Skip to main content

मांडणी

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 11/10/2013 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

गालिब च्या शायरी चा आस्वाद भाग २

लेखक गुल-फिशानी यांनी गुरुवार, 10/10/2013 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
शेर दाम-ए-हर मौज मे है हल्का-ए-सद्काम-ए-निहंग देखे क्या गुजरे है कतरे पे गुहर होने तक. आस्वाद या सुंदर शेर मध्ये गालिब असे सुचवितो की बघा एक सुंदर प्रवास एका नाजुक थेंबा चा (कतरा) नुकताच सुरु झालेला आहे.आणि कुठे तर जीवनरुपी महासागरा त.आणि या प्रवासा ची मंझील काय आहे तर एखादा शिंपला गाठुन मोती बनणे. पण साह्ब ये जिंदगी का सफर इतना आसान होगा ?

searchingforlaugh उर्फ "आन्याची फाटकि पासोडी " इतका अप्रतिम मराठी ब्लॉग दुसरा असल्यास सुचवा ही विनंती.

लेखक मारवा यांनी मंगळवार, 08/10/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो मी तसा मराठी ब्लॉग च्या दुनीयेत नवीन च आहे. माझ्या आतापर्यंत च्या शोधात मला इतका सुंदर ब्लॉग दुसरा सापडला नाही."searchingforlaugh.blogspot.in" हा ब्लॉग आपण जरुर वाचा.

मिसळपाव

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 08/10/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
मिश्किल गंभीर अध्यात्मिक हलके, लिखाण येथे वाचतो मी सदरे सुंदर जितकी तितक्या, प्रतिक्रिया हि वाचनीय खास लक्ष; मराठी भाषा समृद्ध करण्या, सिद्ध मिपा प्रेमी सकळ पाकक्रिया; भटकंती; कला सारेच मेळविले, असे संपादक मिपा वर्धन; उत्कर्ष असाच हो मिपाचा, आणि खास काय लिहावं !!! - सार्थबोध www.saarthbodh.com

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - २ (निर्मात्याबद्दल थोडेसे)

लेखक नानबा यांनी गुरुवार, 03/10/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
भाग- १ इंटरनेटचे जनक - प्रो. लिओनार्ड क्लाईनरॉक s मॉडर्न इंटरनेटचे जनक म्हणून ज्यांचा सगळ्यात आधी उल्लेख करता येईल अशी व्यक्ति म्हणजे प्रोफ़ेसर लिओनार्ड क्लाईनरॉक. जगाला ही अद्वितीय देणगी देणा-या क्लाईनरॉक यांचा जन्म १३ जून, १९३४ रोजी न्यूयॉर्क शहरात एका ज्यू कुटूंबात झाला.

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - १ (इंटरनेटचा उदय)

लेखक नानबा यांनी मंगळवार, 01/10/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट.. गेल्या काही वर्षांत बहुधा सर्वात जास्त वापरलं गेलेलं आणि बोललं गेलेलं प्रकरण. इंटरनेटशी जोडला न गेलेला माणूस आणि डोंबिवली ते सीएसटी रेल्वे प्रवासात शेजारी बसलेल्या अनोळखी स्त्रीसोबत एक अक्षरही न बोलणारी स्त्री सापडणं निव्वळ अशक्य. इंटरनेट ने जग जवळ आणलं म्हणतात ते खोटं नाही. पूर्वी घरातला कोणी परदेशी गेला, की त्याच्या फ़ोनची वाट पाहत रात्री उशीरा पर्यंत जागं राहणं, आंतरराष्ट्रीय पोस्टकार्डाची वाट पाहणं इ इ. प्रकार या पठ्ठ्याने बघता बघता नाहीसे केले.

ताळेबंद

लेखक देवांग यांनी सोमवार, 23/09/2013 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्यावरचं कर्जाचं ओझं जड झालं की आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य संपवणं , हा अलीकडे सोपा इलाज होऊ लागला आहे. पण आयुष्य मौल्यवान असतं , आपलं आणि आपल्याशी जोडलेल्या कुटुंबाचंही. ते ' अर्थपूर्ण ' करणं अधिक सोपं आहे , संपवण्यापेक्षा. .......... गेल्या आठवड्यात एका बातमीने सगळं मुंबई शहर हादरून गेलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कर्जबाजारी बापानं मुलांचा खून केला आणि नंतर पत्नीसह आत्महत्या केली. दोन दिवसांनी घरातून कुजलेले मृतदेह बाहेर काढावे लागले! खरंतर अशा बातम्या महिन्या दोन महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या शहरातून येत असतात. तपशील बदलतात ... कहाणी एकच असते. कर्जात आकंठ बुडालेलं कुटुंब.

हि गणपतीची अहवेलना थांबवायला हवी.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 17/09/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , सर्व प्रथम सर्व थोरा मोठ्यांना माझा नमस्कार. मी नवीन सभासद असून माझे काही विचार मी इथे मांडतो आहे. तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी. गेल्या काही वर्षात गणपती उत्सवाचे स्वरूप काहीसे बदलेले आहे, नदी तलाव प्रदूषित होवू नये म्हणून आपण सर्वजण इको फ्रेंडली (याला मराठी शब्द सुचवा कि कोणीतरी) गणेशोत्सव साजरा करीत आहेत. निसर्ग, पर्यावरण या विषयी जनता जागरूक होत आहे या बद्दल जनतेला धन्यवाद.