रागावणे – समजावणे
लेखनविषय:
काव्यरस
........................१.............................
रागवलेली ती, समजूत काढणारा मी
रागवलेला मी, समजूत काढणारी ती
या दोन विरुद्ध गोष्टी आहेत
.
ती रागावली कि
तिची समजूत काढणे सोपे आहे
ते जमते आजकाल मला
पण तिच्यावर रागावून
ती समजूत काढत असतांना
रागावलेलेच राहणे फार अवघड असते
ते अजूनही जमलेले नाही मला
.
कसं असतं ना,
समजूत काढणारा नेहमीच
समजूतदार असतोच असे काही नाही
पण सांगणार कोणाला?
........................२.............................
रागावलेली ती लगेच लक्षात येते
रागावलेला मी तिला कळतोच असे नाही
कां कळूनही वळत नाही?
.
आपल्या माणसावर रागावणे
हा आपला हक्क जरूर आहे
.
पण आपलं माणूस आपल्यावर रागावले आहे
हे कळायला तर हवे ना?
नेमकी इथेच गडबड होते
........................३.............................
रागवायला काही कारण
लागतेच असे नाही
पण
समजूत काढायला
एकच कारण पुरते
.
"ती रागावली आहे"
........................४.............................
बर्याच वेळा माझी समजूत असायची
मी तिची समजूत काढली आहे
.
हो, पण बर्याच वेळा
........................५.............................
मी तिची समजूत काढतो
तेव्हा मी खूप बोलतो
अगदी मनापासून बोलतो
मन लावून ती ऐकते देखिल
.
ती समजूत काढते तेव्हा
फक्त एकदा
मनापासून डोळ्याला डोळा भिडवून
डोळ्यांनीच सग्गळं सांगून टाकते
.
मग मी पत्करतो त्याला म्हणतात,
"संपूर्ण शरणागती"
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(कधीतरी असंच सुचलेलं)
वाचने
7147
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
अगदी मस्त लिहिले आहेस, बरोबर भावना पकडुन
समजूत काढायला एकच कारण पुरते . "ती रागावली आहे"आणि शेवटच्या ओळी तर खासच.
मग मी पत्करतो त्याला म्हणतात, "संपूर्ण शरणागती"
आवडली....
मस्तच ! :)
वाह मिका वाह!!!!!!!!!!
सुरेख
छान
सुरेख.
स्वगतः आता 'ती'ला विचारलं पाहिजे :-)
'गोड' कविता!
रागा'वलेली कविता अवडली. :)
एक अन एक पैलू अचूक ! पकडलंयत बरोब्ब्बर.
क्या बात है! अर्थातच सुरेख लेखन. ग्रेट.
असचं काहीसं होत असावं,
मी रागावलेली असतांना अन् तो समजूत काढतांना
कविते समोर
"संपूर्ण शरणागती"
कविते समोर
"संपूर्ण शरणागती"
हे-
कसं असतं ना, समजूत काढणारा नेहमीच समजूतदार असतोच असे काही नाही पण सांगणार कोणाला?हे-
समजूत काढायला एकच कारण पुरते . "ती रागावली आहे"आणि हे भारीच-
बर्याच वेळा माझी समजूत असायची मी तिची समजूत काढली आहे . हो, पण बर्याच वेळा
आणखी एक मिका स्पेशल!
कातिल, चाबुक
हो मिका , मला फक्त तुझ्याच कविता कळतात.
शेवटची तर अगदी मार डाला होती.
मी रागावतो तेंव्हा
लगेच कळतं...
स्वतःवरच रागवायचं?..कशाला?
आणि आकाश लगेच मोकळं होतं.
पण ती रुसते तेंव्हा जो दुभंग
माझ्यात होतो त्याला उत्तर नसतं
.
पण आताशा तो दुभंग ओढवायचा
कमी झालायं,
ती समजूतदार झालीये, की
सारं आकाश एक झालंय?
कुणाला कल्पना नाही, आणि...
कुणाला त्याचं उत्तर ही नकोय.
In reply to सुरेख! याला आणखी एक पैलू आहे by संजय क्षीरसागर
मस्त संक्षी!!
In reply to मस्त by मिसळलेला काव्यप्रेमी
काव्यविषय जीवघेणा आहे म्हटल्यावर काही तरी सुचणारच!
In reply to सुरेख! याला आणखी एक पैलू आहे by संजय क्षीरसागर
वा , सुंदर ओळी संजय क्षिरसागर .
काही माझ्याहि ,
तो रागवलाय हे लवकर उमगत नाहि
रागात आहे असहि न्हनवत नाही
माझ्या रागाचं मात्र त्याला कौतुक
समजुत काढल्याविना तो काय राहात नाहि !
हल्ली मीच जास्त रागवत नाहि
त्याला वाटतं मी अबोल झालीय
"तु हल्ली समजुत घालायचा चांसच देत नाहि "
यावरच बर्याचदा वादावादि झालिय !
मस्त हो मिका!
आवडली. आम्ही फक्त मिका हे नाव बघून काव्य विभागात येतो.
In reply to आवडली. आम्ही फक्त मिका हे नाव by सूड
ह्यालाच आम्ही कंपू बाजी म्हणतो...
एका वाक्यात हजारो प्रश्न उभे राहीले त्यातले निवडक....
१. आम्ही = किती जण
२. प्रतिसाद देणारा स्वतःला इतका मोठा का समजतो?
३. म्हणजेच प्रतिसाद कर्ता पुण्याचा असावा काय?
४. फक्त मिका = इतर कुणी कविता पाडतच नाही का?
५. "मोकलाया ...." ही कविता वाचली आहे का?
शब्दात पकडलेल्या भावनांना दाद देऊ की भावनांना पकडणाऱ्या शब्दांना !
कविता छान लिहिली आहेस रे बाळा. जुने दिवस आठवले.
हम्म, आता कुणी रागावत नाही आणि कुणी समजुतही काढत नाही. फक्त एकमेकांचे दुखरे सांधे मोजायचे दिवस आलेत रे!
ती समजूत काढते तेव्हा फक्त एकदा मनापासून डोळ्याला डोळा भिडवून डोळ्यांनीच सग्गळं सांगून टाकते . मग मी पत्करतो त्याला म्हणतात, "संपूर्ण शरणागती"तोडच नाहि... आपली पण संपूर्ण शरणागती!!
मस्त...
आवडेश
मस्त लिहिलीये.
शेवटी "संपूर्ण शरणागती">>>अगदी असेच म्हणतो!!!
अगदी गोड कविता आहे.
'त्या'च्या भावना अगदी नेमक्या शब्दात. मस्तच रे मिका!! :)
खूपच आवडली ही रचना. :)
नेहमीपर्माणेच रे मिका.
एक नंबर कविता.
ब्याडप्याच संपवून आता आलायस तर येऊ देत तुझ्या कविता.
छान!
भले शाब्बास