मनातल्या मनात !!
लेखनप्रकार
बरेच दिवस मनाविषयी चार ओळी टंकायची इच्छा होती. पण मन मानत नव्हतं :) आता थोडं मनावर घेतोय.
आजवर मनावर जितका विचार झालाय तेव्हढा कदाचीत कुठल्याच विषयावर झाला नसावा. तत्वज्ञ, कवि, साहित्यीक, वैज्ञानीक, दार्शनीक... किंबहुना अवघी मानवजात या एका विषयाचं गेली कित्येक शतकं चिंतन करतेय. पण मन बालकृष्णासारखं समस्त वैचारीक ब्रह्मांड व्यापुन दशांगुळे उरतच. मनच ते.
साधारणपणे 'भावना' या विषयाला धरुन मनाचा अभ्यास सुरु होतो. 'विचार' आणि/किंवा भावना या दोन घटकांची संगती लावणं हा फार मजेदार विषय आहे. प्रचंड मोठं शास्त्र उभं आहे याचा अभ्यास करायला. अलीबाबाची गुहाच ति. यच्चयावर मानवी व्यवहारांचे धागेदोरे अत्यंत क्लीष्ट, पण तेव्हढेच नेमकेपणाने गुंफलेले आढळतात मनाच्या महावस्त्रात.
आता प्रश्न येतो कि हि भावना म्हणजे नेमकं काय. सोप्या शब्दात सांगायचं तर एक विशिष्ट क्रिया करायला शरीराला सज्ज करण्याची यंत्रणा म्हणजे भावना. जीवशास्त्रं म्हणतं कि प्रेरणेला प्रतिसाद देणं हे सजीवाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. शुद्ध मराठीत आपण त्याला रिस्पॉन्स टु स्टिम्युलस म्हणतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या प्रेरणा प्रकारांबरहुकूम शरीराने प्रतिक्रीया द्यावी म्हणुन शरीराला एका विशिष्ट अवस्थेत घेऊन जाण्यासाठी जे काहि रासायनीक उपद्व्याव शरीरात होतात त्याला आपण भावना म्हणतो. साधारणपणे हि क्रिया क्षणार्धात होते. संकटाची चाहुल लागली कि हरीण कान टवकारतो, नाग फणा काढतो, सरडा रंग बदलतो, भीमाचे स्नायु फुरफुरतात, धर्मेंद्रच्या जिभेवर कमिने-कुत्ते वगैरे शब्द आपापली पोझीशन घेतात. प्रेरणेची दाहकता, शरीराची घडण व इतर परिस्थितीनुसार या क्रियेची लांबि-रुंदी बदलते. उद्देश मात्रं एकच. रिस्पॉन्स टु स्टिम्युलस.
मनाचा दुसरा घटक म्हणजे विचार. इतर प्राण्यांच्या मानाने मानवाला हे वैचारीक दान अगदी भरभरून देण्यामागे निसर्गाची काय इच्छा असेल कोण जाणे. पण माकडसदृश एका प्राण्याचा मेंदु एका विशिष्ट प्रकारे डेव्हलप झाला. त्या प्राण्याला आपण मानव असं नाव दिलं. शरीराचे इतर उपद्व्याप सांभाळण्यापलिकडे या मानवी मेंदुचं काम तसं बघितलं तर इतर प्राण्यांसारखच आहे. ते काम म्हणजे गणितीय समिकरणं. चित्त्याचा मेंदु भक्षावर फायनल झेप कधि घ्यायची याचं समीकरण मांडतो. एकदा झेप झाली कि भक्ष्य मिळो अथवा न मिळो त्याचे सरकारी बाबुसारखे संध्याकाळचे पाच वाजतात. धृवीय प्राणी याच न्यायाने पोटाचे पेटारे भरुन आपल्या शीतकालीन निद्रेची सोय करते. मोराचे नृत्य असो वा गोगलगाईचा विजेच्या चपळाईने केलेला प्रवास, सर्वांची समीकरणं काहि ठरावीक उद्दीष्टाच्या भोवती अगदी गच्च आवळलेले असतात. मानवाच्या बाबतीत मात्र या समीकरणांच्या जंत्रीचा परिघ फार म्हणजे फारच मोठा असतो. इतका मोठा, कि नेमका कुठल्या उद्दीष्टासाठी हि समीकरणं चालली आहेत हे कळेनासं व्हावं. हा परिघ इतका मोठा व्हायचं कारण म्हणजे मानवी मेंदुला इतर प्राण्यांच्या मानाने काळाचं अफाट भान असणे होय. चित्ता मागच्या-पुढच्या काहि क्षणांचा विचार करुन स्वस्थ बसतो. मानवी मेंदुसाठी अशा मागच्या-पुढच्या संदर्भाला काहिच मर्यादा नाहि. या परिघीय संदर्भांनाच आपण म्हणतो "विचार". या विचारांचं जंजाळ किती खोल असावं याचा काहि थांगपत्ता नाहि.
हा डोलारा सांभाळायला स्मृतीची सोबत असतेच. असं हे भावना आणि विचारांचं कॉकटेल घेऊन मानवी मेंदु आपली करामात दाखवत असतं. त्याची अनेक प्रतलं असतात. कुठली भावना विचारांच्या आश्रयाने समुद्रात बुडालेल्या एखाद्या जहाजाप्रमाणे मेंदुत कुठेतरी पडुन असेल व कधि उफाळुन वर येईल याचा नेम नाहि. विचारांच्या पृष्ठभागावर मेंदु एखादं समीकरण मांडत असेल. ते तसच खालच्या प्रतलांमधे गडप होऊन आपलं उत्तर शोधत बसेल. उत्तर सापडलं कि सरसरुन परत पृष्ठभागावर येऊन "सरप्राइझ" म्हणुन कधि बोंब ठोकेल सांगता येत नाहि. ब्रेनवेव्ह वगैरे प्रकरणं याच सदरात मोडतात.
हे सगळं मनुष्यप्राणी जंगलात रहायचा तोपर्यंत ठीक होतं. निसर्गाने मानवाला पक्षांप्रमाणे पंख दिले नाहि. हत्तीची शक्ती दिली नाहि. सापाचं विष दिलं नाहि. मासोळीची पोहोण्याची क्षमता दिली नाहि. हे सर्व कंपन्सेट करायला म्हणुन कि काय, एक प्रगत मेंदु देऊन टाकला... आणि लोचा झाला ना राव. माणुस झाडामाडांच्या जंगलातुन बाहेर पडला व त्याच्या मेंदुने आपलं स्वतःचं जंगल निर्माण केलं. आता शरीर टिकवायला भावना नामक सिस्टीम जुनीच, पण प्रेरणा निर्माण करणारे घटक मात्रं वैचारीक असं नवीन नाटक सुरु झालं. जंगलात असताना वाघाची डरकाळी ऐकुन भिती नामक भावना धावायची प्रेरणा उत्पन्न करायची. आता ऑफीसात बॉस ओरडला कि हिच भिती धावायला सांगते, पण प्रॉब्लेम असा कि त्याची गरजच नसते. मग आणखी नाटकं सुरु होतात. भावनांचा कंट्रोल काय, विचारांना आवरणं काय, सुख-दु:खांवर रामबाण उपाय काय, मनाला शटडाऊन करणं काय... बरच काय काय.
आपलं जगणं हि अशी मनाशी केलेल्या व्यवहारांची गाथा असते. खरं तर "मनाशी व्यवहार" वगैरे काहि भानगड नसते. कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते. मनाची कवाडं आपापसात कुजबुजतात फक्त. पण मनाचा व्यवहार वगैरे म्हटलं कि कसं एकदम फिलॉसॉफीकल वाटतं :)
कोळ्याने स्वतःच जाळं विणाव व आपणच त्रयस्थासारखं त्यात भटकत राहावं असं काहिसं मनाचं होतं. कल्पकता, बुद्धी, भावनांचा कल्लोळ, समीकरणं सोडवताना सतत बदलणार्या भुमीका, त्यातनं निर्माण होणार्या स्व-आयडेण्टिटी, सुख-दु:खांचे प्रसंग. मग त्यावर उपाय शोधताना इतर प्रश्न निर्माण होणं. असं सगळं मस्तपैकी चाललं असतं. त्यावर खात्रीशीर उपाय काहि सांगता येत नाहि. एक मात्रं नक्की. मनाशी व्यवहार करताना त्याला उगाच चिडवु नये. उदा. प्रसंग जर दु:खाचा असेल तर उगाच मुद्दाम त्याला कुठल्या अवडंबराखाली दाबु नये, कि नकारु नये, किंवा त्याला खोटा ठरवु नये. मनाला त्याचा स्वतःचा मार्ग काढण्याची मोकळीक दिली कि ते बरोबर आपलं आनंदनिदान शोधतच. आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा.
तर सांगायचा मुद्दा असा... मुद्दा वगैरे काहि नाहि. झोप येत नव्हती म्हणुन कळफलक बडवायला घेतला :) . झोपतो आता.
वाचन
30816
वाचनखूण
प्रतिक्रिया
128
माया राहिली.
हं.
आवडलं
..
In reply to .. by कवितानागेश
द कॅट इज आऊ ट ऑफ बॅग !
इज धिस वैचारिक गोंधळ?! ;)एका वाक्यात सगळं पकडलंय ! सगळाच गोंधळ आहे. आणि तो नेमका इथे आहे :कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते. मनाची कवाडं आपापसात कुजबुजतात फक्त. पण मनाचा व्यवहार वगैरे म्हटलं कि कसं एकदम फिलॉसॉफीकल वाटतं :)याला मनाशी तादात्म्य होणं म्हणतात. म्हणजे घोड्यावर स्वार असलेल्या मालकाचं, घोड्याच्या वेगामुळे त्याच्यावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटतं. त्याला वाटतं आपण आणि घोडा एकच आहोत. खरं तर मालक आणि घोडा असा फरकच राहात नाही. फक्त चौखुर उधळणारा, बेलगाम, (मनरुपी) घोडाच उरतो ! लेखातलं हे वाक्य फार बोलकं आहे :भावनांचा कंट्रोल काय, विचारांना आवरणं काय, सुख-दु:खांवर रामबाण उपाय काय, मनाला शटडाऊन करणं काय... बरच काय काय.घोड्याचा लगाम पूर्णपणे हातातून सुटला की असं होतं. मग घोडा नेईल तिकडं भरकटत फिरण्याशिवाय काही उपाय उरत नाही. याला सायकॉलॉजीत केमिकल लोच्या म्हणतात.In reply to .. by कवितानागेश
आता तुच बघ ना...
In reply to आता तुच बघ ना... by अर्धवटराव
नो, नो !
कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसतेम्हणजे घोडा आणि मालक एकच झालेत. आता मालकाला घोडा जुमानतच नाही हा गोंधळ लेखातून स्पष्ट होतोयंIn reply to नो, नो ! by संजय क्षीरसागर
नो नो नो !!
In reply to नो नो नो !! by अर्धवटराव
आपण घोड्यापेक्षा वेगळे आहोत याचं मालकाला विस्मरण झालंय
मनाला त्याचा स्वतःचा मार्ग काढण्याची मोकळीक दिली कि ते बरोबर आपलं आनंदनिदान शोधतच. आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा.घोडा आणि मालक एकच झाल्यानं, घोड्याचा गोंधळ आपोआप शांत होईल या हताश परिस्थितीत मालक सापडला आहे.In reply to आपण घोड्यापेक्षा वेगळे आहोत याचं मालकाला विस्मरण झालंय by संजय क्षीरसागर
आपल्याला कुणीतरी त्रयस्थ मालक आहे हा घोड्याचा भास आहे
In reply to आपल्याला कुणीतरी त्रयस्थ मालक आहे हा घोड्याचा भास आहे by अर्धवटराव
आता तीन डायमेंशन्सवर घोळ व्हायला लागला !
१) आपल्याला कुणीतरी त्रयस्थ मालक आहे हा घोड्याचा भास आहेज्याचं मनाशी तादात्म्य झालं त्याला स्वतःचा विसर पडतो. थोडक्यात मालकाला स्वतःचा विसर पडतो आणि घोडा हेच सत्य वाटायला लागतं. हा प्रथम चरणातला घोळ.२) आणि त्या त्रयस्थाकडे आपला कंट्रोल असल्याची गुलामगिरी त्याने स्विकारली आहे.हा नंबर दोनवर होणारा घोळ. मालक घोड्याचा गुलाम झाल्यानं त्याला आपण गुलामगिरी स्वीकारल्याचा भास होतो . मालकाकडे ताबा असला तर घोड्याला गुलामी वाटणार नाही कारण मालक आहे म्हणून घोडा आहे. घोड्याप्रमाणे मन ही युटिलीटी आहे.३) वास्तवीक 'तुझे आहे तुज पाशी' हे घोड्याला कळायला हवं.हा फायनल घोळ ! कळणारे आपण आहोत आणि ज्या बद्दल कळतंय (विचार, भावना, मूडस) ते मन आहे. पण मालक इतका मनशरण आहे की त्याला, मनालाच स्वतःच्या स्वातंत्र्याचा उलगडा होईल असं वाटतंय.In reply to आता तीन डायमेंशन्सवर घोळ व्हायला लागला ! by संजय क्षीरसागर
घोळ तर दिसतोच आहे.
In reply to घोळ तर दिसतोच आहे. by अर्धवटराव
आता गोंधळाचा परीघ वाढत चालला !
