तारूण्य

शुचि जनातलं, मनातलं
तारूण्य सळसळतं, जोमदार, उत्साहाने परीपूर्ण असतं नव्हे ते तसच असलं पाहीजे. वार्‍याने भरलेलं शीडाचं तारू पूर्ण जोमाने आपल्या ध्येयपूर्तीकडे निघावं तसं काहीसं. "हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे" या ओळी तारूण्याला चपखल लागू पदतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण - जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते. स्वप्न, ध्येय, महत्त्वाकांक्षा यांची लयलूट म्हणजे तारूण्याचा सोनेरी ऋतू. जगाच्या शाळेत नुकतच पाऊल टाकलेलं असतं. दुर्दम्य आशावाद मी मी म्हणत असतो. प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो. प्रत्येक सौंदर्यास्वाद अनुभवावासा वाटतो. जीवन हेच एक थ्रिल असतं. दिवसाचे २४ तास कमी पडत असतात. मोठा बहारीचा कालखंड असतो हा. हाच तो मोहक रस्ता ज्यावरून एकदा आणि एकदाच तुम्ही चालणार असता. प्रत्येकालाच परमेश्वर आरोग्य, सुंदर सकारात्मक विचार, स्वप्न, आशा यांची पुंजी तारूण्यात देतो. आता एवढं सांगून फार उपदेश देत नाही पण एवढच सांगते या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं.
वर्गीकरण

38 टिप्पण्या 6,806 दृश्ये

Comments

धमाल मुलगा नवीन

छान मुक्तक. आवडलं. :) >>या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं. अगदी अगदी!

सुहास.. नवीन

In reply to by रेवती

मी उद्या काशीयत्रेला चाललिये >>. अहो रेवती काकु , ऊद्या का ? आज का नाही ? एखादे काम झटदिशी करावे माणसाने (ईथे माणसानेचा अर्थ मानव-प्राण्याने असा आहे, पाशवी असा नाही !!) कल करे सो आज कर आक करे सो अभी ...वगैरै,वगैरै

पैसा नवीन

येते तुझ्याबरोबर! प्रभ्याने बघ घाबरून खव बंद करून ठेवल्येय.

स्वानन्द नवीन

>>अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण यातलं ते संप्रेरक वगैरे सोडलं तर बाकी सालं काहीच खरं वाटत नाही माझ्या बाबतीत. कसं होणार आमचं!

मिसळभोक्ता नवीन

तारुण्य मध्ये रु र्‍हस्व असतो.

मिसळभोक्ता नवीन

In reply to by प्रियाली

तारुण्याचं तारू तारू एकच. ते तारुण्यात भरकटलं असेल. (तरीच!)

सुहास.. नवीन

In reply to by मिसळभोक्ता

तारुण्य मध्ये रु र्‍हस्व असतो. >>> चुकुन तारुण्यच्या एवजी तारुण्यामधे वाचल ना !! लई हसलो !! डोळ्यांना अजुनही योग्य ते दिसतय की, तुम्हाला आणी मलाही !!

पर्नल नेने मराठे नवीन

किति मस्त दिवस आहेत हे.. ... :) म्हातारी झाले तर कशी दिसेन, कुठे असेन, मिपावर येता येइल का (डो़ळ्यांना दिसेल का?) , न हजार भुन्गे सोडलेस ग शुची माझ्या डोक्यात. :(

मुक्तसुनीत नवीन

माझ्या कॉन्व्हेंटमधल्या मैत्रिणीचा ड्वायलाक् आठवला. "कसे दिवस गेले काही समजलंच नाही नं !" - चिरतरुण मुसु.

रन्गराव नवीन

>>आता एवढं सांगून फार उपदेश देत नाही पण एवढच सांगते या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं. शेवट्च वाक्य वाचल आणि ईंजिनीयरींगची वाया गेलीली चार वर्ष आठवली! गिल्ट (ईंग्रजीत कदाचित अपराधिकता असावा) जाणवणे फार वाईट. :(

उपास नवीन

मुक्तक आवडलं.. हलकेच घ्या, वरचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली पण.. कुणाला भूतकाळ आठवून गिल्ट आली तर कुणाला भविष्यात कशी दिसेन, काय होईल ह्याची चिंता.. :-) बोरकर म्हणतात तसं. . उत्स्वी जीवन जगायचं... बस्स! जगी घाण अन चिखलची सारा कुणी म्हणो हे किती शहाणा पदोपदी मज कमळ घालते मृदगंधाचा नवा उखाणा !! अवांतरः तारुण्यासाठी हल्ली विशेषतः नवकवितांमध्ये तरुणाई हा शब्द वापरला जातो, अंगावर पाल पडल्यासारखं वाटत :)

विसोबा खेचर नवीन

जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते.
असहमत.. खूप काही वाईटदेखील वाट्याला येतं.. दुर्दैवाचे दशावतारही अनुभवायला लागतात हा स्वानुभव.. बाकी प्रकटन छान.. तात्या.

परिकथेतील राजकुमार नवीन

प्रस्थापितांनी पुन्हा एकदा अतुलनीय लेखनाची अवांतराने लावलेली वाट पाहून एक मिपाकर म्हणुन शरम वाटली. प्रस्थापितांनी नवोदितांना गावकुसाबाहेर ढकलण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे चिंताजनक आहे.

ज्ञानेश... नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

पर्‍याने गंमतीत लिहिले असले, तरी हे खरे आहे. (प्रस्थापित, नवोदित, अतुलनीय वगैरे वगळून वाचावे.) लेख काय, प्रतिसाद काय ! असो. मुक्तचिंतन आवडले.

स्पंदना नवीन

उत्साह ! संप्रेरके( हार्मोन्स?) सगळ खर शुची पण या नव तारुण्याला अनुभव नसल्यान कधी कधी फार अडचणी यउभ्या रहातात. तरुण मन मानत नाही अन तरीही ससेहोलपट सोसावे लागते. बाकी लिहिलय अगदी गोड !!

लिखाळ नवीन

ह्म्म ! पाचवीतला लेख 'संप्रेरके' या शब्दाने दहावीमध्ये गेला. >>प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो हे वाक्य वाचून डोळे पाणावले :)