Skip to main content

मुक्तक

मी कोण?

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 24/11/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांनी जेव्हा मला विचारलं आपण कोण! तेव्हा माझ्या मनी प्रथम उत्तर आलं या अफाट विश्वातला एक छटाक माणुस मी! पण मनातलं उत्तर ओठांवर येण्याआधीच कानी आला ओरडा देशद्रोही, भारत माता की जय, जयहिंद! अन तेव्हा मी म्हणलं मी एक भारतीय हेच बरोबर उत्तर असेल बहुतेक! तेव्हढ्यात कुणीतरी चिरकलं काफीर, दार-उल-हर्ब, गर्व से कहो हम हिंदु है! तेव्हा मी विचार केला मी हिंदु असंच सांगण योग्य! पण तेव्हढ्यात कानी आला गलका घाटी, भांडी घासा आमची, घास रे रामा, जय महाराष्ट्र! मग मनी म्हणलं आहेच मी मराठी तर गरजेन जय महाराष्ट्र! तोवर कुजबुज सुरु झाली सवर्ण, दलीत, बामण, ९६ कुळी! मग मला आठवली जातीकरता खावी माती ही उक्ती!

`एकच' तारा समोर आणिक...

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 21/11/2009 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
meteor "सिंह राशीतून सर्वात मोठा उल्कावर्षाव मंगळवारी दिसणार' अशी बातमी वाचून माझ्या भावनिक, वैचारिक विश्‍वात उलथापालथ होण्याचा प्रश्‍नच नव्हता. नेहमीच्या पद्धतीनं ती बातमी वाचून सोडूनही दिली होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीत कामावरही आलो होतो. पण काम सुरू असतानाच्या काळातच दोन सहकारी उगीचच "आज रात्री ड्युटी संपल्यावर काय करणारेस,' म्हणून आसपास घुटमळून गेले.

डोंबिवली... ते...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 20/11/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतल्या एका कंपनीत नवीनच कामाला लागलेले ते दोघे... एक डोंबिवलीत राहाणारा, तर दुसरा साऊथ इंडियातल्या कुठल्यातरी खेड्यातून आलेला... एकत्र काम करताना त्यांची मैत्रीही घट्ट होत असते. काम संपल्यावर गप्पा, नरीमन पॉईंट, मरीन ड्राईव्हवर फेर्फटका, असं सुरू असतं. खूप चांगली, निर्व्याज दोस्ती! कधीमधी हा डोंबिवलीकर आपल्या साऊथ ईंडियन मित्राला घरी येण्याचं आमंत्रण द्यायचा, आणि हाही ते आनंदानं स्वेकारायचा. कितीतरी वेळा असंच व्हायचं. साऊथ इंडियन मित्र कधीच `नाही' म्हणायचा नाही. ...

`वादळ' आणि `वादळग्रस्त'...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 14/11/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
`वादळ' आणि `वादळग्रस्त'... दुष्काळाचे सावट दूर करूनच मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, आणि राज्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सारे काही सुरळीत झाले, याची खात्री देणारे, स्थिरतेचे वारेदेखील वाहू लागले आणि काही दिवस जाणवणारी एक अस्वस्थता संपुष्टात आली. राज्याला गुलाबी थंडीचे वेध लागले. कपाटातले ऊबदार स्वेटर, मफलर, शाली बाहेर आल्या, आणि पावसाने कोंदटलेल्या छ्त्र्या, रेनकोटांनी कपाटातल्या त्या जागेत दडी मारली. हवेत एक नवा उत्साह वाहू लागला. या उत्साहाने भारलेली मने `नवनिर्माणा'च्या या चाहुलीने मोहरू लागली. पण मध्येच अचानक हवामान बदलून गेले.

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं.
काव्यरस

असेच मनात आले...

लेखक एकशुन्य यांनी बुधवार, 11/11/2009 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री टि.व्ही समोर बसुन जेवत असताना 'ब्रेकिंग न्युज' ही पाटी बघितली, 'सुनीता देशपांडे यांचे निधन'. हातातला घास गळ्यातल्या आवंढ्या बरोबर तसाच ढकलला. वाटलं. प्रत्येक घरातला 'नारायण',वर्तमानात असुन देखील भुतकाळात जगणारे 'हरितात्या', कोकणातला 'अंतु बर्वा' ही आणि अशी बरीच मंडळी आज खरोखर पोरकी झाली. जेव्हा पासून कॉमिक्स सोडून कादंबरी हा फक्त मोठ्यांसाठी असणारा प्रकार वाचू लागलो तेव्हा प्रथम हात लावलेली ' व्यक्ती आणि वल्ली ' ही एक.

असंबध्ध

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 10/11/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
असंबध्ध मुंबईच्या लोकल्स लोखंडी असतात.. म्हणुन प्रवासी का एक्मेकाच्या बोकांडी बसतात? नाहि आज सण तरी भोजनात पुरण वरण.. नाहि वाळवंट तरी का बांधता उरण ला धरण समुद्रात मासे खुप छान पोहत होते म्हणुन का रस्तावर कोणी पुस्तके विकत होते? सत्य नारायणाच्या पुजेला घातला घाट जेवायचा? आम्हि पण ठरविला आहे बेत डोहाळ जेवणाचा तुमच्या नातवाच तोंड एकदा आम्हाला पाहु द्या.. अन दुस~या लग्नाचा बार आम्हाला ऊडवु द्या १३ वा झाला तरी अजुन सुतक उतरत नाहि... कितिहि साखर घाला बासुंदी गोड होत नाहि उघडले चपटीचे बुच प्यायला कसा ढस्साढस्सा चमचा भर ईनो पाण्यात कसा फुलला फस्सा फस्सा एक पोरगी नाहि पटत ,म्हणे लग्न करा.. विम

मी कात टाकली

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 09/11/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
(वैधानिक इशारा ः हा लेख म्हणजे हाताला झालेल्या इजेबाबतचा हलक्‍याफुलक्‍या शब्दांतील वर्णन आहे. कमकुवत हृदयाच्या वाचकांनी कृपया तो वाचण्याचं धाडस करू नये!) कोणतीही गोष्ट साधी, सरळ, सुव्यवस्थित होता कामा नये, हा माझ्या जीवनाचा दंडक आहे. काहितरी खुसपट, अडचण, समस्या त्यात निर्माण झालीच पाहिजे. त्यानंतरच ते काम पूर्ण व्हायला हवं. मी स्वखुशीनं स्वीकारलेला नव्हे, तर नशीबानं/दैवानं/देवानं किंवा जगण्यानं म्हणा, माझ्यावर लादलेला हा नियम आहे. बऱ्याच दिवसांत तसं काही झालं नव्हतं. यंदाची दिवाळी व्यवस्थित पार पडत होती. शेवटचा दिवस होता.