एखादी गोष्टीची आठवण असणं, विसरणं, एखादी गोष्ट समजणं, न समजणं हे सर्व जैवशास्त्रीयदृष्ट्या मेंदुचे, मानसशास्त्रीयदृष्ट्या मनाचे खेळ आहेत.एखादी गोष्ट आठवत नाही हे ज्याला कळतं ते आपण आहोत आणि ज्या यंत्रणेला ती आठवत नाही ते मन आहे. २)मालकपण आणि गुलामगिरी या दोन्ही मनाच्याच प्रॉपर्टी आहेत.गुलामगिरी ही मानवी कल्पना आहे ती मनात निर्माण होते. आणि ज्याचं स्वातंत्र्य हरवतं त्याला आपण गुलाम वाटू लागतो. मनाचा उपयोग करणारा कायम स्वतंत्र असतो पण सगळा कारभार मनाच्या हातात गेल्यामुळे स्वातंत्र्य आणि गुलामी या मनाच्याच अवस्था वाटतात. ३)एखादी गोष्ट कळण्याची गरज आणि शक्यता फक्त मनाच्या बाबतीत संभवते.हे म्हणजे आयटी क्षेत्रातल्या व्यक्तीनं`कंप्युटरलाच सगळं कळतं'असा विनोद करणं आहे ! ४)स्वातंत्र्य-पारतंत्र्य, शरण-अशरण हे सर्व मनाचेच भाव आहेत. त्यांचा अनुभव, उलगडा मनालाच होतो.मनाशी संपूर्ण तादात्म्यामुळे, गोंधळाचा परीघ व्यापक झाल्याचं लक्षण !In reply to आता गोंधळाचा परीघ वाढत चालला ! by संजय क्षीरसागर
भ्रामक समजुतींचा आणखी एक पुरावा आला.
In reply to भ्रामक समजुतींचा आणखी एक पुरावा आला. by अर्धवटराव
कन्फ्युजन अॅट इटस पीक !
१) डोळे बघतात, पाय चालतात, कान ऐकतात. पण हे सर्व एकाच शरीराचे अवयव आहेत. त्यांना भिन्न व्यक्ती मानणं हा महाविनोद आहे.पाय हालतायंत हे पायांना कसं कळणार ? गेलेल्या व्यक्तीचे डोळे उघडे असतील तर त्याला दिसेल काय ? कान हे एकण्याचं माध्यम आहे.कानांना ऐकू येत नाही. व्यक्ती कानांनी ऐकते. कान, डोळे, पाय, मन या भिन्न व्यक्ती आहेत असा माझ्या प्रतिसादातून अर्थ काढणं ही कन्फ्युजनची परमसीमा आहे. एकाच व्यक्तीला लाभलेल्या त्या भिन्न फॅकल्टीज आहेत. आणि फॅकल्टीजपेक्षा व्यक्ती कायम वेगळी आहे. अर्थात, थोडा जरी विचार केला तरी प्रकाश पडायची शक्यता आहे. उदा. कान असूनही बहिरा आपल्याला ऐकू येत नाही हे जाणतो. `कानांनी ऐकू येत नाही हे कानांना समजेल' ही वस्तुस्थिती नसून भ्रामक कल्पना आहे. २)वास्तवीक मनाची एक फॅकल्टी मनाच्या दुसर्या फॅकल्टीचा उपयोग करत असते, इंटरॅक्ट करत असते. हे सर्व काहि एकाच मनाच्या परिघात होत असतं. वस्तुतः हे विसरणं, आठवणं, कळणं, न-कळणं, सर्व काहि एकाच मनाच्या (किंवा मेंदुच्या) परिघात होत असतं.तोच गोंधळ कायम आहे. ज्याप्रमाणे पायांना आपण चालतोयं हे कळू शकत नाही त्याचप्रमाणे मनातल्या क्रिया मनाला समजणं असंभव आहे.मनाच्या स्कोपचं अत्यंत संकुचीत आकलन झाल्यावर आणखी काय होणार.जो `पाय चालतायंत हे पायांना समजतं' अशा भ्रामक कल्पनेत असेल, तो `स्वतःलाच मन समजतो'. तस्मात, ही सर्व पोस्ट मानसिक गोंधळाची झलक आहे. अर्थात हे सार्वत्रिक आहे त्यामुळे मनाशी तादात्म्य पावलेल्यांना ते योग्य वाटणार !In reply to कन्फ्युजन अॅट इटस पीक ! by संजय क्षीरसागर
याला म्हणतात कळतं पण वळत नाहि.
In reply to याला म्हणतात कळतं पण वळत नाहि. by अर्धवटराव
मनाचं पार्टीशन ? हे आता नवीन कुठून काढलं !
क्रिया घडायला एक मन (किंवा मेंदु) नामक यंत्रणा आणि ते कळायला दुसरीच यंत्रणा. या दुसर्या यंत्रणेला सगळं "आपोआप" कळतं.ज्याला कळतंय तो एकच आहे. नीट समजून घ्या : चालणं ही क्रिया पायांनी घडते, ती मेंदूपर्यंत पोहोचते आणि देह चालतोयं हेआपल्याला कळतं .आतापर्यंत तुमचा गोंधळ `पाय चालतायंत हे पायांना समजतं' असा होता. आता (माझे प्रतिसाद वाचून) तो थोडा दुरुस्त झाला आणि आता तुम्ही `मेंदूला कळतं' इथपर्यंत पोहोचलात."आपल्याला" घडणार्या क्रिया समजायला कुठल्या यंत्रणेची आवष्यकता नाहि वगैरे... कवि कल्पना म्हणुन ते ठीक आहे. वास्तवाशी त्याचा संबंध नाहि. सर्वकाहि एकाच मनाच्या परिघात घडतय.पायांचं चालणं, कानांचं ऐकणं वगैरे सर्व एकाच मन नामक यंत्रणेचं काम आहे हा मूळ मुद्दा दिला सोडुनतुम्ही काय लिहीतायं हे आता बहुदा तुम्हालाही समजेनासं झालंय. पुन्हा नीट वाचा : क्रिया आपल्याला घडत नाही. उदा. आपण चालण्याची इच्छा करतो : (१) ही इच्छा मेंदूमार्फत पायांप्रत पोहोचते (२) पाय चालतात आणि मेंदू ती प्रक्रिया नियंत्रित करतो (३) मग देह चालतो आणि (४) देह चालला आहे हेआपल्याला समजतं! तुमच्या आकलनात सगळं `एकाच मनाच्या परिघात' घडतंय. म्हणजे इतका गोंधळ आहे की पाय, मेंदू, ज्याला तुम्ही मन समजतायं ते गौडबंगाल, सगळं एकच आहे आणि .... जाणणारा (म्हणजे खुद्द आपण) बेपत्ता आहे !जे मन स्वतःलाच नाकारतय त्याच्याकडुन अजुन काय अपेक्षा करणार.मन हेच सर्वस्व आणि मनाशी फुल्ल तादात्म्य झाल्याचं हे लक्षण आहे. मला यापुढे प्रतिसाद देऊन वेळ घालवता येणार नाही. त्यामुळे प्रतिसादावरच्या तुमच्या उपप्रतिसादाला उत्तर मिळण्याची शक्यता कमी. तरीही या पोस्टवर इतरत्र कुठे गोंधळ दिसला (जो ठायीयीयी दिसेलच) की प्रकट होईन.In reply to मनाचं पार्टीशन ? हे आता नवीन कुठून काढलं ! by संजय क्षीरसागर
गोंधळ कंटिन्यु आहे म्हणायचा.
In reply to नो नो नो !! by अर्धवटराव
बरोबर.
In reply to बरोबर. by कवितानागेश
पण घोडं पेंड खातय त्याच काय ? ;)
In reply to बरोबर. by कवितानागेश
.
