Skip to main content

मुक्तक

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३)

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 24/06/2013 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
१० जुन २०१३ ती नेहमी मला बोलते, जेव्हा तू मला भेटतोस, हसत नाहीस.. जसा लग्नाआधी हसायचास.. जेव्हा लांबूनच बघायचास.. नजर पडताच खुलायचास.. आता तिला कसे समजवू, उगाच हसता येत नाही मला, आणि कृत्रिम हसायला तर मुळीच जमत नाही.. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती.. आता तुला भेटणे आणि तुझ्याबरोबर घरी जाणे रोजचेच आहे.. रोज तशीच तूच दिसणार हे ठाऊक आहे.. मग का उगाचच ते औपचारीक हसणे.. पण.., गेले दोनचार दिवस मात्र हे रुटीन बदलले होते.. तिच्या कॉलेजला सुट्ट्या, तर घर ते ऑफिस माझ्या एकट्याच्या वार्‍या.. आजही एकटाच होतो.. आणि ती कसल्याश्या कामासाठी बोरीबंदरला गेली होती. ऑफिसातून निघता निघता आठवले, श्या..!

फुकटची समाजसेवा -पुढे

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 23/06/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुम्बैच्या अश्विनी रुग्णालयात इंटर्नशिप करीत असतानाची (१९८८) गोष्ट आहे. एके दिवशी रात्री साधारण साडे आठ वाजता एका नौदलाच्या अधिकारी(लेफ्टनंट कमांडर यादव) एका पोस्टाच्या कर्मचार्याला घेऊन आला. त्या अधिकार्याने स्कूटर चालवत असताना या कर्मचार्याला धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या वादात तो त्याला नौदलाच्या रुग्णालयात घेउन आला होता. मी त्या कर्मचार्याची तपासणी करू लागलो तेवढ्या वेळात तो नौदल अधिकारी तेथून पसार झाला. मी त्याची तपासणी केल्यावर माझ्या असे लक्षात आले कि त्याच्या घोट्याला वाईट फ़्रैक्चर आहे आणि त्याची शल्यक्रिया करणे आवश्यक आहे.

फुकटची समाजसेवा

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 23/06/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
तसा माझा मूळ पिंड समाजसेवेचा नाहीच. इतर लोकांच्या सारखी सोसल तेवढी सोशल सर्व्हिस मी पण करतो . पण वैद्यकीय व्यवसायात फारसे कष्ट न करता समाजसेवा करता येते त्याचा हा एक वृत्तांत. पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मध्ये काम करीत असताना ची गोष्ट आहे. तेथे दहा रुपयाचे कार्ड काढले कि कोणतीही सेवा ( औषधासकट) फुकट मिळवता येत असे यात फक्त कर्करोगाची औषधे अंतर्भूत नव्हती ( कारण कर्करोगाचे उपचार तेथे सिव्हिलियन साठी नव्हते ) मी तेथे क्ष किरण विभागात कामाला होतो आणि आर्मीच्या हिरवट खाकी(OLIVE GREEN) गणवेशात मी एकटा नौदलाच्या पांढऱ्या वेशातील बगळा होतो. त्यामुळे रुग्णांना मला ओळखणे फार सोपे होते.

चारधामच्या निमित्ताने

लेखक तिमा यांनी रविवार, 23/06/2013 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
चारधाम यात्रा करावी का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या भयानक आपत्तीमुळे चारधाम, विशेषतः केदारनाथ गाजते आहे. पण या लेखाचा विषय तो नाही. मी जेंव्हा चारधामांना भेट दिली त्याचे सचित्र प्रवासवर्णन करण्याचाही या लेखाचा हेतू नाही. तर एकंदरीतच, जे अनुभव आले त्यातून आपल्याला काही बोध घेता येतो का, याविषयी हा लेख आहे. चारधामला मी जाणार, हे कळल्याबरोबर माझ्या समविचारी मित्रांनी थट्टा केली. 'अरे,तू इथे कधी कुठल्या देवळात जात नाहीस, कुठल्याही दिवशी तुझा उपास नसतो, ३६५ दिवस तू सामिष आहार करु शकतोस, तर तिथे जाऊन काय करणार आहेस?' अशा प्रकारच्या कॉमेंटस ऐकल्या.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 21/06/2013 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
८ जुन २०१३ पहिल्या पावसाची चाहूल लागल्यापासून बायकोचे कुठेतरी लांबवर फिरायला घेऊन चल चालूय.. तिचेही खरेच आहे.. पावसाळा हा काही खिडकीतून बघायचा उत्सव नाही.. कडाडणारी वीज अन गडगडणारे ढग.. घरबसल्याच धडकी भरवतात.. जणू काही शत्रू अंगावर चाल करून येतोय.. पण मैदानात उतरायचे ठरवल्यास तेच जोडीदार बनून राहतात.. तरीही लांबवर कुठे जायचे म्हणजे वेळ हवा, सुट्टी हवी.. पैशाचेही सोंग काही घेता येत नाही.. जमेल तेव्हा जाऊच, पण आजची संध्याकाळ भाऊच्या धक्क्यावर घालवूया म्हणालो.. हो ना करता झाली तयार.. भाऊचा धक्का..! टॅक्सी पकडली की मीटर पडायच्या आधी येते.. तरीही चार सहा महिने वर्षातूनच जाणे होते..

