Skip to main content

अलिप्त

अलिप्त

Published on 15/09/2009 - 20:08 प्रकाशित मुखपृष्ठ
न देणे, न घेणे, फुकाचे न खाणे, कुणाच्या न वाटेत येणे मुळीही, बरे काम माझे, बरी वाट माझी, स्वत:च्याच विश्वात मश्गूल आम्ही ||१|| असे वाटले की लिहावे जरासे, लिहावे जरा, पाठवावे कुठेसे, तया सोडुनी या जगाच्या भरोसे, विचारात होऊ पुन्हा दंग आम्ही ||२|| कधी आवडावीत काव्ये कुणाची, दिसावी कधी झेप कोणा मनाची, जरी दाद देऊ तया ताकदीची, मनाच्या महाली असू गुंग आम्ही ||३|| न लाटात आम्ही, न वाळूत आम्ही, सदा एकटे सागराच्या किनारी, जसा सूर्य चाले सकाळी दुपारी, तसे राहतो या अलिप्तात आम्ही ||४||
लेखनविषय:

याद्या 2042
प्रतिक्रिया 9

न लाटात आम्ही, न वाळूत आम्ही, सदा एकटे सागराच्या किनारी, जसा सूर्य चाले सकाळी दुपारी, तसे राहतो या अलिप्तात आम्ही मस्त! सही कविता आहे अगदी! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

कविता आवडली. (स्वच्छंद)बेसनलाडू

एकदम सह्ही!!! न लाटात आम्ही, न वाळूत आम्ही, सदा एकटे सागराच्या किनारी, जसा सूर्य चाले सकाळी दुपारी, तसे राहतो या अलिप्तात आम्ही ||४|| हे खास! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जसा सूर्य चाले सकाळी दुपारी, तसे राहतो या अलिप्तात आम्ही मस्तच