आताशा माझे पिल्लू ३ वर्षे १० महिन्यांचे आहे, कधी अड़ते कधी पड़ते. कधी त्याला समजावतो कधी रागावतो.
हे त्याच्या वागन्या पेक्षा माझ्या मूड वर जास्त अवलंबून असते. नंतर उगाच विचार करतो बाबा पण असेच काही करायचे ना.
लहानपणी मी एकदा घरात काहीतरी माझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिडून बसलो होतो आणि मग घर सोडायला निघालो होतो, फकत बाबांची वाट पाहत होतो. अशासाठी की बाबा येउन माझा प्रश्न सोडवू शकतील अशी आशा होती. बाबा आले शालेतुन आणि घराबाहेर पाय-यावर बसून माझ्या बरोबर बोलत होते १० च मिनिटे. काय बोलले ते आता आठवत नाही पण ते जे काही होते बहुधा तोच माझ्या आयुष्याचा बेस झाला आहे.
मुंजित वडिलांना गुरु मानून जो गुरुमंत्र देतात ना हे त्या पेक्षा ही पवित्र आणि गंभीर होते, बाबा मला बहुधा आमच्या परिस्थिति बद्दल सांगत असावेत असे वाटतेय. मला समजले की नाही माहित नाही पण माझा राग मात्र शांत झाला होता.
आज पण गोंधळ झाला की आपोआप तो कोड excute होतो आणि गोष्टी सोप्या वाटायला लागतात.
आज मी बाप झाल्यावर माझ्या बाबांबद्दल विचार करतो तेंव्हा आपसुकच डोळे भरून येतात, मग वयामागे आणि वेळेमागे गेलेल्या आणि तिथेच अड़केल अशी भीती असणा-या मनाला पुन्हा वर्तमानात आणताना कष्ट होतात
हर्षद
पुर्व प्रकाशित - http://harshad-gaaanikha.blogspot.com/
वाचन संख्या
3885
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलं लिहिलय
खरच ५० ,अजुन खुलवायला हवं
In reply to चांगलं लिहिलय by भाऊ पाटील
चांगलं लिहिलं आहे. अजून
आज मी बाप झाल्यावर माझ्या
आठवणी दाटतात!
(विषय दिलेला नाही)
<आज मी बाप झाल्यावर माझ्या
छान लिहिलय. आज मीही मुलावर
जरूर समजवा पण रागावू नका पिल्लावर!
<<<अजून पावणेचार वर्षांचंच
In reply to जरूर समजवा पण रागावू नका पिल्लावर! by पिवळा डांबिस
छान लिहिलं आहेस.. होतं असं
आपणां सगळ्यांचे आभार
सुरेख
+१
In reply to सुरेख by स्पा
+२
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा