Skip to main content

आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....

लेखक बाबा पाटील यांनी सोमवार, 28/10/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते. तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो . मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्‍या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे----- कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33002
प्रतिक्रिया 261

प्रतिक्रिया

ही सौंस्क्रुति म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांसाठी पुरुषांकरवी चालवलेली आहे असे म्हणतात त्याचे अजून एक प्रत्यंतर आले. तदुपरि पुरुषमुक्ती संघटनेच्या अस्तित्वाबद्दल यद्यपि माहिती नसली तरी पुरुष हक्क सौंरक्षण समिती नामक सौंस्था सांगलीत अस्तित्वात असल्याचे कळते. सदस्य होण्याचा विच्यार चालु आहे, निच्छितच जॉइन केले जाईल.

तुमच्या संघटणेला शुभेच्छा! संघटना स्थापनेसाठी गृहस्वामिनीची परवानगी घेतलीत का पण?

मी माझ्या बायकोचा अजिबात गुलाम नाही.( हे असे लिहायची आज्ञा तिनेच दिली आहे.) माझे तुमच्या संघटनेला अनुमोदन आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

काय आत्मुराव तुम्ही? अहो हल्ली १०० तर माझ्या धाग्याचे पण होतात! (कॉमन झालंय) हा तर हुकमी क्राऊड पुलर आहे. (शाहरुख/ आमीर/ सलमानच्या चित्रपटासारखा) १५०-१७५ तरी कुठंच गेले नाहीत.

जुनी जाणती माणसे हि कामे करू लागली तर बायको म्हणते '' तुम्ही जरा स्वस्थ बसता का म्हणजे मला हे नीट आवरता येईल '' जुनी जाणती म्हणजे ४० वर्षे संसार केलेली माणसे असे ५० वर्षे संसार केलेले म्हणतात मि पा मंडळी भुस्काट पडल असेल तर उतारा बघावा , संघटना काढण्याचे नसते उद्योग नको असं माझं मत

अहो बाबा! घरच्या कामासाठी चावडी कसली गाठता म्हणे? आम्ही जर ही साफसफाई केली नाही तर तुमच घर कस उजळणार? अन ते तुमच घर आहे ना? मग तुम्ही नाही करणार तर कोण करणार साफ? दिवाळी पाहिजे, झगमगाट पाहिजे, काम तेव्हढी नको. (बघा मला वाक्यन वाक्य पाठ आहे)

In reply to by इरसाल

'यंदा' ह्या शब्दाबद्दल आक्षेप. बाकी आम्ही पुरुष लोक बोलून वाईट होतो. इतिहास गवाह है 'इस्त्रीयोंके' वजह से (आखिरे ज़मीं ;) भी तो इस्त्री ही हय) आजतक की सारी लडाईयां हुई हय! (एवडं घासलेट बास्स का आग पेटवाय्ला? ;) )

अर्रर्रर्रर्र... काय अपेक्षेने धागा उघडला होता... फुसका बार निघाला... चला कामाला लागा गुपुचुप.. इथे येऊन धागे काढायचे बरे त्राण राहीलेत अंगात..?? तेव्हढ्या वेळात जरा फॅन पुसले असते तर काय धाड भरली असती का? आणि गिळायच्या वेळेस नाही आठवत स्त्रीयांपासुन मुक्ती?? तेव्हा कुठे जाते ही संघटना? आता दिवाळीच्या दिवशी अंगाला तेल लावुन घेताना, अंघोळ घालुन घेताना, रांगोळी पहाताना, फराळाला खादडताना बघु बिचारं बिचारं वाटतं का ते... चला उठा.. कामाला लागा.. हैक हैक हैक.. सॉरी सॉरी.. उठा उठा उठा..

In reply to by पिलीयन रायडर

एकदम झाडू घेवून च मागे लागलीस की ! आत्ता काय बोलणार ते!

In reply to by पद्मश्री चित्रे

हे टाळायचा एकदम सोप्पा उपाय. आपण स्वतः होउन पुढाकार घेवून घर साफसुफीची मोहीम काढायची. बायको नामक मालकाला काही बोलण्याची संधीच द्यायची नाही. फडताळातली , पोटमाळ्यावरची वापरात नसलेली भांडी मुद्दाम काढायची , गाद्या , पलंगाखालची रद्दी ,चपलांचे रॅक सगळे मोकळे करुन ठेवायचे. घरात जेणे करून एक इंचही जागा मोकळी उरणार नाही अशा तर्‍हेने पसारा करायचा. आपण स्वतः मस्त जुनी लुंगी अन एखादा मळकट बनियन, जुनी स्लीपर अशा वेषात बसायचे. हा पसारा पसरलेला असताना रद्दी चाळायला घ्यायची. महत्वाचे वाटणारे कागद एका गठ्ठ्यात वेगळे करायचे. त्याच वेळेस पुस्तकाच्या रॅकमधली पुस्तके धूळ झटकायच्या निमित्ताने खाली घ्यायची. हे काम चालू असताना मित्राला हळूच फोन करायला सांगायचे. किंवा टेलेफोनिक इंटर्व्यु कंडक्ट करायचे.( याची सेटिंग्ज एच आर कडून अगोदरच लावायची. रैवारी काम करायचा अलाउन्स अनायसे मिळतो) एक इंटर्व्यु किमान ४० मिनिटे असे ४ इन्टर्व्यू कन्डक्ट करायचे. तीन चार वेळ चहा ढोसायचा. अधूनमधून अरे बापरे कित्ती हा पसारा. असे सुस्कारे टाकायचे. स्वैपाकघरातील मालकिणबाईंकडून काही डोळे वटारणे , अहो कित्ती पसारा केलाय असे उद्गार आले तर " अजिबात काळजी करु नकोस तु थोडावेळ थांब. कसे चकाचक करतो ते बघ असे म्हणायचे. अधूनमधून " मला आत्ता कळतय तुला कित्ती काम असते ते" असे म्हणायला मात्र विसरायचे नाही. हे सगळे होईपर्यन्त दुपारचे पाच वाजतील असे बघायचे. त्यानंतर "उद्या आवरतो ग हे सगळॅ" असे म्हणून तो सगळा पसारा एका कोपर्‍यात लाथेने ढकलायचा. हे धोरण किमान दो तीन दिवस चालवायचे. वरील उपाय करून बघा. पुन्हा कोणीच तुम्ही जरा मदतील या असे म्हणायचे धाडस करणार नाही.

In reply to by विजुभाऊ

तुम्ही माझ्या नवर्‍याला कधी भेटला होतात? की लग्नाला बरीच वर्षं झाली की आपोआप येतं हे सगळं? अगदी येक्झॅक्ट हेच सगळं करतो तो!

In reply to by विजुभाऊ

तुमच्या तोंडात तीळ भिजत नाही हो विजुभाऊ.. काहीतरी गुप्तता म्हणून प्रकार असतो की नाही आपल्याआपल्यात.

गॄहस्वामिनीने ही सगळी कामे नाही केली तर तुम्हीच म्हणाल द्धिम्म हलत नाही म्हणून. एकदा माझ्या नवर्‍याने मी आसपास नाही असे बघून माझ्या बहिणीला सोफ्याच्या हॅंडल वरची धूळ दाखवली होती, पण मला किचन मधून सगळे दिसत होते. त्या नंतर###********** मी आता स्त्री मुक्ति संघटनेची सक्रिय कार्यकर्ती आहे.

In reply to by त्रिवेणी

कमाल आहे बाई तुझी.. लग्गेच "तुला दिसते ना धुळ, मग तु का नाही पुसली??" असं म्हणुन पुसायला फडकं द्यायचं.. आणि तेवढच बाकीच फर्निचर पण पुसुन घ्यायचं!

In reply to by पिलीयन रायडर

अग पिरा मलाही आवडलं अस्त तस करायला, पण 2 महीने झाले त्याचा हात प्लास्टर मध्ये आहे. आता अजून 1 ते दीड महिना पूर्ण बर होण्यासाठी. पण नंतर त्यालाच देईन म्हणते हे काम. हल्ली माझ्याच्याने पण नाही होत ग सगळी कामे.

