आज होणार, उद्या होणार, होणार की नाही अशा अनेक विषयांमुळे बराच चर्चिलेला डोंबिवली दिवाळी कट्टा अखेर झालाच. वृत्तांत वाचून कट्ट्याचा आनंद घेऊ इच्छीणा-या आणि काही कारणास्तव येण्याचे मनात असूनसुद्धा येऊ न शकलेल्या तमाम मिपाकरांसाठी हा वृत्तांत..
अखेरच्या क्षणापर्यंत कट्टेकरी मंडळींची पक्की संख्या तळ्यात मळ्यात होती. माननीय चोळेगावकर श्री. स्पा यांनी आधीच नकार कळवला होता, तर रविवार रात्रीची वेळ असल्यामुळे डोंबिवली बाहेरील अनेकांनी येणं टाळलं. साधारण ५ जणांचा होकार आल्यामुळे दुपारीच नंदी पॅलेसमध्ये फ़ोन करून टेबल रिझर्व्ह करून ठेवलं होतं. तेवढ्यात ४.३०-५ च्या सुमारास भटक्या खेडवालांनी फ़ोन करून त्यांना पाठदुखीमुळे येणं जमणार नसल्याचं कळवलं, आणि कट्ट्याचा एक हरहुन्नरी मेंबर गळाल्यामुळे थोडासा हिरमोड झाला. परंतु त्यापाठोपाठ आलेल्या मुविंच्या फ़ोनने पुन्हा उत्साह आला, कारण डॉ. सुबोध खरे येत आहेत अशी बातमी सांगण्यासाठी आलेला तो फ़ोन होता. त्यामुळे आधीच्या दोन डोंबिवली कट्ट्य़ांप्रमाणेच हा कट्टासुद्धा स्मरणीय होणार याची खात्री झाली.
ठरल्याप्रमाणे ८ ला नंदी पॅलेसमध्ये जाऊन बसलो, टेबल ठेवलेलं होतंच. ८.१५ ला कंजूषरावांचं, तर ८.२० च्या आसपास विनोदरावांचं आगमन झालं. पाठोपाठ मुवि, डॉ. खरे आणि शैलेन्द्र आले, आणि ८.३० ला ६ जणांसह कट्टा जमला. कट्ट्याची सुरूवात अर्थातच प्रथम एकमेकांची खरी नावं आणि मिपा आयडीसह ओळख परेडने झाला. मग आयडी मागचा खरा चेहरा कळल्यानंतर त्यांच्या लिखाणाबद्द्ल प्रतिक्रीया वगैरे देऊन झाल्या. मग विपश्यना आणि मनावरील संयम या विषयावर एक गहन चर्चासत्र पार पडलं. मुविंनी मनावरील ताब्यासाठी विपश्यनेला असलेला विरोध, त्यासाठी आर्ट ऑफ़ लिव्हिंग की तत्सम काहीतरी करूनही त्यांच्याच घरात मनावर ताबा नसणा-या व्यक्ती कशा नाहीत पासून डॉ. खरेंच्या विक्रांतवरच्या अनुभवांसह विपश्यनेसारख्या उपायांतून मनाकडे येणारी सर्व दारं बंद केली की स्वत:ला ओळखण्यात कसा फ़ायदा होतो यावर बराच वेळ चर्चा झाली. सोबतीला वेटरने चुकून आमच्या टेबलवर आणून ठेवलेले रोस्टेड पापड होतेच.
नंतर विषय वळला तो चारचाकींकडे. मग टाटांच्या गाड्या कशा उत्तम, सफ़ारीचा दणकटपणा, मारूतीची इंजिनं, शैलेन्द्रांचे महिंद्रा रेनॉल्टचे अनुभव यावर पुढला अर्धा पाऊण तास चर्चा रंगली. डॉ. खरेंच्या कुठल्याशा विधानावरून श्रीमंती आणि त्याच्या व्याख्या याकडे चर्चेचा रोख वळला. त्या दरम्यान डॉ. खरेंची, "A rich is not the person who earns more, or spends more. But rich is the person who does not need anything anymore." ही व्याख्या मनात घर करून बसली. मग ४०० रू. चे घड्याळ आणि ४.५ लाखाचे घड्याळ यात वेळ पाहण्यापलिकडे काही फ़रक आहे का, वगैरे तात्विक विषयांवर संवाद घडला.
एवढ्या चर्चेनंतर सगळ्यांनाच पोट नावाच्या अवयवाने छळायला सुरूवात केल्यामुळे काय खावे यावर लहानशी चर्चा झाली, आणि २ व्हेज सिझलर्सची फ़र्माईश झाली. सिझलर्स येईपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पांच्या ओघात आमच्यातल्या सर्वसामान्य नागरिकत्वाची प्रत्येकाला जाणीव झाली, आणि चर्चेची गाडी राजकारण या जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळली. सध्या तर या विषयात किती बोलू अन किती नको इतक्या उलाढाली होत असल्यामुळे सिझलर्स संपून बिल देऊन बाहेर पडेपर्यंत कुठलंही विषयांतर न होता मनसोक्त चर्चा आणि थोडेफ़ार वादविवाद झाले. (जास्त तपशील न देणेच इष्ट.)
बाहेर पडल्यावर पुढला कट्टा आणि कुठे कधी भरवावा यावर बोलणं चालू असतानाच मुविंनी जानेवारीत देशावर हुरडा खायला जाऊया अशी पुडी सोडली. सोबतच तथास्तु यांनी लातूरला बोलावणं धाडलं आहे, आणि हुरडा पार्टीची सगळी सोय होईल हेही सांगून टाकलं. तेव्हा पुढची भेट लातूरलाच करू या ठरावासह रात्री ११.३० च्या सुमाराला मंडळी पांगली, आणि डोंबिवली कट्टा संपन्न झाला.
कट्टेकरी (डावीकडून) - कंजूष, डॉ. खरे, शैलेन्द्र
कट्टेकरी (डावीकडून) - विनोद१८, मुक्त विहारी
कट्टेकरी (डावीकडून) - कंजूष, डॉ. खरे, शैलेन्द्र
कट्टेकरी (डावीकडून) - विनोद१८, मुक्त विहारी
वाचने
6110
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
होय
टुबोर्ग झाली वाटते
इतका व्यवस्थित वृतांत, व्वा!
प्रफ...
In reply to इतका व्यवस्थित वृतांत, व्वा! by संजय क्षीरसागर
लय भारी
मुवि असे उचकुन काय पहाताहेत?
मुवि असे उचकुन काय पहाताहेत?
In reply to मुवि असे उचकुन काय पहाताहेत? by स्पंदना
मुविंना कुणीतरी 'तो बघा
In reply to मुवि असे उचकुन काय पहाताहेत? by मुक्त विहारि
ह ह पु वा....
In reply to मुविंना कुणीतरी 'तो बघा by प्यारे१
तसे कुणी आले नाहीत...
In reply to ह ह पु वा.... by खटपट्या
DISCLAIMER
जर आपण आपल्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असू
In reply to DISCLAIMER by सुबोध खरे
:) असला एकांतवास/खरी ऑलख फक्त पंचेंद्रिये अकार्यन्वित असतील तरच
In reply to DISCLAIMER by सुबोध खरे
माझा पहिलाच कट्टा मला आवडला
स्टरर फक्त
In reply to माझा पहिलाच कट्टा मला आवडला by कंजूस
छोटेखानी पण मस्त कट्टा
आधी सांगायच ना..
In reply to छोटेखानी पण मस्त कट्टा by प्रचेतस
हो ना !!
In reply to आधी सांगायच ना.. by मीता
हम्म !! छान वाटला आटोपशीर
"वॉलनट कॅड बी म्हणजे अगदी
In reply to हम्म !! छान वाटला आटोपशीर by सूड
वल्लीने एकदा सांगितलंय, परत
In reply to "वॉलनट कॅड बी म्हणजे अगदी by शैलेन्द्र
व्वा........! छान!
बहोत खुब
ती भानगड चोळ्याशी (खरतरं
In reply to बहोत खुब by दिपक.कुवेत
माताय !!
In reply to बहोत खुब by दिपक.कुवेत
बस उलूसा वृत्तान्त आणि फोटो.
मस्त मजा आली...
आता मुंबई-पुणे कट्टा करुयात
In reply to मस्त मजा आली... by मुक्त विहारि
डॉ. खरे आणि मुवि न्चे दर्शन
बरोबर
In reply to डॉ. खरे आणि मुवि न्चे दर्शन by खटपट्या
क्षमस्व
अहो....
In reply to क्षमस्व by भ ट क्या खे ड वा ला
कट्टा झाला
.
मुवि बरेचसे थत्तेचाचांसारखे