घोडा बाहेर काढला काय लपवला काय?! :)घोडा हे मनाचं रुपक आहे. पण घोडा बाहेर आलेला नाही, मानसिक गोंधळ पोस्टमधून बाहेर आला आहे. थोडक्यात, नॉट द हॉर्स, बट द कॅट इज आऊट ऑफ द बॅग ! अशा परिस्थितीत लेखकअंतःप्रेरणेवरलेखन करणार होते ! ते तर कॉस्मिक इंटेलिजन्सशी अनुसंधान आहे. इथेच इतका गोंधळ तर त्या विषयाचं काय होईल याची कल्पना करा.छान आहे
चतुर घोडा :)
अब आगये लाईनपे !
देह चालवला पाहिजे हि गरज ओळखणं, देह चालवायला एक्च्युअल फिजीकल कंट्रोल्स ट्रिगर करणं, देह चालला आहे याचं रिडींग घेणं, गरज पडल्यास त्यात करेक्शन्स करणं... हे सर्व एकाच यंत्रणेअंतर्गत होत असतं (जीवशास्त्र दृष्ट्या नर्व्हस सिस्टीम, मानसशास्त्र दृष्ट्या मन). होप यु अंडरस्टॅण्ड धिस टाईम.२)शुद्ध मराठीत आपण त्याला रिस्पॉन्स टु स्टिम्युलस म्हणतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या प्रेरणा प्रकारांबरहुकूम शरीराने प्रतिक्रीया द्यावी म्हणुन शरीराला एका विशिष्ट अवस्थेत घेऊन जाण्यासाठी जे काहि रासायनीक उपद्व्याव शरीरात होतात त्याला आपण भावना म्हणतो.३)कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते.आता या तुमच्या फंड्यावरुन मागे सरकू नका ! या तीन्हींचा एकत्रित अर्थ एवढाच कीव्यक्तीला स्वेच्छाच नाही !व्यक्ती हीप्रेरणेच्या हातातलं बाहुलं आहे. क्रिया सुरु होणं, घडणं आणि थांबणं मनाच्याच स्वाधिन आहे ! यालाच तर मनाशी तादात्म्य म्हणतात ! किंवा सायकॉलॉजीत संपूर्ण केमिकल लोच्या. नो सेल्फ विल. एवरी थींग इज जस्ट अ स्टिम्युलस अॅक्टीवेशन. मानवेतर सर्व सजीव एक्झॅक्टली असेच जगतात. फरक इतकाच त्यांच्याकडे स्वेच्छेची कल्पनाच नसते आणि मानवाचा गौरव हा की त्याला स्वेच्छा असते आणि तो स्टिम्युलसला स्वेच्छेनं रिस्पाँंड करतो. भोजनाच्या प्रेरणेवर उपवासानं, व्यसनाच्या इच्छेवर निग्रहानं, प्रणयाच्या प्रेरणेवर संयामानं.... तुम्हाला याची कल्पनाच दिसत नाही. आता केमिकल लोच्या काय झालायं ते लक्षात येणं अवघड नाही.In reply to अब आगये लाईनपे ! by संजय क्षीरसागर
अवघड आहे राव.
In reply to अवघड आहे राव. by अर्धवटराव
बहुदा तुम्ही स्वतःचं लेखन वाचलेलं नाही
आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा.याचा अर्थ व्यसनाधिन व्यक्तीचं मनंच व्यसन सोडवेल अशी वाट बघायची ! नैराश्यातून मनंच मार्ग काढेल अशी खुळी कल्पना करायची, आळसावर मन मात करेल अश्या भ्रमात राहायचं..... कारण तुमच्या धारणेत मनावेगळं या जगात काहीही नाही. २)मनाच्या परिघाबाहेरची एक तरी 'स्वेच्छा' दाखवुन द्या.मनाच्या पलिकडे जी आहे तिलाच स्वेच्छा म्हणतात. आणि स्वेच्छा मनापेक्षा वेगळी आणि बलवत्तर हवी. ती स्वेच्छा करु शकणारे आपण आहोत. अर्थात, तुम्हाला स्वतःचा पत्ताच नाही कारण तुमच्या लेखी सर्व ऑटोमॅटिक आहे ! ३)उपवास, निग्रह, संयम... हे सर्व मनाचेच खेळ आहेत.इतका भारी ज्योक मनात पुरता फसलेलाच करु जाणे. जो स्वेच्छेनं जगतो तोच उपवास, निग्रह, संयम करु शकतो. स्वेच्छा मनात प्रकट होते पण ती मनाची गुलाम नसते,ती मनाच्या माध्यमातून ऑटोमेटेड रिसपाँस बदलू शकते.तुम्हाला स्वेच्छेचा पत्ताच नाही ! स्वेच्छा म्हणजे आपली इच्छा, तो मनात प्रकट होणारा स्टिम्युलस नाही, तर त्या स्टिम्युलसला नक्की काय रिस्पाँन्स द्यावा हे ठरवणारी आपली इच्छा ! मनाशी तादात्म्य झालेल्याला स्वेच्छा नसते. तो फक्त मनाच्या व्यावहारांचा गुलाम असतो आणि लेखात म्हटल्याप्रमाणेमनच सर्वातून वाट काढेल या भ्रमात कायम राहातो. कारणत्याला मनावेगळ्या स्वतःचा परिचयच नसतो.In reply to बहुदा तुम्ही स्वतःचं लेखन वाचलेलं नाही by संजय क्षीरसागर
दॅट्स राईट
In reply to दॅट्स राईट by अर्धवटराव
तुम्ही काय लिहीतायं ते बहुदा तुम्हाला कळेनासं झालंय
मनावरचं मळभ दूर व्हायला मनालाच प्रयत्न करायला लागतात. ति जबाबदारी दुसर्या कुणाची आहे या भ्रमात जगणं म्हणजे आणखी सत्यानाश करणं आहे.मनाला डिप्रेशनमधून बाहेर काढायला व्यक्ती सक्षम व्हावी लागते. तुमच्या लेखी ती मनाचीच जवाबदारी आहे ! कारण मनापेक्षा दुसरा तुम्हाला कुणी मंजूरच नाही. हे सत्यानाशाचं खरं कारण आहे ! २)मनाच्या पलिकडे म्हणुन कुठलीच इच्छा वावरु शकत नाहि.व्यक्तीनं इच्छा करणं आणि ती मनात प्रकट होणं या एकामागोमाग होणार्या घटना आहेत. पण तुम्हाला व्यक्ती आणि मन एकच वाटतंय हा खरा लोच्या आहे. ३)परस्पर भिन्न वाटणार्या प्रेरणा मनात कशा वावरतात हे न कळल्यामुळे तुमची "मनाला कंट्रोल करणारा कुणीतरी" अशी धारणा फार घट्ट झाली आहे.