राजकन्या दबा धरुन बसली होती. तिच्यापेक्षा तिप्पट मोठया राक्षसाला हरवायचे तर अनपेक्षीत हल्ला करणे आवश्यकच होते आणि अनपेक्षीततेचे शस्त्र कुशलतेने वापरण्यात राजकन्या वाकबगार होती. पट्टीच्या शिकार्यासारखी, श्वास रोखून, संधीची वाट पहाणारी राजकन्या आणि डुलत डुलत येणारा अनभिज्ञ राक्षस! आपल्या कावेबाजपणे युद्धाचा निकाल पहिल्यापासूनच आपल्याबाजूने करुन घेतलेला असला, तरी राजकन्या अजिबात गाफील रहाणार नव्हती.
राक्षस टप्प्यात येताच एक गगनभेदी आरोळी ठोकून राजकन्येने झेप घेतली. अवचित हल्ल्याने गांगरलेल्या राक्षसाला संधी न देता तीने निष्ठुरपणे घाव घातले. राक्षस धडपडला, कोसळला! एक प्राणांतिक आरोळी ठोकून गतप्राण झाला! राजकन्येचा युद्धज्वर अजून उतरलेला नव्हता. राक्षसाच्या छातीवर नाचून तीने विजयी गर्जना केल्या. जरा शांत झाल्यावर राक्षस खरंच मेलाय याची खात्री करण्यासाठी एकदोन मुष्टीप्रहार केले. राक्षसाने जीभ आणखीनच बाहेर काढली व डोळे जास्तच पांढरे केले. राजकन्येची खात्री पटली. मेलेल्याला आणखी मारण्यात आता तीला स्वारस्य नव्हते.
तीचा युद्धोन्माद ओसरला होता. हाती घेतलेले एक कार्य तडीस नेले होते. मारामारीचा तीला कंटाळा आला होता आणि आता दुसरी क्षितीजे तीला खुणवायला लागली होती. त्या क्षितीजांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी साधन हवे होते.
मरुन पडलेल्या राक्षसापाशी राजकन्या गेली व म्हणाली,
"ए आब्बा, उथ. माजा घोला हो"
राजकन्येला साथ देण्यासाठी म्हातारा राक्षस उठला आणि आनंदाने घोडा झाला.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8230
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
कित्ती छान! गोग्गोड कथा!
सुंदर
छान झाली आहे
हाहा!
हा..हा..हा आवडली.
मस्त मांडणी
मस्त कथा...
छान कथा
सुंदर! सुंदर!! सुंदर!!!
:-) खूप छान!
मस्त मस्त मस्त
छान छान :)
अरे वाह, खूपच मस्तं.
कथा आवडली ओ आजोबा
पयले तर समजलच नाही, समजल्यावर
मस्तं कथा ! सुंदर शेवट !!
लैच गोड!
आले बापले!
:) गोड गोष्ट!
गोडुली गोष्ट !
:)
धन्यवाद!
आंतरजालावर अशीच एक कथा वाचलेली आठवत आहे....
In reply to धन्यवाद! by सातबारा
छान आहे कथा :) आवडली.
छान छान :)
मस्त
मस्त कथा ! शेवट भारीच.
मला वाटलं
छान आणि सुरस कथा! पुढच्या
क्लास!
सुपरलार्ईक!!
कित्ती कित्ती गोड गोष्ट आहे.
आसेच म्हण्तो....
In reply to कित्ती कित्ती गोड गोष्ट आहे. by स्रुजा
मस्त आहे हो रत्नजडीत ऊडणारा म्हातारा घोडा
आपल्या कावेबाजपणे युद्धाचा
मस्त कथा .
फारच छान
अय्यो! गोडुली राजकन्या :)
हीहीही मस्तच कथा
गोड गोष्ट.
मस्त