आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली.
नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय.
अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??!
पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं.. त्याच्या कुशीत झोपायला शिरतं. आईकडे जास्त जात नाही.
दादा हा ताईदेखील असू शकेल.. :)
आणि उरलेलं तिसरं (मधलं.. म्हणजे २ नंबर) पिल्लू मात्र मम्माज बॉय आहे. ते कायम आईच्या पंखाखाली.
लहान्या आणि मोठ्याला पंखातून सुटका करुन मोकळ्यावर खेळायची हौस.. तर मधला मात्र आईच्या पदरात सदैव दडून.. बाहेर आला तरी नुसतं डोचकं बाहेर काढून अंदाज घेतो आणि आत दडतो.
थोडक्यात मोठा दादा आणि शेंडेफळ (आत्तापावेतोचं) यांचा कंपू झालेला दिसतो. व्हिडीओ नीट पाहिलेत तर मी काय म्हणतो कळेलच. एकदोनदा तर मला दादा (अर्थात त्याचं स्वतःचं हादडून झाल्यावरच बहुधा..) त्याच्या छोट्या दोस्ताला खायला मदत करतानाही भासला. आणखी निरीक्षणाने पक्कं सांगता येईल.
३१ ऑक्टोबर..
१. आधी बघा एक थोडा मोठा व्हिडीओ. यात आई आणि पोरं यांच्या दिनचर्येतला काही भाग.. शिकारीचे लचके, पोरांची मागणी, घुबडाईची स्वतःची साफसफाई... आणखीही काही दिसलं तर मला कळवा. हा व्हिडीओ फक्त थोडा जास्त वेळ तुम्हाला या घरात डोकावता यावं यासाठी.
२. हा व्हिडीओ दिवाळीत काय होईल याची झलक दाखवतो. शेवटपर्यंत पाहिला तर आधी एक सुतळी बॉंम्ब किंवा लक्ष्मीतोटा उडल्यावरची रिअॅक्शन.. थोडीशीच.. आणि नंतर फटाक्यांची माळ वाजल्यावर मात्र एकदम दचकून चला रे पंखांखाली.. मस्ती बास आता.. असा घुबडाईचा पोक्त इशारा..
३. बिग ब्रदर ईटिंग लंच.. डिस्टर्बन्स नको.. घुबडाईकडे चिर्र चिर्र अशा आवाजांनी मागणी केली जाते आणि ती आणलेल्या शिकारीचा एक लचका तोडून पिल्लांना देते. पिल्लं गुणी आहेत. आ करुन भरवण्याचा हट्ट न धरता आपापली हाताने जेवतात.. (लिटरली.. पिल्लांचे पंजे प्रचंड आहेत.. ते लचका पंजात पकडून किंवा पंजे त्यात रोवून त्यावर बसून चोचीने आपापले खातात.) माझी अशी समजूत होती की त्यांना चोचीत भरवावं लागत असेल. अर्थात मोठं झालेलं पिल्लू अशा रितीने खात असेल हीदेखील शक्यता आहेच.
४. बिग ब्रो झोपलाय. त्याचा छोटा चाहता त्याला ढोसकलतोय. त्याच्यावर चढायचा प्रयत्न करतोय. इतकावेळ ते दोघे एकमेकांशी काहीतरी ढकलाढकली करत होते. त्यानंतर मोठा भाऊ झोपला. तेव्हा लहान बाळ "माझ्याशी अजून खेळ ना रे.. " असं म्हटल्यासारखं मला वाटलं.
५. मला माझ्या वाट्याचा लचका दे अशी घुबडाईकडे बडादादाची तीव्र मागणी आणि लचका तोडून मिळाल्यावर संतोष पावून तो कोपर्यात नेणे. (कोपर्यात घेऊन निवांत खात बसण्याचा भाग व्हिडीओत आलेला नाही.)
पिल्लं घशातून कसलातरी वेगळाच सीर्र सीर्र अशा आवाज करतात. तो यातल्या बर्याचशा व्हिडीओजमधे ऐकायला मिळेलच. पण त्या आवाजाने त्यांची शांतताप्रेमी आई वैतागते आणि त्यांना पंखाखाली घेऊन आणि अर्रर्र किंवा तत्सम दबक्या आवाजात दामटते असं दिसलं. केवळ खाणं / भक्ष्य इतकाच इंटरेस्ट न राहता आता त्या पिल्लांना (निदान थोरल्याला) खेळण्यातही रस उत्पन्न झाला आहे असं वाटतंय. एक रंगीबेरंगी चिंधी मिळाली आहे त्यांना. ती फाडत बसतात.
बाकी अपडेट उद्या किंवा जसाजसा लाभेल तसा. साधारण कालक्रमानुसार आणखी एक पिल्लू उद्या यायलाच हवं.
भेटू..