उलट आहे ! परस्परविरोधी विचार अनियंत्रितपणे मनात वावरत असल्यानं, मनावरचा ताबा गेलेल्या व्यक्तीला असं वाटू शकतं. ४)स्टिम्युलसला रिस्पॉन्स काय द्यावा, देऊ कि नये, कसा द्यावा, हे ठरवणारं इंजीन मनातच एक्झीक्युट होत असतं. एकाच अजस्त्र यंत्रणेचे वेगवेगळे विभाग आहेत ते. तिथे मन वेगळं आणि "आपण" वेगळं अशी काहि भानगड नसते.हे पुन्हा मनाशी तादात्म्य पावल्याचं आणखी एक उदाहरण ! ५)स्वतःच्या अनेक आयडेण्टिटी बनवणं, त्यात कन्फ्युज होणं, प्रसंगी स्प्लीट पर्स्नॅलिटी सारखे आजार होणं हे सर्व मनाच्या बाबतीत घडु शकतं. "मनावेगळे आपण" असा भास मनच तयार करतं. मानसोपचारतज्ञांकडे अशा केसेस येणं फार कॉमन आहे.सायकॉलॉजीचा शून्य अभ्यास वरील विधानातून स्पष्ट दिसतो. व्यक्तीमत्त्वाचा दुभंग मन सैरभैर झाल्यामुळे होतो. मनावर नियंत्रण करु शकणारी व्यक्ती मनाच्या काह्यात गेल्यामुळे दुभंग होतो. वेडा माणूस आपोआप शहाणा होईल इतकी व्यर्थ अपेक्षा तुमच्या सारखी व्यक्तीच करु जाणे ! ६)"मनावेगळे आपण" अशी कल्पना करुन त्यात सुख शोधणं हि मनाचीच किमया आहे. त्यातनं बाहेर पडायचं अथवा नाहि हे देखील मनच ठरवेल.खालच्या प्रतिसादात तुम्ही जो रिमार्क मारला आहे तो तुमच्या वरील विधानाला लागू होतो. मनात अडकलेली व्यक्ती स्प्लीट पर्सनॅलिटीची शिकार होते. तिला मनाबाहेर आपलं अस्तित्वच नाही असा भ्रम होतो. अशी मनाच्या महालात हरवलेली व्यक्ती मनालाच सर्वस्व समजू लागते आणि मनाबरहुकूम वागू लागते. अशा व्यक्तीला एकसंध व्यक्तीमत्त्व नसतं. अश्या व्यक्तीला स्वतःशीच धड डिल करता येत नाही, दुसर्यांची तर बातच सोडा !In reply to तुम्ही काय लिहीतायं ते बहुदा तुम्हाला कळेनासं झालंय by संजय क्षीरसागर
तुम्ही तिच चुक वारंवार करताय.
In reply to तुम्ही तिच चुक वारंवार करताय. by अर्धवटराव
गोंधळ बेसुमार वाढलायं !
व्यक्ती सक्षम व्हावी लागते हे फार सुपरफिशियल वाक्य आहे. डिप्रेशनवर मात करणारी सकारात्मक प्रेरणा तीव्र करणे हि अॅक्चुअल थेरपी आहे.सगळ्या चर्चेत तुम्ही स्वतःलाच नाकारतायं ! आणि स्व-विस्मरण हाच सगळ्या मनोरुग्णतेचा उगम आहे. जगातफक्त एकच गोष्ट नाकारता येत नाहीआणि ती म्हणजे `मी आहे'! कारणमी नाही म्हणायला सुद्धा मी हवाच !२)जिथे मनालाच नकारल्या जातय तिथे काय डोंबलाची सायकोलॉजी डिस्कस करणार. वेड्या माणासाला कुणीतरी "आपण" प्रकट होऊन शहाणा करेल हि थेरपी किती हुच्च म्हणायची... मनाचं पार्टीशन केल्यामुळे असं वाटणं स्वाभावीक आहे म्हणा.तुमच्या तर्काचा पुरता बाजा वाजलायं, मन कुणी नाकारलंय ? मी मन नाकारत नाहीये,तुम्ही स्वतःला नाकारतांयआणि हीच गंभीर चूक मनोरुग्ण अवस्थेला कारणीभूत होते. आता हे नीट वाचा :वेड लागण्याचं कारणंच स्व-विस्मरण आहे आणि स्व-विस्मरणाचं कारण कमालीचा मानसिक गोंधळ आहे.थोडक्यात, वेड्याला जोपर्यंत स्वतःची जाणीव होत नाही तोपर्यंत तो मनाच्या काह्यातच राहाणार. दुसरा कुणीप्रकटहोण्याचा प्रश्नच नाही. वेड्यालास्वतःचं भानयेण्याचा प्रश्न आहे . ३)ज्याने आपलच मन आरपार स्प्लीट केलय त्याला अशी चीड येणं सहाजीक आहे.मला रागवायचं काहीच कारण नाही. मी स्वतःप्रत येऊन जमाना झालायं. मन माझं घंटा काही करु शकत नाही. इट इज माय युटिलीटी पण मन म्हणजे तुमचं सर्वस्व ! आता शांतपणे वाचा म्हणजे उलगडा होईल : एखाद्या व्यक्तीचा (किंवा समूहाचा) पुरता बाजा वाजवायचा असेल तर त्या व्यक्तीचं ब्रेन वॉशिंग केलं जातं. उदाहरणार्थ अतीरेकी तयार करतांना `धर्मासाठी कुर्बान व्हा' (किंवा ज्यूंनमुळे तुमचा सत्यानाश झाला) असा भंपक विचार मनात खोलवर रुजवला जातो. ती प्रक्रिया इतकी नेटानं आणि अहोरात्र केली जाते की अतीरेक्याला धर्मापुढे आपली जिंदगी तुच्छ वाटायला लागते (किंवा समूह बलिदानाला तत्पर होतो). या सगळ्या प्रक्रियेची फक्त एकच किमया आहे :व्यक्ती किंवा समूहाला स्व-विस्मरण घडवणं !एकदा स्व-विस्मरण झालं की अतीरेकी कोणताही सारासार विचार न करता, फुल पेट्रोल भरलेलं विमान, स्वतःसकट वर्ल्ड ट्रेड सेंटरवर धडकवतो.... आणि हिटलर स्वतःच्या सत्तालालसेपोटी आख्ख्या जगाला वेठीला धरुन अभूतपूर्व संहार घडवू शकतो. तुमची परिस्थिती अजून तरी ठीक दिसते. पण चुकीच्या धारणा आणि डोकं भंजाळवणारं काहीबाही सायकॉलॉजीचं वाचन थांबवलं नाही तर मनाचा गुंता न सुटण्यासारखा होऊन बसेल. स्व-च्या दिपकाशिवाय मनाच्या गूढ महालात प्रवेश करणं धोक्याचं आहे. तुम्ही तर हातातला दिवा विझवून प्रवासाला निघालात !In reply to गोंधळ बेसुमार वाढलायं ! by संजय क्षीरसागर
गोंधळ संपूर्ण सघन झाला आहे.
