२०१०: एक उत्तम वर्ष
२०१० ला बाय बाय करायची वेळ आली आहे. अश्यावेळी वाटेवर थांबून जरा मागे सरलेल्या २०१०कडे बघताना काय वाटतं? मला तरी हे सरतं वर्ष भारताच्या दृष्टीकोनातून एक उत्तम वर्ष वाटतं. एक धावता आढावा:
क्रिडा:
क्रिडा क्षेत्राकडे बघता हे वर्ष भारतासाठी अप्रतिम गेलं यात वादच नाही. राष्ट्रकुल खेळांच्या (शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लाऊन नंतर) केलेल्या दैदिप्यमान प्रदर्शनाबरोबरच त्यात भारतीय खेळाडूंनी केलेली पदकांची लयलूट, मिळवलेलं दुसरं स्थान सारंच स्वप्नवत होतं. आशियायी खेळातही आतापर्यंत सर्वाधिक मिळालेली पदके क्रिडाक्षेत्रातील भारताच्या वाढत्या परिघाची ग्वाही देत होती.
मिसळपाव