इक बंगला मेरा न्यारा--२
पूर्वसूत्रः-
त्याची आई, गोंधळलेल्या नजरेने , त्याला बळेच घेऊन गेली.
मी चुटकी वाजवली, हां, म्हणजे हा मुलगा 'श्यामलन' चे सिनेमे नक्की पहात असणार तर! अब आयेगा मझा!!!
दोन दिवस नुसतेच गेले. तिसर्या दिवशी सकाळी मुंबईहून मुलगा आला. काम सोडून यावे लागल्यामुळे थोडासा त्रासलेला वाटला. कोचावर स्थानापन्न झाल्यावर घरातल्या कुटुंबप्रमुखाने विषयाला हात घातला.
"तुम्हाला तसदी दिल्याबद्दल सॉरी, पण इथे हिला आणि माझ्या मुलाला जरा वेगळे अनुभव येत आहेत."
"काय झालं ?" मुलाने विचारलं.
" माझ्या मुलाला वरच्या खोलीत एक आजोबा दिसले, असं तो म्हणतो. पण आम्हाला काहीच दिसलं नाही." त्यामुळे, ही जरा अस्वस्थ झालीये.
मिसळपाव
.
शब्दांमागे धावण्यात
'बघणं' राहूनच गेलं
रस्त्याकडेचं इवलं रोपटं
कुणी न बघताच मेलं
शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको
'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात
सौंदर्यगंध दरवळतो
समजून घेण्याच्या नादात
तोच नेमका हरपतो
समोर अप्सरा उभी
तिचं आधी नाव सांगा
वय-जात-उंची-शिक्षण
सगळं तपशील्वार सांगा
सांदि-कोपर्यात डुलणारं फूल-
त्यात विशेष क