In reply to गोंधळ संपूर्ण सघन झाला आहे. by अर्धवटराव
चुकीच्या धारणा आणि चुकीचं आकलन
आपण म्हणजे कुणीतरी मनाला (किंवा मेंदुला) कंट्रोल करणारे कुणीतरी सुप्रीम आहोत अशी हिटलरी धारणा विनाश घडवु शकते, मनातल्या सुख-दु:खांना सामोरे जाण्याऐवजी त्याला कंट्रोल करुन, मारुन-मुरकुटुन स्वर्गप्राप्ती करायची इच्छा घातक ठरु शकते.आपण कचरा आहोत, आपण म्हणजे कुणीच नाही हा न्यूनगंड हिटलरला , आपण जगातली सर्वोच्च व्यक्ती आहोत हे सिद्ध करायला प्रवृत्त करतो.ही स्व-विस्मरणाची परिसीमा आहे.तीच मनाच्या काह्यात नेते. तुमच्या धारणेतलामनालाच सर्वस्व मानणारा अशा गुंत्यात सापडतो कारण त्याला सोडवणारा मनाबाहेरचा कुणी उरतच नाही.स्व-गवससेला कायम आनंदी असतो. तो बुद्धासारखा शांत असतो. त्याला झेनमधे `नो माइंड' म्हणतात.नो माइंड याचा अर्थ नो मेंटल अॅक्टिवीटी. संपूर्ण शांतता! मनालाच सर्वस्व मानणारा जन्मोजन्म घालवून सुद्धा त्या अवस्थेला येऊ शकणार नाही कारण मनाच्या कोलाहालाच त्यानं सर्वस्व मानलंय ! मनाला मारुन-मुटकून स्वर्गप्राप्ती वगैरे कल्पना केवळ बालीश आहेत. त्या दोनच गोष्टी दर्शवतात : सायकॉलॉजीचं अज्ञान आणि अध्यात्मिक अंधार ! २)अहंभाव मनाचीच प्रॉपर्टी आहे. अहंभाव प्राथमीक व इतर भावभावना दुय्यम असं कहिसं झाल्यामुळे तुम्हाला वाटतय कि तुम्ही मनाला कंट्रोल करताय...अहंकार हा न्यूनगंडाचाच सुधारीत प्रकार आहे पण निदान त्याला सपोर्ट करायला मागे काही तरी कर्तृत्व असावं लागतं. त्यामुळे तो परवडला.चुकीचं अध्यात्मिक आकलन फक्त एकच शिकवतं, दुसरा आपल्यापेक्षा बरा दिसला की त्याला अहंकारी म्हणायचं !वास्तविकात स्वतःला मन आणि मनालाच सर्वस्व मानणं हाच अहंकार (अहं - आकार) आहे. पण सगळीकडेच गोंधळ म्हटल्यावर इथे वेगळी अपेक्षा नाही. ३)स्व-चा दिपक कधि विझु शकत नाहि. ति मनाचीच एक प्रॉपर्टी आहे.स्वला `मनाची प्रॉपर्टी' मानणारा स्वचा काय उजेड पाडणार ? त्याचा स्व केव्हाच विझलायं !मन ही स्वची प्रॉपर्टी आहे आणि स्व सार्वभौम आहे त्याच्या पलिकडे काही नाही.In reply to चुकीच्या धारणा आणि चुकीचं आकलन by संजय क्षीरसागर
सघन गोंधळाचं तेव्हढच सघन दर्शन.
In reply to सघन गोंधळाचं तेव्हढच सघन दर्शन. by अर्धवटराव
मनालाच सर्वस्व मानणारा....
मनापासुन तोडणारी अशी स्व-आयडेंटीटी हिटलरचा आणि जगाचा घात करुन गेली.खरा, मनावेगळा स्व न गवसलेल्याला, मन सांगेल तसा खोटा स्व एस्टॅब्लिश करावा लागतो ! ही हिटलरची शोकांतिका आहे. पण तुम्हाला ती कळण्याची सुतराम शक्यता नाही कारण मनावेगळा स्व तुम्हाला माहितीच नाही.अहंभाव आणि अहंकार यात मूलभूत फरक आहे.तुम्हाला शब्दांचे अर्थही नीट माहिती नाहीत ! दोन्ही शब्दांचा एकच अर्थ : मनाशी तादात्म्य !जिथे विनाकारण मनालाच जज केल्या जातय तिथे इतरांची काय कथा.हे नेहेमीचं रडगाणं बदला ! मनाला `जज' करणं कुठून काढलं ? मनाच्या सीमांविषयी चर्चा चालू आहे. तुमचं मनापलिकडे अस्तित्वच नाही त्यामुळे तसं वाटतंय.स्व पलिकडे काहि नाहि हि घसरगुंडीची सुरुवात आहे.स्व हाच सर्व विश्वाचा आधार आहे. तो सर्वव्यापी आणि कायम आहे. तो कृष्णाचा, माझा, तुम्हाला (पत्ता नसला तरी) तुमचा आणि सर्वांचाएकचआहे ! यालाअद्वैतम्हणतात पण तुम्हाला ते समजण्याची शक्यता शून्य आहे.In reply to मनालाच सर्वस्व मानणारा.... by संजय क्षीरसागर
तेच लूप, त्याच चुका.
In reply to तेच लूप, त्याच चुका. by अर्धवटराव
लेट अस मेक अ नॉक आऊट !
मी आहे' हे जगातलं एकमेवनाकारता न येणारंवाक्य आहे. कारण मी नाही म्हणायला सुद्धा मी हवाच ! तुम्ही`मी नाही'म्हणून दाखवा. म्हणजे इथे तर तोंडघशीच पडाल. पण जिथे आहात तिथे,मनातल्या मनात सुद्धातुम्ही तसं म्हणू शकत नाही. आता प्रामाणिकपणे काय झालं याचं उत्तर द्या ! तुमच्यापुढे दोन पर्याय आहेत : १) उत्तर न देणं : पण याचा अर्थ मनावेगळा `मी' आहे. तुम्ही अप्रामाणिकपणे ते मान्य करत नाही इतकंच. २) `मी आहे' हे मनंच म्हणतंय ! असा स्टँड घेणं . पण त्याचा अर्थ मी सुरुवातीला म्हणालो तोच होईल : तुम्ही स्वतः मनाशी तदृप झालेले आहात ! जसं लोक शरीरालाच स्वतः समजातात तसं तुम्हीमन म्हणजेच मी समजतायं.तुम्हाला स्वतःचाच विसर पडलेला आहे.In reply to लेट अस मेक अ नॉक आऊट ! by संजय क्षीरसागर
कसलं दुर्दैव... नॉकआऊट? म्हणजे हि चर्चा नव्हे तर स्पर्धा होती?
In reply to कसलं दुर्दैव... नॉकआऊट? म्हणजे हि चर्चा नव्हे तर स्पर्धा होती? by अर्धवटराव
.
बाझवला इथं तर बीमरचा पाऊस
In reply to बाझवला इथं तर बीमरचा पाऊस by गणामास्तर
घ्या
In reply to घ्या by संजय क्षीरसागर
उदाहरणादाखल दिलेल्या शब्दांचे
In reply to उदाहरणादाखल दिलेल्या शब्दांचे by गणामास्तर
संपन्न ? साधारण २०० प्रतिसादांचं पोटेंशीयल आहे !
काय करावे आणि काय करु नये याचे अनेक थ्रेड्स मनात चालले असतात. त्याचं एक कलेक्टीव्ह रिजल्टण्ट डिसिजन म्हणजे आपली तत्कालीन क्रिया होय.म्हणजे मनंच काय करावं आणि करु नये ते ठरवतं असा त्यांचा फंडा आहे. आपण मनानं दिलेल्या ऑप्शन्सपैकी एक निवडायचा. मनावेगळं या जगात काही नाहीच ! खरं तरआपण नाहीच म्हटल्यावर मनंच पर्याय देणार आणि मनंच निवडणार.याला सोप्या भाषेत केमिकल लोच्या म्हणतात.In reply to उदाहरणादाखल दिलेल्या शब्दांचे by गणामास्तर
काहि विशेष नाहि हो.
