मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आम्ही कविता करतो

असुर · · जे न देखे रवी...
काव्यरस
हल्ली सरळ काही सुचत नाही एक वाक्य धड लिहीता येत नाही पण व्याकरणावर रण माजवतो सध्या आम्ही कविता करतो चार ओळी इकडून उचलून चार ओळी तिकडून उचलून तरीही वामनाचे आम्हीच वारस आम्हीदेखील कविता करतो कुणी वाचो, अथवा न वाचो कुणी निंदो, कुणी वंदो घंटा कुणाला फरक पडतो म्हणूनच आम्ही कविता करतो मदत, कौल, काथ्याकुटाचा आता जरी का कंटाळा आला वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो त्यासाठीच तर आम्ही कविता करतो कुणा काही बोलणे त्याज्य, कुणा काही सांगणे त्याज्य बोर्डावरच्या खेळातही आपल्यावरच राज्य 'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' समजतो बोर्ड भरवण्यासाठी आम्ही कविता करतो कवितेच्या खेळात या लेख जगती, लेख मरती चांगल्या लेखाच्या स्मृतीत आम्ही अजून चार कविता करतो!!

वाचने 2198 वाचनखूण प्रतिक्रिया 9

सहज 14/01/2011 - 15:16
अजून चार कविता करतो!! बापरे! केवढे हे क्रौर्य!!!

In reply to by टारझन

परिकथेतील राजकुमार 14/01/2011 - 15:39
मदत, कौल, काथ्याकुटाचा आता जरी का कंटाळा आला वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो त्यासाठीच तर आम्ही कविता करतो
आणि आम्ही अवांतर करतो ;) पण काही मिपा प्रगल्भ बनवण्याचा ठेका घेतलेल्यांना ते बघवत नाही, मग ते बिचार्‍या कांताला आम्हाला समजवायला पाठवतात ;) तो बिचारा अध्यात मध्यात नसतो कुणाच्या, मग आम्हाला गप ऐकुन घ्यावेच लागते.