वाचने
62672
प्रतिक्रिया
187
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक आणि माहितीपूर्ण
+१
In reply to रोचक आणि माहितीपूर्ण by आतिवास
जबरा...
आता कस नाव झकास वाटत. मला
+१
In reply to आता कस नाव झकास वाटत. मला by स्पंदना
गवि तुम्ही अचाट आहात!
मस्त!
हा हा हा, लै मजा आली वाचून.
सुरेख .......
काल आणि आजच्या प्रतिमा..
रापचंडुस एकदम..
भारी चाललय हे सगळ्ं. आता
आजचे काय अपडेट्स? पहाटेच्या
******
3 Nov Update
कुठे आहेत
हो ना!
In reply to कुठे आहेत by अन्या दातार
@पैसाताई .. अन्या..
अहो अस कस
In reply to @पैसाताई .. अन्या.. by गवि
बुधवार ६ नोव्हेंबर. सर्व काही रिकामं. बरंच काही घडून गेलेलं.
अरे बाप रे. भयंकर आहे.
In reply to बुधवार ६ नोव्हेंबर. सर्व काही रिकामं. बरंच काही घडून गेलेलं. by गवि
अरेरे, मनात कुठेतरी
In reply to बुधवार ६ नोव्हेंबर. सर्व काही रिकामं. बरंच काही घडून गेलेलं. by गवि
:(
:(
फार अशुभ बातमी.
अरेरे !
:(
खूप वाईट वाटलं.
गवी तुमचे विशेष कौतुक
७ नोव्हें.
:(
गवि, खाली २ लिंका देत आहे.
धन्यवाद. त्या दृष्टीनेही
In reply to गवि, खाली २ लिंका देत आहे. by चैदजा
अंडी कशी काय पळवली गेली?
कावळे हाच सर्वात जास्त संशयित
In reply to अंडी कशी काय पळवली गेली? by परिंदा
:(
In reply to कावळे हाच सर्वात जास्त संशयित by गवि
:(...अजुन पिल्लं / पिल्लु
In reply to कावळे हाच सर्वात जास्त संशयित by गवि
गुड न्यूज.. सर्व वाट
:)
In reply to गुड न्यूज.. सर्व वाट by गवि
तुकडे करण्याविषयी मलाही तसं
In reply to :) by पैसा
हाहाहा!
In reply to तुकडे करण्याविषयी मलाही तसं by गवि
आता मात्र जर त्यांचे आईबाप
In reply to हाहाहा! by पैसा
मग ठीके!
In reply to आता मात्र जर त्यांचे आईबाप by गवि
हुशश!
In reply to गुड न्यूज.. सर्व वाट by गवि
हुश्श!!
In reply to गुड न्यूज.. सर्व वाट by गवि
वाचत आहे...
व्वा!!
सध्या तरी सर्व ठीकठाक चाललेलं
In reply to व्वा!! by निरु
माणसांची लहान पिल्ले देखील
In reply to सध्या तरी सर्व ठीकठाक चाललेलं by गवि
*****
आज प्रतिसाद द्यावासा वाटला.
माझ ही काही असच झाल होत.
In reply to आज प्रतिसाद द्यावासा वाटला. by स्पंदना
पक्षी आणि प्राण्यांच्या मदतीसाठी
१२ नोव्हेंबर.. हॅल्लो..!! गुड मॉर्निंग..!!
मस्त.
In reply to १२ नोव्हेंबर.. हॅल्लो..!! गुड मॉर्निंग..!! by गवि
हा हा हा! मस्तच!!
In reply to १२ नोव्हेंबर.. हॅल्लो..!! गुड मॉर्निंग..!! by गवि
गविशेठ वाचतोय.....
In reply to हा हा हा! मस्तच!! by चतुरंग
हे
In reply to १२ नोव्हेंबर.. हॅल्लो..!! गुड मॉर्निंग..!! by गवि
मस्त!!!!
पिलांचे फोटो भन्नाट आहेत. ही
उंदीर खाऊन झाल्यावर घुबडे
या धाग्यावर अनेक फोटोंत
In reply to उंदीर खाऊन झाल्यावर घुबडे by परिंदा
म्हणजे विष्ठा हा प्रकारच नसतो
In reply to या धाग्यावर अनेक फोटोंत by गवि
विष्ठेला पर्याय नाहीच..
In reply to म्हणजे विष्ठा हा प्रकारच नसतो by परिंदा
एक शंका.
In reply to विष्ठेला पर्याय नाहीच.. by गवि
ही घुबडे (आधी हजर असताना
In reply to एक शंका. by सुबोध खरे
गवि साहेब
In reply to ही घुबडे (आधी हजर असताना by गवि
नवीन फोटों टाका की गवि सर..
In reply to ही घुबडे (आधी हजर असताना by गवि
गोंडस हालचाली आणि फूत्कारही...
:)