Skip to main content

' नववर्षी-संकल्प ' जाणता ...

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 14/01/2011 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
तिळगुळ देता-घेता नेते गोड-गोड बोलणार , सर्वच पक्षांचे नेते ना तोडफोड करणार शहरामधले मंत्री आता खेडयातच राहणार वाढदिवस ना आता कुणाचे फलकावर दिसणार - देशामध्ये ना कसलाही घोटाळा करणार शासन भ्रष्टाचार-प्रदूषणमुक्त अम्हा दिसणार - आमदार नि खासदार ते भत्ते ना घेणार ! सूत्रसंचालिका अंगभर कपडयातुन दिसणार 'अभिनयाच्या अंगा'स्तव 'तो' 'स्त्री-वेषी' न होणार 'जज्ज ' मराठी 'चॅनल'चे मराठीत बोलणार निकाल 'एसेमेस' विना ते स्पर्धेचे ठरणार 'नववर्षी-संकल्प'जाणता करमणूक होणार !!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1040
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया