मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परागंदा

मिसळभोक्ता · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(हे विडंबन नाही. पण प्रेरणा धन्याशेठची.) आज का आलो इथे ? थांबली पत्रे इथून माझ्या नावावर येणारी. पत्ता बदलवला तरी "फॉरवर्डींग इज नॉट डन टू अ‍ॅड्रेसेस बियाँड इंडिया" पोस्ट ऑफिसाने सांगितले वाटले होते, घर स्वच्छ केले, सगळे सामान 'शिप' केले. पण, अरेच्चा! आहे की बोचके इथे बांधून ठेवलेले. ह्या आतल्या खोलीत माझ्या आठवणीत पहिल्यांदा फट्का आईचा मी खाल्लेला पहिल्यांदा मैत्रिणीवर हात जरा इकडे तिकडे फिरला ;-) (त्या मस्तीत, दार उघडेच, भान कसे रहायचे, मला?) माता न तू वैरिणी म्हणालो होतो तेव्हा अर्थात, मनातल्या मनात. आज तिच्या स्टराईल बेडचा कोरेपणा, तसाच नव्या धुतल्याचा. हास्पिटलातल्या एसीत "थंडी वाजते रे" गोधड्या न्यायला आलो मळलेल्या, कुबट वासांच्या इंडिपेंडंट खोलीत विजेच्या कडकडाटाने घाबरलो होतो तेव्हा, हाच कुबट वास होता साथीला आता हाच वास माझ्या गतायुष्याची आठवण ह्या घराने कधीच सोडली माझी साथ. सरकार दरबारी नोंद असू दे कसलीही, पण माझे घरही, मला समजते परागंदा ? (ता. क. ही कविता लिहिताना "एनाराय" हे एकच शीर्षक डोळ्यापुढे आले होते. परंतु, एनाराय ह्या शब्दाला जी निगेटिव्हिटी आहे, त्यापेक्षा जास्त निगेटीव्हिटी मला अपेक्षित आहे, त्यामुळे कवितेचे शीर्षक आणि शेवटची ओळ बदलली आहे. धन्याशेटची कविता वाचताना, बा. भ. बोरकरांची "आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले, माझ्या परागंदा जीवा, आज माहेर लाभले" ही ओळ मनात घोळत असताना, ही कविता लिहिली. त्यामुळे चेंज ऑफ टायटल. पुन्हा एकदा, जियो धनंजय !)

वाचने 5029 वाचनखूण प्रतिक्रिया 33

टारझन 01/10/2009 - 09:53
व्वा !! काय स्पार्क आहे ... झबरदस्त !!
पहिल्यांदा मैत्रिणीवर हात जरा इकडे तिकडे फिरला
अगदी चित्र डोळ्यासमोर उभे केले भौ :) -(चित्र डोळ्यासमोर उभे करणारा ) टारझन उभे !

In reply to by टारझन

मिसळभोक्ता 01/10/2009 - 10:00
पूर्ण कवितेत हे एकच दिसले रे भोसडीच्या तुला ? द्याट्स इट ! आता मन्ना डेच्या सर्व गाण्यांचे भाषांतर कर ! सर्व म्हातार्‍यांचा शाप आहे तुला ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विंजिनेर 01/10/2009 - 10:03
मिपाकरांच्या जिव्हाळ्याच्या(!) विषयावर लेखन. ऑलटाईम फेवरिट थिम. स्वगतः एनराय झाला. नॉस्टालजिया झाला, नॉस्टलाजिक एनाराय आताच झाला. आता कुठलं बरं काँबिनेशन हिट होईल इथे? :?

In reply to by विंजिनेर

आता निवासी नॉस्टॅल्जिक. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

पाषाणभेद 01/10/2009 - 10:06
मस्तच. छान आठवणी कवटाळून ठेवल्यात घराच्या. मी पण एक सांगू का? सरकार दरबारी नोंद असू दे कसलीही, पण माझे घरही, मला आज म्हणते एनाराय "?" हा शेवटचे "?" काढून टाकले तर? किंवा "मला आज म्हणत असेल का एनाराय?" असे हवे असे मला वाटते. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

In reply to by पाषाणभेद

मिसळभोक्ता 01/10/2009 - 10:08
अजूनही डाऊट आहे राव.. म्हणून तो '?'. बाकी ठीक ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मिसळभोक्ता 01/10/2009 - 10:10
मी एनाराय असूनही 'आयटी'त नाही. त्यामुळे नैसर्गिकरीत्या मी हळवा नाही. पण हा साला धन्याशेट, आयटीत नसलेल्यांनाही हळवा बनवतो. (हा प्रतिसाद धन्याशेटला अर्पण.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मुक्तसुनीत 01/10/2009 - 10:11
आज वाचलेल्या एका दुसर्‍या उत्तम कवितेचा हा व्यत्यास आहे असे वाटले. (इथे व्यत्यास या शब्दाबद्दल विपर्यास नको. ) "किती कठीण आहे घराचे सुटणे" अशा अर्थाचे कायसेसे करंदीकर त्यांच्या परदेशमुक्कामी म्हणून गेले. प्रस्तुत कवितेत वर्षानुवर्षे काढलेले राहाते घर परके झालेले आहे. नवीन घरात आल्यानंतर , जुन्या घराला दिलेल्या भेटीत जाणवलेली अनोळख धनंजय मांडतात. या कवितेमधे अजून एक विशेष जाणवलेला मुद्दा. इथे भूतकाळातल्या स्मरणरंजनाला अकारण देदीप्यमान केले गेलेले नाही. ममत्व वाटणारी , "कालची" गोधडी कुबट होती आणि "आजचा" बेड स्टराईल - म्हणजे निर्जंतुक - आणि पर्यायाने कसलीही ऊब नसलेला आहे. इथे गतकाळाला ग्लोरिफाय न करता , आपल्या आयुष्याच्या जुन्या तुकड्याशी धागा फक्त जुळवला आहे. इतका निर्मम नॉस्टाल्जिया दुर्मिळ.

छान कविता. धन्याशेठची कविताही छान आणि ही कविताही. :) मी आयटीत आहे पण ऐटीत नाही . तरीही मी अधूनमधूनच हळवा होतो. सदर कविता वाचून थोडा हळवा झालो होतो पण एनाराय नसल्याने फार जास्त हळवा होऊ शकलो नाही. :( पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

In reply to by घाटावरचे भट

अवलिया 01/10/2009 - 10:59
छान --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

माता न तू वैरिणी म्हणालो होतो तेव्हा अर्थात, मनातल्या मनात.
हॅहॅहॅ माता न तु वैरिनी मनातल्या मनात नाय म्हन्ल तर मंग आ बैल मुझे मार व्हईन की काय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चतुरंग 01/10/2009 - 10:45
कवितेतही डोक्याला (शीर्षक ह्या अर्थी) महत्त्व असते हे अधोरेखित झाले! ;) ग्लिसरीनयुक्त अश्रुपात नसलेली पण तरीही एक वेगळाच विचार सांगणारी कविता आवडली! (खुद के साथ बातां : रंगा, ह्या माणसाला सतत अशा सर्जनशील मोड मध्ये ठेवायला काय बरं करावं लागेल? धन्याशेठला वारंवार लिहावं लागेल कदाचित! :) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

घाटावरचे भट 01/10/2009 - 11:14
रंगा, ह्या माणसाला सतत अशा सर्जनशील मोड मध्ये ठेवायला काय बरं करावं लागेल? धन्याशेठला वारंवार लिहावं लागेल कदाचित!
काय राव रंगाशेठ, ते असेही नेहेमी 'सर्जन'(विंग्रजीतला)शील मोडातच असतात की.

In reply to by घाटावरचे भट

चतुरंग 01/10/2009 - 11:17
आलीच की शब्द निसरडा झालाय त्यामुळे काही खरं नाहीये आता पण म्हणलं राहूदेत कधी मराठी तर कधी विंग्रजी सर्जन, कसें! ;) (स्कालपेल)चतुरंग

In reply to by चतुरंग

मिसळभोक्ता 01/10/2009 - 11:21
अरे तिकडे एका सर्जनाने गुलझारचा जीव घेतला रे ! तिकडे बघा ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सहज 01/10/2009 - 11:40
असो मला परत एकदा छोड आये हम वो गलीया आनी चप्पा चप्पा चरखा चले आठवेल. खर सांगू तर मिभोंचा दर्द समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय. अर्थात धनंजयची कविता जितकी सहज आहे (मुसुनी कशी ते समजवले आहेच) तितका प्रभाव जाणवत नाही आहे. अस्वस्थ वाटते, लिहताना देखील खूपच अस्वस्थ अवस्था होती व फटकन लिहून मोकळे व्हायचे असे वाटते. पण असे हळवे मिभोपण आम्हाला आवडतात, त्यांना आम्ही कधीच आपले म्हणले आहे, एकदा सगळ्यांनी कोरसमधे म्हणा रे :-) (त्यावर म्हणतील मला तसे काही व्यक्त करायचेच नव्हते ;-) ) कळकळीची विनंती - प्लीज प्लीज मळलेल्या कुबट वासाच्या गोधड्या सोडा रे, अगदी साध्या तलम इजिप्शियन कॉटन ८०० थ्रेड काउंट डुवे/क्विल्ट काढा की. कशा करता साठवताय पैसा.

In reply to by सहज

मिसळभोक्ता 01/10/2009 - 11:49
आपण पुन्हा एकदा बोलणे आवश्यक आहे. (तलम ८०० थ्रेड काऊंटच्या चादरींविषयी बोलण्याच्या आधी कमल हसनच्या "पुष्पकविमाना" मधला एक शीन आठव. त्याला हाटेलात झोप येत नसते, म्हणून तो त्याच्या झोपडपट्टीतले आवाज रेकार्ड करून हाटेलात घेऊन जातो. आठव. आणि मग लिहि रे.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

शाहरुख 01/10/2009 - 21:39
पुष्पक चित्रपट खरं तर विसरलोय मी, पण येवढीच जर झोप येत नसेल तरीही हाटेलातच झोपायचा अट्टाहास का ? बाकी कवितेबद्दल आम्हा गरीबानं काय बोलायचे !!

सुंदर कविता. मिभो बर्‍याच दिवसांनी लिहिते झाले याचाही आनंद झाला. इतके दिवस नुसते विरजणापुरतेच राहिले होते. ;) अतिशय कमी शब्दात आणि कोणताही भावनिक अभिनिवेश न आणता खूप मोठा आशय आहे कवितेमधे. लिहित जा अधून मधून. @ चतुरंग : शीर्षक बदलल्यावर खरंच खूप फरक पडला... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहज 01/10/2009 - 12:23
>शीर्षक बदलल्यावर खरंच खूप फरक पडला... हो ना. परागंदा वाचून वाटले आता काय केले ह्या पराने (बिल्ला २१३८)

धनंजय 01/10/2009 - 17:41
असेच वेगवेगळे हळवे प्रसंग येतात. मनमोकळे विचार आहेत कवितेत. उत्तरे, "शेवटचे" असे समाधान तर कधीच मिळणार नाही.

प्राजु 01/10/2009 - 19:34
वोह कागज कि कश्ती .. वोह बारिश का पानी... कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 02/10/2009 - 00:02
वा! सुरेख कवितांची जुगलबंदीच! आता या दोघा प्रतिभावंतांनी इतके भावूक केल्यावर एक तितकेच दमदार विडंबनही होऊन जाऊ द्या ऋषिकेश ------------------ नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे