Skip to main content

मौजमजा

कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 10/02/2015 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, पुणेकरांचे कशेळी कट्ट्याचे आयोजन झाले देखील. पण अद्याप मुंबईकरांचे कुठलेच आयोजन नसल्याने, हा विषय मांडत आहे. कालच माझे आणि कंजूस ह्यांचे बोलणे झाले. शनिवारी १४-०२-२०१५ला, सकाळी ९-२०ची कर्जत लोकल ते डोंबिवलीहून पकडणार आहेत. मी पण तीच लोकल पकडणार आहे. माझ्या बायकोची जर्मनची परिक्षा त्याच सुमारास असल्याने, ती येणार नाही. कळावे, आपलाच मुवि.

गलित आहे गात्र अजुनी

लेखक चिमिचांगा यांनी शनिवार, 07/02/2015 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय !

Wrong Number

लेखक NiluMP यांनी शुक्रवार, 06/02/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लँडलाईनच्या काळात राॅंग नंबर म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी होती. टेलेकम्युनिकेशन आणि मोबाईल क्रांतीमुळे त्यातुन सुटका झाली. पण मार्केटिक काॅलमुळे नवीन डोकेदुखी सुरु झाली पण राॅंग नंबर व मार्केटिक काॅलमुळे करमणूकही होते कशी याचेच काही किस्से मी सांगाणार आहे किस्सा 1. सर्वसाधारणपणे आपण ज्याला फोन करतो त्याची खात्री करुन आपल्याला ज्याच्याशी बोलयचे आहे त्याचे नाव सांगतो.

पहिलेवहिले मराठी चावटसाहित्य संमेलन पुण्यात संपन्न

लेखक चिमिचांगा यांनी बुधवार, 04/02/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले अखिल वैश्विक मराठी चावटसाहित्य संमेलन कालच पुणे येथे संपन्न झाले त्याचा वृत्तांत... मराठी साहित्यविश्वात संमेलनांची वानवा नाही. नेहमीच्या साध्या साहित्यसंमेलनाबरोबरच कुठे विद्रोही साहित्य संमेलन, कुठे स्त्रीसाहित्य संमेलन, कुठे विद्रोही स्त्रीसाहित्य संमेलन, मुस्लिम साहित्यिक संमेलन, कविसंमेलन, नाट्यसंमेलन, झालंच तर वैदर्भी, कोकणी, खानदेशी अशा प्रादेशिक फ्लेवरची संमेलने, खेरिजकरून विविध साहित्यजत्रा, उरूस, यांचा रतीब सर्वकाळ चालू असतो.

डेथ ऐप्लिकेशन

लेखक म्हया बिलंदर यांनी रविवार, 01/02/2015 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
सर - ह्यालो मी - हं सर बोलाना ? सर - आरं आईक की. . मी - हं सर - त्यो आपला ह्यो हाय का.. गणू ? मी - म्हणजे डॉ. गणेश ना? त्याचं काय? सर - हा त्योच, त्याचा बा म्येलाय तर त्यो गेलाय सुट्टीवर मी - अरेरे. . वाईट झालं. सर - तर त्याला लिहायचय डेथ ऐप्लिकेशन. मी - सर, लीव ऐप्लिकेशन सर - त्येच, मी सुरुवात करून दिलीये फुडच्या दोन ओळी जरा सांगचिल का ? मी - हो सर, काय लिहिलंत? सर - Dear Sir, आता सांग. मी - Dear Sir, I am sorry to inform… सर - Sorry? Sorry कशाला?

अगा जे घडलेची नाही...अर्थात न उडालेले वैदीक विमान !

लेखक स्वप्नांची राणी यांनी शनिवार, 31/01/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्‍या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अ‍ॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.

गुपित- एक गुढ रहस्यमय रुपक कथा -एकाच भागात संपुर्ण

लेखक जेपी यांनी सोमवार, 26/01/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
"कस होणार या पोराच !." पार्थचे बाबा ,पार्थाच्या आईकडे पहात म्हणाले. "जाऊ द्या हो, अजुन लहान आहे आणी काही वाईट तर करत नाही ना!." पार्थची आई. पार्थ मात्र स्वतः मध्येच मग्न होता.पार्थ लहान असताना हातात उदबत्ती घेऊन बोबड्या भाषेत देवापुढे..जय..जय..करायचा तेंव्हा सगळ्यांना त्याचे कौतुक वाटायच, पण पार्थ आता आठ वर्षाचा झालता.सुट्टीच्या दिवशी त्याच आवडत काम म्हणजे,देवाची पुजा करणे..देवपुजे मध्ये तो तास-दोन तास सहज रमुन जायचा.देवांना स्नान घालणे,वस्त्रानीं पुसणे. त्यांना गंध लावुन जागे वर ठेवणे हे मन लावुन करायचा.नंतर पाच-दहा मिनीट हात जोडुन प्रार्थना करायचा. पार्थ लहानपणापासुन आपल्या आजोबांना पुजा क

महालक्ष्मी सरस २०१५.

लेखक कविता१९७८ यांनी सोमवार, 12/01/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा अनाहीताचा महालक्ष्मी सरस कट्टा मिसला आणि नंतर सविताचा कट्ट्याचा वृतांत वाचल्यापासुन कट्टा मिसल्याची हुरहुर लागली. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता अजयाने महालक्ष्मी सरस ला रविवारी येणार का विचारल्यावर लगेचच होकार देउन टाकला. रात्री आरोहीने सांगितले ती ही येणारे मग तर तिला भेटायची उत्सुकता लागुन राहीली.