In reply to बाझवला इथं तर बीमरचा पाऊस by गणामास्तर
घ्या
In reply to घ्या by संजय क्षीरसागर
stimulus = प्रेरणा
In reply to बाझवला इथं तर बीमरचा पाऊस by गणामास्तर
तुम्हीच क्लास घ्या मास्तर :)
मारीच! सुवर्णचर्म! सीताहट्ट!
In reply to मारीच! सुवर्णचर्म! सीताहट्ट! by संदीप डांगे
.
मनीच्या बाता
In reply to मनीच्या बाता by वरुण मोहिते
मन म्हटल्यावर मला
झेन नो माइंड' दिसतं !वर चाललेल्या डिप्रेशन च्या
In reply to वर चाललेल्या डिप्रेशन च्या by संदीप डांगे
:)
In reply to वर चाललेल्या डिप्रेशन च्या by संदीप डांगे
@ संदीप ,
डिप्रेशन हा आजार आहे, स्वयंनिंर्णय नाही, स्वेच्छा नाही हे लक्षात असू द्यावे.डिप्रेशन हा मनाच्या नेगटिवीटीचा परिणाम आहे. स्वेच्छेचा अर्थ व्यक्तीची इच्छा असा होतो. जोपर्यंत व्यक्ती स्वतः डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत ते कायम राहील. व्यसनमुक्तीतही स्वेच्छाच काम करते. डिप्रेशनमधे जाण्याची कारणं असंख्य असू शकतील पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग व्यक्तीनं स्वतःला सावरणं हाच आहे. जेव्हा व्यक्ती स्वतःला सावरते तेव्हा मनाची नेगटिवीटी दूर होण्याचा मार्ग सापडतो, अन्यथा नाही. २)वर चाललेली दिग्गजांची चर्चा मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे आहे.अध्यात्म हा स्व-जागरणाचा विषय आहे आणि मानसशास्त्र मनाचा आभ्यास आहे. स्व-जागृतीविना मनाचा आभ्यास धोक्याचा आहे कारण सैरभैर झालेलं मन केव्हाही स्व-विस्मरण घडवून व्यक्तीला स्वतःच्या काह्यात घेऊ शकतं. ३)आउटपुट झिरोतसं वाटत असेल तर या चर्चेत भाग न घेतलेला बरा.In reply to @ संदीप , by संजय क्षीरसागर
संक्षि, तीन स्पष्ट प्रश्न.
In reply to संक्षि, तीन स्पष्ट प्रश्न. by संदीप डांगे
संदीप,
In reply to संदीप, by संजय क्षीरसागर
मानसशास्त्र व अध्यात्म अशा
In reply to मानसशास्त्र व अध्यात्म अशा by संदीप डांगे
नो !
मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे ह्यातून आऊटपूट झिरो असतो हा आतापर्यंतचा माझे वैयक्तिक अनुभव व निरिक्षणावर आधारलेला निष्कर्ष आहे.मानशास्त्र किंवा मनोव्यापार समजल्याखेरीज अध्यात्म व्यर्थ आहे. त्यामुळे अध्यात्म हा प्रथम चरणात मनाचा उलगडा आहे. थोडक्यात, स्वतःप्रत येण्याचा मार्ग मनाचा महाल पार करुनच जातो. तुम्ही म्हणतायं तशी `रसायनांचे मेंदूवर होणारे परिणाम व त्यानुसार बदलणारी व्यक्तीची निर्णयक्षमता' यावर इथे डेटा ओतला जाईल. मग मतभेदांमुळे वाद होईल आणि निष्पन्न काहीएक होणार नाही.In reply to नो ! by संजय क्षीरसागर
मानसशास्त्र, सायकॅट्री,
In reply to मानसशास्त्र, सायकॅट्री, by संदीप डांगे
.
अभ्यासाची विषयवस्तू एक असली तरी गृहितके, प्रयोग, निष्कर्ष, परिणाम वेगवेगळे आहेत.सहमत आहे.शास्त्रज्ञ मनोचिकित्सा करतांना वेगवेगळ्या रसायनांच्या, कार्यकारणभावाच्या अनुषंगाने मनाचा (प्रत्यक्षात मेंदूचा) अभ्यास करतात. अध्यात्मात असं अजिबात होत नाही.मानसशास्त्र व्यक्तीला, `सोशली नॉर्मल' (समाजशील व्यक्ती) बनवण्याचा प्रयत्न आहे आणि अध्यात्म व्यक्तीला `व्यक्तीमत्त्वातून मुक्तता' देण्याचा प्रयत्न आहे. पण इथे चर्चा फार वेगळ्या विषयावर चालली आहे.लेखकाच्या मते मनंच सर्वसत्ताक आहे आणि `आपण' अशी काही मनावेगळी चिजच या दुनियेत नाही ! त्यांनी तर अशी हद्द केलीये की `मनावेगळे आपण ही मनानीच स्वतःच्या सुखासाठी केलेली कल्पना आहे !' आणि त्याहून ग्रेट म्हणजे त्यांना वाटतंय की मनावेगळे आपण ही स्प्लीट पर्सनॅलिटी आहे.आणि माझं म्हणणंय :आपण सर्वसत्ताक आहोत आणि मन हा शरीरस्थित बायोकंप्युटर आहे. आपण तो वापरु शकतो पण मन म्हणजे सर्वस्व नाही. आणि याही पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की स्व-विस्मरण हाच मनोरुग्ण होण्याचा प्रथम चरण आहे.त्यामुळे ही चर्चा योग्य मार्गानं गेली तर सदस्यांना उपयोगी होईल.In reply to संक्षि, तीन स्पष्ट प्रश्न. by संदीप डांगे
@ संदीप,
१. डिप्रेशन हा आजार आहे की राग-लोभ-मोह-मत्सर ह्यासारखी भावना?डिप्रेशन हा मूड आहे. तो विचार आणि भावनांपेक्षा गहीरा आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकू शकतो. पण कोणताही मनोविकार उद्भवण्याचं मूळ कारण स्व-विस्मरण हेच आहे. २)२. डिप्रेशनच्या आजारात (आणि बहुतेक नशामुक्तीमध्येही) जी मेंदूत रासायनिक परिणाम घडवून आणणारी औषधे दिली जातात, त्याबद्दल काय मत आहे?अनुभव नाही. ध्यानप्रणालींचा आभ्यास केल्यामु़ळे तशी आवश्यकताही वाटली नाही. ३)३. एखादी नशा 'चढल्यावर' व्यक्तिचं आपल्या कृती-विचारांवर पूर्ण नियंत्रण असते की नसते? (नशा चढणे म्हणजेच नियंत्रण गमावणे म्हटले जाते.)अर्थात ! पण यात एक मेख आहे. निद्रा हे पूर्ण आत्मविस्मरण आहे आणि त्यामुळे देह पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो. काही प्रमाणात चढलेली नशा ही निद्रा पण सतत चालू असलेले विचार यांच्या मधली स्थिती आहे. म्हणजे जागृत आणि विचारांची रहदारी कमी झालेली. अशा वेळी नव्या कल्पना सुचणं, इतर वेळी न होऊ शकणारं साहस करता येणं, वैचारिक उहापोह कमी झाल्यामुळे मूड लाइट होणं अशा गोष्टी घडतात.In reply to @ संदीप, by संजय क्षीरसागर
.