In reply to by त्रिवेणी

फक्त सोफ्यावर धुळ आहे असं (ते ही हलक्या आवाजात्.हळुच्..घाबरुन..) सांगितलं म्हणुन हातच मोडणं जरा जास्त झालं नाही का ग त्रिवेणी? ;)

In reply to by पिलीयन रायडर

मलाही तेच म्हणायच आहे. जरा दया दाखवली असती तर सोफाच काय किचनही साफ करुन मिळाल असत. ;)

In reply to by स्पंदना

अह मी नाही मोडला हात. माझा सचिन तेंडुलकर सोसायटीच्या टेनिस कोर्टवर टेनिस बॉलने क्रिकेट खेळायला गेला आणि खेळताना पडला. परिणामी हाड 2-3 ठिकाणी तुटले.

In reply to by पिलीयन रायडर

हा 'उच्च' होता! बाकी हिंस्त्रपणा हा जास्त करुन माद्यांमध्येच जास्त असतो. का?/ किंवा असतो का?/ किंवा कसंही!

एक मुद्दा राहिलाय असे अक्षय म्हणताहेत. त्यांच्याच शब्दात, "अन शेवटी झोपायला गेलं अन जरा टीव्ही लावला की, लगेच वळुन हात दुखताहेत, पाय दुखताहेत करुन विव्हळायच. मग बसतो नवरा दाबत अन ह्या घोरायला लागतात." (स्वतःच खातं काढाव ना मिपावर! मला कशाला भरीला पाडायच?)

In reply to by बाबा पाटील

शांत व्हा बाबा! मला माहिती आहे, तुम्हाला वाटल होतं, समस्त पुरुष वर्ग तुम्हाला धाग्यावर धीर द्यायला अन स्वतःच दु:ख व्यक्त करायला येतील. पण काय आहे सगळे बीज्जी आहेत. तअन ते बिज्जी असल्याने आम्हाला वेळ आहे ;)

In reply to by स्पंदना

असे प्रयत्न पूर्वीही झालेत हो! आदि जोशीने एक उनक (म्हणजे उपेक्षित नवरे की उनाड नवरे ते आता विसरले) काढली होती. आजकाल त्यांची कैच हालचाल नै.

In reply to by पैसा

बरोब्बर.. बाकी कोण म्हणलं होतं ग की ह्या पुरुषांच्या धाग्यांना फारसं मनावर घ्यायचं नाही.. इथे धागे काढतील मग आयतं भरपेट गिळुन, ढेकर देत, बनियन ला हात पुसत प्रतिसाद बघत बसतील..!! (इथे तुझी स्मायली.. + ही ही ही)

In reply to by पिलीयन रायडर

स्त्रियांनीही साडीला हात पुसले तर आमची काही ना नाही हो! बाकी पुरुषांच्या भरपेट गिळण्यावरची जळजळ पोचली आहे ;) =))

In reply to by बॅटमॅन

ए गपे.. भरपेट कोण खाउ घालतं रे..?? खाऊ घालणारी कधी जळत नसते खाणार्‍यांवर.. आणि आक्षेप "भरपेट" वर नसुन "आयतं" वर आहे...

In reply to by पिलीयन रायडर

डोळे पाणावले, ग्लिसरीनचा ओव्हरडोस झालाय बहुतेक.... हां तर काय म्हणत होतो? 'आयतं' पणाची आयते वाचू लागलो तर अख्खे कुराण होऊन जाईल, काय समजलेत ;)

In reply to by बॅटमॅन

पुस बाळा.. डोळे पुस.. आणि आपला प्रत्येक प्रतिसाद फाऊल आहे हे लक्षात आहे ना.. तु कितीही काहीही बोल.. (किमान माझ्या लेखी तरी) तु अनुनभवि असल्याने तुझे चिमखडे बोल मी मनावर घेणार नाही..

In reply to by पिलीयन रायडर

आणि आपला प्रत्येक प्रतिसाद फाऊल आहे हे लक्षात आहे ना.
राइट. तुझा प्रतिसाद फाऊल आहे हे मान्यच आहे =))

In reply to by पिलीयन रायडर

ब्याट्मॅन, क्याट्वुमन शोधून टाक दिवाळीच्या मुहूर्तावर...मग पुढच्या वर्षीच्या धाग्यावर अनुभवाचे चार बोल टाकता येतील...

