पावलांचे मुंगळे निघाले
त्या वारुळातील योगी मंत्रामागून मंत्र उसवत राहील
तर नागवे होणाऱ्या शरीराची कुठली असेल पोळणारी जात?
मांडी घालून म्हणता येतात सहिष्णू शब्दरचना
त्याच वेळी निराकार जनावर वेटोळे (? ) घालून
रचत असते जहरोत्तम द्वंद्वगीत...
सहज मनाच्या गाभाऱ्यातील समईची जखम
रुंदावायला लागली की
एखादी पालखी हमखास येते
भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात
पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी
देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे
असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी
एक... दोन... तीन
अस्वस्थ कोपऱ्यातील एखादे पिवळे वय
स्वतःची कुरवाळू लागते..
ती भूक, नागडी नसते...
सर्व विझायला लागले की वाटांवर कुलुपे कशी लागतात?
रांगेतले सर्वजण एकाच खिडकीकडे पायांना मिठी घालून सरपटत राहतात...
एक एक अवयव खाटीक वेगळा करतो
वाहणारा स्राव आढेवेढे घेत नाही..
पाणलोटात जिवाच्या आकांताने मदत मागणाऱ्या कुणाची एक डॉक्युमेंट्री...
रीळ गुंडाळले जाते...
जाणिवा देखील
ह्या साऱ्यांच्या मागे एक वेडसर दिवा
तटस्थपणे
फडफडत असतो....
-पूर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2881
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुंग्या आल्या....
+१००
In reply to मुंग्या आल्या.... by अत्रुप्त आत्मा
वाचल्यावर असं वाटलं की
In reply to मुंग्या आल्या.... by अत्रुप्त आत्मा
मायला, अआ मी काहीही बोलणार नव्हतो पण तुमच्या या स्मायल्या
In reply to मुंग्या आल्या.... by अत्रुप्त आत्मा
प्रतिसाद द्यायला लावतात!
In reply to मायला, अआ मी काहीही बोलणार नव्हतो पण तुमच्या या स्मायल्या by संजय क्षीरसागर
छान !
मस्त कविता ! आवडली !
तोबताबड
In reply to मस्त कविता ! आवडली ! by नाना चेंगट
त्यासाठी वारुळातल्या सगळ्या
In reply to तोबताबड by परिकथेतील राजकुमार
क्या बात..
चिगो...आपके रसग्रहण से हम
In reply to क्या बात.. by चिगो
__/\__
In reply to क्या बात.. by चिगो
क्षणभर...
अरे देवा!!!
अरे ! ही तर कविता झाली.
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे
In reply to अरे ! ही तर कविता झाली. by स्पंदना
धन्य आहात..
In reply to अरे ! ही तर कविता झाली. by स्पंदना
___/\___
In reply to अरे ! ही तर कविता झाली. by स्पंदना
रसग्रहण केलं की पेशवे नाराज
नाराज?
In reply to रसग्रहण केलं की पेशवे नाराज by यकु