Skip to main content

मुक्तक

`बाल'हट्ट

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 30/09/2009 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
""बाबा, मला जादूचे प्रयोग बघायचेत.'' आमची "लाडली लक्ष्मी' हट्ट धरून बसली होती. मध्यंतरी टीव्हीवर "छोटा चेतन,', "भूतनाथ'वगैरे पाहिल्यापासून तिची ही इच्छा अधिकच चिघळली होती. त्यामुळे गणपतीच्या आधीपासून अशा संधीच्या शोधात होतो. गणपतीत-नवरात्रात बरेच ठिकाणी जादूच्या प्रयोगांची जाहिरात होती, पण वेळ जमण्यासारखी नव्हती. अशा सार्वजनिक प्रयोगांना जाण्याबद्दल वावडं नव्हतं, पण तिथली सोय आणि व्यवस्था यांविषयी शंका होत्याच. एवढं करून गर्दीतून प्रयोग नीट दिसला नाही, तर सगळंच मुसळ केरात, असं वाटलं होतं. त्यातच अचानक गेल्या गुरुवारी "सकाळ'मध्येच जादूगार संजय रघुवीर यांच्या प्रयोगांची जाहिरात वाचली.

ती ...

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 25/09/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एकदा, मला ती दिसली बरीचशी माझ्यासारखी ..... पण तरीही खूप वेगळी तिला विचारलं मी, कुठून आलीस? आणि आता कुठे चाललीस?

मी मी मी

लेखक प्रभो यांनी बुधवार, 23/09/2009 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार.....मस्त सुट्टीचा वार ..सकाळचे दहा-अकरावाजले होते. उनं उंडारायला चालू झाली होती. बेडरूमची खिडकी उघडीच राहिली होती बहुतेक काल रात्री. त्यातूनच उनाचे कवडसे मला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न करत होते. पडदाही फडफडत होता. हलकिशी हवा पडली होती. माझ्या कानाजवळचं गजराचं घड्याळही (तिच्यायचं ते घड्याळ...बारावी पास झलो नसतो तर ते पण नसतं मिळालं) टिक-टिक-टिक-टिक-टिक करून माझ्या साखरझोपेचं (सकाळी दहा-अकरा वाजता ????...आणी ही सकाळ होय???) खोबरं (ओलं का सुकं ..माहीत नाही बुआ) करण्याच्या प्रयत्नात होते. अचानक खनSSSSSन असा आवाज झाला. एका क्षणात झोप होत्याची नव्हती झाली.

पितर्स डे!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 18/09/2009 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
crow सक्काळी सक्काळी मिपा उघडल्यावर एका काळ्या कुळकुळीत, प्रसन्न, तुकतुकीत कांतीच्या आणि भक्ष्यावर एकटक नजर लावून बसलेल्या कावळ्याचं चित्र पाहून मन उल्हसित झालं. तात्यांच्या समयसूचकतेला उत्स्फूर्त दाद गेली. या "काका'त मला माझे (किंवा तात्यांचे!) पणजोबा, खापरपणजोबा, खापर-खापर पणजोबा वगैरे दिसू लागले.

अत्तर

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 18/09/2009 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
सरती संध्याकाळ, प्लॅट्फॉर्म नंबर चार, आंबलेली तनु, तीने लोटली खाली. निमुळता जीना. शोधक त्या नजरा, हातातली पिशवी, तीने छातीशी नेली. सुटे हाताचा आधार, टोचती अंगार, स्पर्शाची जाणीव, तीला सोडुनीया गेली. मनातला आक्रोश, कसा शरीराचा वापर, ऊपाशी गिधाडांना, तीने अन्नदान केले. उसवले शरीर, गेले लाजेचेही भाव, ऊचलुन पावले, ती बाहेरही आली. घरी येता मग, उभि पाण्याखाली न्हाली, त्वचेवरची विषे , तीने जाताना पाहिली. इतक्यात दरवळ, आला मोगर्‍याला बहर, जाणीवांचे द्वार, तीने ऊघडुन दीले. अनाम हुरहुर, झाली स्पर्शाला आतुर, अत्तराची कुपी, तीने जपुन आणली.