In reply to @ संदीप, by संजय क्षीरसागर
डिप्रेशन हा मूड आहे. तो विचार
In reply to वर चाललेल्या डिप्रेशन च्या by संदीप डांगे
मेडिटेशन उपयोगाचे नाही.
In reply to मेडिटेशन उपयोगाचे नाही. by अनुप ढेरे
ते खरं आहे
In reply to मेडिटेशन उपयोगाचे नाही. by अनुप ढेरे
ढेरेसाहेब, शास्त्रज्ञ
In reply to ढेरेसाहेब, शास्त्रज्ञ by संदीप डांगे
मुद्दा हा की हा लय नाजूक आणि
In reply to मुद्दा हा की हा लय नाजूक आणि by अनुप ढेरे
नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे
In reply to नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे by संदीप डांगे
बाय द वे,
In reply to बाय द वे, by संजय क्षीरसागर
मेडिटेशन' म्हणजे नक्की काय
In reply to मेडिटेशन' म्हणजे नक्की काय by सुबोध खरे
The word “meditation” stems
In reply to बाय द वे, by संजय क्षीरसागर
मला विचारताय काय सर? मला
In reply to मला विचारताय काय सर? मला by संदीप डांगे
रजनीशांच्या ध्यान विधी
सुंदर वैविधय्पुर्ण आहेत.
काही वर्षांपुर्वी जपान मध्ये वास्तव्याला असतांना एका झेन ग्रुप च्या संपर्कात आलेलो होतो.
ते रजनीश चे ही फॅन होते. त्यांचे रीच्युअल्स विचीत्र होते. मात्र मेडीटेशन्स टेक्नीक्स भन्नाट होत्या.
काही अती प्रतिभाशाली पण तितक्याच विक्शीप्त लोकांचा भरणा त्यात होता.
तेव्हाच मी तिथे पहील्यांदाच. सुंदर फुलाकडे एकटक पाहत राहणे नंतर काही काळानंतर ते फुल जणु माझ्याकडे पाहत आहे हा भाव मनात कल्पून बघणे. त्या फुलाकडुन. रीव्हर्सली ब्युटीफुली एनरजाइज होणे इ. संवेदनशील विधी तिथे प्रयोगात घेत. त्यानंतर मी रजनीश मेडीटेशन्सची पुस्तके वाचलेली. पण मुळ प्रक्रुती वेगळी असल्याने त्यांचा अंतरगत सदस्य काही होण्याचा प्रश्न नव्हता. जपान सोडल्यावर तो ग्रुप ही सोडला.
In reply to नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे by संदीप डांगे
डिटेल प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
In reply to डिटेल प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद by अनुप ढेरे
तुमचे म्हणणे शंभर टक्के मान्य
'आपण' आणि 'मन'
In reply to 'आपण' आणि 'मन' by गामा पैलवान
ऑफ्कोर्स..
In reply to ऑफ्कोर्स.. by अर्धवटराव
स्वप्नातलं मन
In reply to स्वप्नातलं मन by गामा पैलवान
गामाश्री,
स्वप्नात देह जागृत नसतांना देहाची अनुभूती देण्याइतपत मन शक्तिशाली असतं.स्वप्नातून बाहेर पडणं म्हणजे मनाच्या चित्रपटातून बाहेर पडणं आहे. मन देहाची अनुभूती देत नाही तर आपण मनाच्या कब्जातून बाहेर येतो. २)मग स्वप्नातलं मन खरं की खोटं मानावं? देहाप्रमाणे मनाचाही कशावरून भासच होत नसेल स्वप्नात?मन एकच आहे आणि त्याचा चलतपट आहोरात्र चालूच असतो. दिवसाच्या उजेडामुळे तो दिसत नाही पण रात्रीच्या अंधारात, डोळे मिटल्यामुळे तो स्पष्ट होतो इतकंच. थोडक्यात, ज्याप्रमाणे चित्रपटगृहात पडदे आणि दरवाजे उघडले की स्क्रीन धूसर होऊन चित्र अस्पष्ट होतं आणि पुन्हा अंधार केल्यावर ते स्पष्ट होऊन वास्तविक वाटायला लागतं तसा प्रकार आहे.In reply to स्वप्नातलं मन by गामा पैलवान
मन कधिही खोटं नसतं
सगळ्या सव्यापसव्यातून शेवटी
In reply to सगळ्या सव्यापसव्यातून शेवटी by यशोधरा
का नाही ठरणार ?
In reply to का नाही ठरणार ? by संजय क्षीरसागर
संक्षी, चर्चा आहे कुठे?
In reply to संक्षी, चर्चा आहे कुठे? by यशोधरा
मी तर प्रामाणिकपणे प्रतिसाद देतोयं !
लेखकाच्या मते मनंच सर्वसत्ताक आहे आणि `आपण' अशी काही मनावेगळी चिजच या दुनियेत नाही ! त्यांनी तर अशी हद्द केलीये की `मनावेगळे आपण ही मनानीच स्वतःच्या सुखासाठी केलेली कल्पना आहे !' आणि त्याहून ग्रेट म्हणजे त्यांना वाटतंय की मनावेगळे आपण ही स्प्लीट पर्सनॅलिटी आहे.आणि माझं म्हणणंय :आपण सर्वसत्ताक आहोत आणि मन हा शरीरस्थित बायोकंप्युटर आहे. आपण तो वापरु शकतो पण मन म्हणजे सर्वस्व नाही. आणि याही पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की स्व-विस्मरण हाच मनोरुग्ण होण्याचा प्रथम चरण आहे.त्यामुळे ही चर्चा योग्य मार्गानं गेली तर सदस्यांना उपयोगी होईल.In reply to मी तर प्रामाणिकपणे प्रतिसाद देतोयं ! by संजय क्षीरसागर
चर्चा पुढे नेणं म्हणजे फक्त
In reply to चर्चा पुढे नेणं म्हणजे फक्त by यशोधरा
असं कुठेयं ?
In reply to असं कुठेयं ? by संजय क्षीरसागर
मला तर जास्त करुन एकमेकांना
In reply to मला तर जास्त करुन एकमेकांना by यशोधरा
आपण आहोत ही एकमात्र निर्विवाद गोष्ट आहे
In reply to आपण आहोत ही एकमात्र निर्विवाद गोष्ट आहे by संजय क्षीरसागर
बघा, "चर्चा पुढे नेणं म्हणजे
In reply to मला तर जास्त करुन एकमेकांना by यशोधरा
अहो मॅडम, इथे मन स्वत:लाच खोडुन काढतय
In reply to अहो मॅडम, इथे मन स्वत:लाच खोडुन काढतय by अर्धवटराव
खेत की मूली आवडत नसेल. :)