कृष्ण - एक विवेचन

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 19/06/2013 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कृष्ण या रचनेवर कधीतरी लिहावे असे मनात होते. बहुदा, ह्या रचनेचा मला अभिप्रेत असलेला अर्थ मी रचनेतून योग्य रित्या पोहचवू शकलो नाही. अर्थात हा माझाच एक कवी म्हणून पराभव म्हणायला लागेल. कुठलीही रचना करतांना ती सुबोध आणि सहज व्हावी हाच उद्देश असतो, पण कां कोण जाणे हि रचना तशी झाली नाही. मग विचार केला, थोड लिहाव यावर आणि सांगाव कि मला नक्की काय अभिप्रेत आहे ते. म्हणून हा लेखनप्रपंच.कृष्ण ह्या व्यक्तिरेखेला अगणित पदर आहेत. प्रत्येकाला तो वेगळा दिसतो आणि यातच व्यासांच्या अतुलनीय प्रतिभेचे यश आहे.

आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 01/06/2013 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
हि १९९९ च्या मी महिन्यातील गोष्ट आहे.मी विशाखापटणमच्या नौदलाच्या कल्याणी या रुग्णालयात काम करीत होतो. कारगिलचे युद्ध ऐन जोरात होते. त्यावेळेला काश्मीरच्या लष्करी रुग्णालयात युद्धात जखमी झालेले जवान मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत होते त्यामुळे ती रुग्णालये(श्रीनगर, उधमपूर आणि जम्मू येथील) भरून गेली होती.त्यातून त्या जखमी रुग्णांचे नातेवाईक तेथे येऊ लागले होते. या सर्व गर्दीमुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडू लागला होता. म्हणून आता नंतर येणाऱ्या रुग्णांवर जलदगतीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने एक निर्णय घेतला कि जे जे जवान प्रवास करू शकणार होते आणि ज्यांची जायची तयारी होती.

डोंबिवली कट्टा वृत्तांत..

लेखक नानबा यांनी गुरुवार, 30/05/2013 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत कट्टा करायचा असं मुक्त विहारींनी ठरवलं, आणि कट्टा होणार की नाही इथपासून तुम्ही डोंबिवलीकरांनी राजकारण केलंत पर्यंतच्या ब-याच चर्चा मिपावर घडून आल्या. पण काहीही झालं तरी कट्टा करायचाच असा ठाम निर्धारच मु.वि. नी केलेला असल्यामुळे अखेरीस ठरलेल्या दिवशी, रविवार २६ मे, रोजी, नंदी पॅलेस मध्ये कट्टयाचा बेत ठरला. कट्ट्याची उपस्थिती किती हा मुद्दा गौण असल्याने जितके आले ते कट्टेकरी. आलो तर येईन पासून रात्री उशीर होईल पण नक्की येईन असं सांगून टांग देणारे वगळले, तरी ४ जण नक्की येणार हे कळलं. मुलूंडच्या डॉ.

पंचम पुरीवाला, ऑप.जी.पी.ओ, मुं.४००००१

लेखक १००मित्र यांनी बुधवार, 29/05/2013 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
माहितिये ? पंचम पुरीवाला ? इथली पुरी भाजी खास भय्या स्टाइल, क्रमांक १ ची, वादच नाही. माझे एक नातेवाईक- जे आर.बी.आय. मधे असतात, ते तर म्हणतात : पु~या साजूक तुपातल्या असतात म्हणे. असो.माझे वडील आम्हाला पूर्वी इथे कायम घेऊन जायचे. मुळात मुलुंडसारख्या उपनगरातून त्या वेळी ( साधारण ७९-८० चा काळ असेल तो) VT ला जाणं, हेच मुळी कस्सलं भार्री वाटायचं तेव्हां. तर एकदा दादा मला ह्या पंचम पुरी वाल्याकडे घेऊन गेले.

पहिला पाऊस

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 29/05/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
नो चिकचिक नो झिगझिग अन दरवळणारा मातीचा वास आज आमच्याइथे पहिला पाऊस पडला ! अंग भिजवायला पुरेसा नव्हता, मन मात्र पार न्हाऊन निघाले.. - तुमचा अभिषेक