पूर्वाध - ऊत्तरार्ध

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 17/09/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : मला कविता, मुक्तक , विडंबन ही फक्त नावे माहीत आहेत. त्या कशाशी खातात मला माहीत नाही. तर त्यामुळे खालील लेख (????) सॉरी...कविता स्वतःच्या जबाबदारीवर वाचावी.
काव्यरस

अलिप्त

लेखक अजिंक्य यांनी मंगळवार, 15/09/2009 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
न देणे, न घेणे, फुकाचे न खाणे, कुणाच्या न वाटेत येणे मुळीही, बरे काम माझे, बरी वाट माझी, स्वत:च्याच विश्वात मश्गूल आम्ही ||१|| असे वाटले की लिहावे जरासे, लिहावे जरा, पाठवावे कुठेसे, तया सोडुनी या जगाच्या भरोसे, विचारात होऊ पुन्हा दंग आम्ही ||२|| कधी आवडावीत काव्ये कुणाची, दिसावी कधी झेप कोणा मनाची, जरी दाद देऊ तया ताकदीची, मनाच्या महाली असू गुंग आम्ही ||३|| न लाटात आम्ही, न वाळूत आम्ही, सदा एकटे सागराच्या किनारी, जसा सूर्य चाले सकाळी दुपारी, तसे राहतो या अलिप्तात आम्ही ||४||

चारोळ्या...

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 11/09/2009 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्ती कुंडीमुक्त लगेच जाहले कचरामुक्त कधी होणार? पदपथावरी अनंत वस्तू कुठल्या नियमाने हरणार? फुले काटे मजला गुलाब तिजला कितीक वर्षे असेल चाले आता अमुची मुलेच देती बाईंना शाळेत फुले॥ परी दिसलीस तू, हसलीस तू रूसलीस तू, रडलीस तू रागावलीस, फसलीस तू माझी परी झालीस तू॥ पट्टी मी पट्टीचा ठार आंधळा बांधून तू पट्टी डोळ्यावर पातिव्रत्याचे हे फळ का? जन्म दिला कौरवांस शंभर॥ संभ्रम झाडामागून बाण मारुनी वाली वधिला, कुठे पराक्रम? रघुकुलरित अशी का असते न्यायनीतीला पडला संभ्रम॥ सिंधू "एकच प्याला" मध

सर्व काही आत आहे

लेखक अजिंक्य यांनी मंगळवार, 08/09/2009 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
सहजसोपे भासते कविता प्रसवणे, गोषवारा माझिया डोक्यात आहे ||१|| असूदे भारी कितीही लेखणी ही, पेलण्याची शक्ति या हातात आहे ||२|| कल्पनाविश्वात करितो मी विहार, दौडण्याची शक्ति या पायात आहे ||३|| जे न देखे रवी तेही पाहतो मी, दूरवरची चमक या डोळ्यात आहे ||४|| अडचणी येती कितीही अन कशाही, सोसण्याची धमक या धमन्यांत आहे ||५|| पाहिली सृष्टीत या दुःखे कितीक, तरीही आनंद या हृदयात आहे ||६|| प्रश्न का बाहेरचे पडतात मजला, पाहिजे ते सर्व काही आत आहे ||७||

गोष्टी योगायोगाच्या

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/09/2009 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरीच्या दौऱ्याविषयी गेल्या वेळी लिहिलं होतं. याच प्रवासात आणखी एक गंमत घडली. "मोकळे' होण्यासाठी आम्ही मलकापूरच्या पुढे एका ठिकाणी सहज थांबलो. शेजारीच एक छोटा ओहोळ आणि त्यावर पूल होता. पलीकडे एक छोटीशी टपरी होती. अचानक हर्षदाला आठवलं, "अरे, रत्नागिरीच्या पहिल्या दौऱ्याच्या वेळी आपली एसटी इथेच बंद पडली होती!' मीदेखील आसपास पाहिलं आणि ओळखीच्या खुणा पटल्या. तीच छोटी टपरी, तोच सुनसान रस्ता आणि तेच वळण. लग्नानंतर पहिल्यांदा रत्नागिरीला गेलो, तेव्हाच्या प्रवासात आमची रात्रराणी बंद पडली होती तिथे. पहाटे चारचा सुमार असेल. अंधुकसं फटफटलं होतं. गाडी काही लवकर दुरुस्त होणार नव्हती.