In reply to by पिशी अबोली

शोधायला कै हर्कत नै हो...पण ते...आपलं हे ते..अनुभवाचे चार बोल टाकता यावेत म्हणून क्याटवुमन म्हणजे परत ते अल्पदुग्धप्राशनार्थ महिषीपालन =))

In reply to by बॅटमॅन

तुझ्याच भल्याची गोष्ट सांगितली, पण ऐकतं कोण? एक तर क्याट्वुमनसारखी चपळ बायको शोधलीस की नुस्त्या मारामार्‍या करणे हेच काम उरेल(कुणाशी हा प्रश्न गैरलागू) साफसफाई वगैरे तुला करायला ती लावणार नाही आणि फुकटात मॅरीड असल्याचं प्रमाणपत्र पण मिळेल... असो... चार भल्याच्या गोष्टी ऐकण्याची तयारी अगदी वाघूळमानवाकडेही नसते हे कळलं... :-/

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन भो, उगा काळं चामडं पांघरलेली मांजरी मिळते आणी "चाबकाने" मारामारी करते यास्तव स्वतःचे स्वातंत्र्य धोक्यात घालु नका. दुध हवं म्हणुन हेला खरेदी करणं प्रशस्त नव्हे.( इथे आजुबाजुचे संदर्भ घ्यावेत.) फुकटातलं सर्फ- तिकीट तर कुठे ही मिळेल.

In reply to by बाबा पाटील

बापा, आपली जरा पडती बाजू दिसतेय या धाग्यात :( बाकी, आपल्या भावनेशी सहमत आहे. आपला आराम करायचा मूड आणि यांना पसारा मांडायची खवखव सुटते. असो, पत्नीपिडित पुरुषांचा सिमला घोषणापत्र ;) -दिलीप बिरुटे [पिडित पुरुषांबद्दल सहानुभूती असलेला]

In reply to by बाबा पाटील

नाही जमत तर सांगावे बायकोला कि काही करू नकोस ग बाई? उगाच तुझ्या जीवाला हि त्रास नको आणि माझ्या हि. हाउसकिपिंगची सुविधा हल्ली महाराष्ट्रात हि आहे. त्यांना बोलवावे, सगळी साफसफाई करून घ्यावी, उगाच का एवढा त्रागा? असे हि जी हे काम आपलेपणाने करते ती काही मोबदला तर मागत नाही, हो पाडव्याला तिला सरळ म्हणावे कि बाई तुला त्रास नको म्हणुन हाउसकीपिंग वाल्यांना बोलावले कि नाही. मग आता काही भेटवस्तु मिळणार नाही. एका शब्दाने हि काही बोलणार नाही. चुक खरे तर बायकांचीच आहे, नाही आवडत समोरच्याला, नाही मन एखाद्याचे तर का म्हणुन आपले समजुन गोष्टी सांगाव्या. त्यापेक्षा चार पैसे देऊन एखाद्याकडून काम करून घ्यावे. समोरच्या माणसालाच दिवाळीसाठी तेवढी मदत. पण शेवटी पैसा पण घरासाठीच वाजवतात न, जाऊ द्या हो बाबासाहेब, आम्ही बायका अश्याच आहोत, स्वभावाला औषध नाही, राहिले उपायाचे तर हा धागा तुमच्या बायकोला वाचायला द्या, पुढच्या दिवाळी पासुन तुम्हाला गृहीत धरणे सोडले जाईल अगदी तुमच्या मनासारखे.

In reply to by भावना कल्लोळ

भावनाताई,माझ्या मनात आनी डोळ्यात भावनांचा अगदी कल्लोळ कल्लोळ दाटुन आलो हो.पण आमची जगदंबा तिला ह्याचा काहीच उपयोग होत नाही. माझ्या घरातली आनी हापिसात जितकी म्हणुन कामगार मानस हायती अगदी माझ्यासकट ती त्या सगळ्यांना कामाला लावती.आणी असही आम्हाला त्यांनी कधी गृहित धरल्याल मागच्या दहा वर्षात आठवतच नाही बघा.आखिर नाविलाज को क्या विलाज है बाबा !

पुरुषांच्या धाग्यावर म्हैलांना गोंधळ घालताना पाहून एक पुरुष मिपाकर म्हणून शरम वाटली. (शरमून रात्रीऐवजी दिवसा बाहेर पडणारा) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. फिर्यादीची तक्रार आमच्या विरुद्ध असल्याने आम्हाला धिंगाणा घालायचा पुर्न हक्क आहे. पण तुझा काय संबंध? तुला बायको नाही आणि सांभाळायला पोरं पण नाहीत!! आणि बायकोच्या जाचाची सर आईला नाही. त्यामुळे तु तर राहुच दे.. (अवांतर - ह्याचं लग्न करुन द्या रे.. मग बघु या मज्जा...!! (परत एकदा पैतै ची स्मायली + ही ही ही)

In reply to by पिलीयन रायडर

>>>> बायकोच्या जाचाची सर आईला नाही. त्यामुळे तु तर राहुच दे.. हाहाहा लंबर एक. फार्मात आहात. सच्यासारखी खत्रा फलंदाजी चालू आहे. मस्त. समस्त पुरुषांना विनंती की इकडे या धाग्याकडे फिरकू नका. :) -दिलीप बिरुटे

In reply to by पिलीयन रायडर

*mosking * *JOKINGLY * 8 P 8 p ही घे पिरा स्मायली! JOKINGLY नंतर मी स्पेस टाकली आहे ती काढ अन स्टार चिटकव. झाली स्मायली. mosking नंतर पण तेच अन एट पी मधलही अंतर काढ.

In reply to by पिलीयन रायडर

आम्हालाच खरा हक्क आहे. आम्ही फिर्यादी आहोत. पण तुला काय हक्क आहे? आरोपी ते आरोपी अन वर फिर्यादीच्या उलटी फिर्याद? त्यामुळं राहूच दे. (अवांतरः लग्न करूनही न सुधारणे हा स्त्रियांचा गुणविशेष म्हणावा काय?) -एलियन स्पायडर.

In reply to by बॅटमॅन

ब्याट्या..... तुला माहीत आहे का एका सर्व्हे ने असे दाखवुन दिलय की स्त्रीया पुरुषांपेक्षा अधीक आनंदी असतात. त्या अधीक जगतात" कारन सोप्पय रे. "स्त्रीयाना बायको नसते "

In reply to by विजुभाऊ

=)) =)) ऐकलेय खरे अशा सर्व्हे बद्दल. बाकी, ज्यांना स्त्रियांत रस असतो अशा स्त्रियांबद्दलचा सर्व्हे काय म्हणतो तेही वाचायला आवडेल ;)

अब आ रहा है मजा.मोगँबो खुश हुआ.....

समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू कळकळीने मांडताना पाहून ड्वाॅले पानावले. मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो. मदत तर घ्यायचीच पण केलेलं अख्खं काम स्वतःच राबून केलं या थाटात वावरायचं. :-)

In reply to by किसन शिंदे

>>>> मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो. शाब्बास. आत्ताशी कुठं बरं वाटलं. अजून येऊ दे....! :) -दिलीप बिरुटे

In reply to by किसन शिंदे

तीन प्रश्न १. कळकळ कुठे दिसली? (कडकड, कट कट दिसु शकेल.. कळकळ??) २. तुमचं लग्न झालं आहे का? (नसल्यास हा प्रतिसाद फाऊल आहे..) ३. तुम्ही संपादक आहात ना? (इन दॅट केस.. कसं काय मालक? चला चहा पाणी करुन येऊ.. दमला असाल..!!)

In reply to by किसन शिंदे

येकच नंबर किसनद्येवा!!! "पुर्षांच्या धाग्यावरि म्हैलांचा घाला आला आला सावध करा किसनद्येवाला सद्गदिता पुर्षांच्या ओ दे हाकेला करुणारव साचा तव कानी जो गेला"

In reply to by बाबा पाटील

किसनद्येवा या गोपींना सद्बुद्धी दे रे बाबा!