूम्रतरल सहवास बाहेर झिम्मड पाऊस नास्पतीची गळणारी पाने अन् मोक्याच्या क्षणी त्याची निरभ्र माघार न सोसणारं कदाचित अपेक्षांचं ओझं पण का व्हावी नेहमीच ही थुलथुलीत प्रतारणा? हे नातंच असं पोकळ रंग, गंध ना चव जणू हिंग उडालेली पोकळ बांधानी डबी मग फेकून द्याव्या सार्‍या सहवासखुणा अन् घेतले दिलेले मनातलेच अल्लड काहीबाही----------- ----------------------काहीबाही म्हणजे हेच--- -रुसवा फुगवा रुतला चावा
काव्यरस

राखी : देवस्थळी ते सावंत!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 05/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
rakhi राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते.