Skip to main content

मुक्तक

संजयदॄष्टी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 18/12/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
असावी एक "संजय दृष्टी" आपल्या जवळ आपल्याच मनातले महाभारत पहाण्यासाठी. कारण, वागत असतो कधी कधी आपण धृतराष्ट्रा प्रमाणे , जन्मजात आंधळे असल्या सारखे किंवा स्वतःच बांधुन घेतो स्वत:च्याच डोळ्यांवर पट्टी गांधारी सारखी, पतिव्रतेचा आव आणून.....!!!
काव्यरस

नातं

लेखक शुचि यांनी गुरुवार, 16/12/2010 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
******काल्पनिक कथावस्तू/मुक्तक****** ______________________________________________________ अधून मधून आम्ही भेटत असतो. आताशा तो मला पूर्वीपेक्षाही जास्त आवडू लागला आहे कारण जितक्या वेळा आम्ही भेटतो तितक्या वेळा त्याची ओळख पटते तर कधी नव्याने होते. मला नेहमीच गंमत वाटत आली आहे की माझं काही त्याच्यापासून लपून कसं रहात नाही? त्याचे भेदक डोळे नीर्विकारपणे माझा ठाव घेतात. मिश्किल कुठला! वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही.

कासाराचा गोईंदा

लेखक यकु यांनी बुधवार, 15/12/2010 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा.

फिटे अंधाराचे जाळे (छायाचित्रे)

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 14/12/2010 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश या ओळी मी दोन वर्षांपुर्वी काढ्लेल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन सादर करीत आहे.

ती का पडली...

लेखक ५० फक्त यांनी रविवार, 12/12/2010 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
ती का पडली... आज दुपारी दुरदर्शनच्या असंख्य चॆनल पॆकी एकावर तो चित्रपट लागला होता. खरंतर त्याच वेळी दुसरी कडे हरे रामा हरे क्रुष्णा लागला होता, पण स्त्रीहट्टापुढे (स्वस्त्री, परस्त्री नव्हे) नाईलाज झाल्याने तो चित्रपट पाहात होतो. त्यातच या अतिशय महत्वाच्या सीननंतर माझ्या ४ वर्षाच्या मुलानं वरील प्रष्ण विचारला. ती का पडली ? त्या संपुर्ण चित्रपटाला कलाटणी देणारा असा प्रसंग,माझी बायको अतिशय गुंग झालेली आणि अचानक हा प्रश्ण, ती का पडली ? बायकोचाच एकदमच मुड्च गेलाच होच. या चित्रपटाविषय़ी माझे व बायकोची स्वतंत्र व टोकाची व भिन्न (नेहमीप्रमाणे) मते आहेत.

मोरपिसे....

लेखक भानस यांनी बुधवार, 08/12/2010 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
सुवासिक फुलांच वेड अगदी लहानपणापासूनच असलं तरीही मी फारच क्वचित कधी गजरा माळला असेल. कधीमधी सोनचाफा किंवा सोनटक्का मात्र घालतसे. बहुतांशी सगळीच सुवासिक फुले पांढर्‍या रंगाशी जवळीक साधून अन स्पर्शातील किंचितश्या तापानेही कोमेजायला लागतील अशीच. ती त्यांच्या आईच्या अंगाखांद्यावरच सुंदर दिसतात. देवाला वाहण्यासाठीही ती मला तोडवत नसत. मायदेशात त्यातूनही मुंबईत या सगळ्या सुवासांना सदैव बहरायला मिळेल असेच तापमान असल्याने माझ्या घराच्या छोट्याश्या बाल्कनीत ही सगळी आनंदाने नांदत, बहरत, सुवास उधळत होती. इथे यायला निघालो तेव्हां माझा सगळा जीव या झाडांमध्ये अडकलेला.

बहरला पारिजात दारी...

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 06/12/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यभामा राजवाड्याच्या गच्चीवर उभी होती , सकाळची सगळी कामं झाली, पुजा, नॆवेद्य वगॆरे, आज सगळं अगदी वेळेत झालं त्यामुळं मन कसं प्रसन्न होतं. बाहेर नुकताच हिवाळा सुरु होवुन काही काळ लोटल्यानं येणारा थोडासा निवांतपणा होता. किंचित धुकं आणि त्यातच द्वारकेतल्या घराघरातुन येणा-या धुरामुळे निर्माण होणारी तरल चित्रं पाहता पाह्ता अचानकच तिची नजर त्याच्याकडे गेली. जेंव्हा हे एकदा स्वर्गातुन परत येताना याच्या फुलांची माळ घालुन आले होते, तेंव्हा पासुन माझं मन त्याच्या साठी फार झुरत होतं. नंतर एक दोन वेळा यांच्याकडे विषय काढला, पण छे आमचं कोणि ऎकेल तर शपथ. मग मी पण शेवटचं अस्त्र उचललं.

सौंदर्याचा `अर्थ'

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 06/12/2010 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
"छ्या! यंदाच्या "मिस अर्थ'मध्ये काहीच अर्थ नाही! कुठल्याही ब्यूटी कॉंटेस्टमध्ये पहिल्या आलेल्या मुली कशा एसटीत बसून पोटात ढवळल्यावर उलटी दाबल्यासारखे हात तोंडावर ठेवतात....तसे हिनं का नाही ठेवले?'' चि. कुरकुरे सक्काळी सक्काळी टीव्ही बघताना चेष्टेच्या मूडमध्ये होता. ""ईईईई...काय काहितरी घाणेरडं बोलतोस रे?'' कु. किरकिरेनं त्याच्या डोक्‍यात एक टप्पल मारली. ""घाणेरडं काय? दर वेळी तसेच नाही का फोटो येत? पण ही निकोल का कोण, तिनं चक्क संपूर्ण चेहरा दाखवणारे फोटो दिलेत, म्हणून जरा शंका आली, एवढंच!'' ""बरं. कळली हा तुमची अक्कल! आता गप्प बसा.'' कु.