......आणि मग
......आणि मग शुभ कार्याची तुझ्या उडेल लगिन घाई,येइल तुझ्या वसंत आयुष्यी- पहाटपालवी तिच्या अवखळ ,अल्लड, सोनपावलांनी.
तिच्या ओल्-स्वभावी बनेल माझी पुत्री.
जोडुन नाती ,रचुन नवी प्रेमबंधनं घर बनविल ती प्रेमनिवास.
येताच माहेर आल्हाद आठवणी,जोडिल ती -घडवील सासर तशाच साठवणी .....
लागेल लळा,जुळतील मने ,नर्म प्रसन्न दर्शानाची तिच्या सवय होइल . रामप्रहरी दोघांचा सुहास्य दिनारंभ होइल.
दिस जातिल, स्वर एक होतिल. सासु-सुनेची स्पर्धा न राहता माय्-लेकिची मेणमउ माया बनेल .
चौघांच्या आपला मित्र मैफिली जमतील.
मिसळपाव