Skip to main content

मांडणी

कायद्यात काही 'जादूटोणा' नाही

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 05/09/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
एडव्होकेट निर्मलकुमार सूर्यवंशी, महोदय, आपला दि ५ सप्टेंबर २०१३ च्या लोकसत्तामधील 'कायद्यात काही "जादूटोणा" नाही' अशा समर्पक शीर्षकाचा लेख वाचला. गैरसमज दूर व्हावेत याबाबत आपले लेखन स्तुत्य आहे. काही विचारणा - १. ज्या व्यक्तींच्या अनंत कष्टांमुळे हा कायदा निदान १२ कलमाच्या रू़पात सध्या सादर केला आहे, त्यांच्या संस्थांला या कलमांच्या आधारे दोषी लोकांना शोधायच्या व शिक्षा करायच्या कामात मदतनीस म्हणून सहभागी करता आलेले आहे की नाही? २.

काही दुवे...... आज एवढेच

लेखक ज्ञानव यांनी शनिवार, 31/08/2013 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
१) टंकलेखन आणि संगीत हे मिश्रण भुवया उंचावणारे आहे. आज मी इथे एक लिंक देतो आहे ज्यात एक मोठ्या सिम्फनीने टंकलेखकाचा वापर संगीत तयार करण्यासाठी केला. अनेक वेळा मी यु ट्युबवर काही गंमतीशीर पाहायला मिळेल म्हणून मुशाफिरी करत असतो (गमतीशीर पण सभ्यही!!) त्यात मला हा ऑर्केस्ट्रा पाहायला मिळाला आणि तो मला आवडला त्यातल्या मुझिक पीस तसेच वाजवणारे आणि typist (!!!???)ह्या दोघांचेही एक्स्प्रेशन्स फारच छान वाटतात. एके काळी मला आठवतंय टंकलेखक आणि शिवणाचे मशीन दोघांनी अनेकांच्या संसाराला आर्थिक हातभार लावला.

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/08/2013 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

शतशब्द कथा _________मस्ती

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 24/08/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लाईट टेकऑफ़ होताच... हवाईसुंदरी: काय हवेय? पोपट: काही नाही, बटन चेक करत होतो. हवाईसुंदरी: ओके, तुम्हाला काही हवे असल्यास मला बोलवा. पोपट: परत एकदा बोलवू काय? शेजारचा गाढव: का त्रास देतोस तिला? पोपट:अरे मस्ती हाय रे माझ्यात. हवाईसुंदरी: आता काय हवेय? पोपट: माझ्याशी मय्यतरी करणार काय? हवाईसुंदरी: परत अशी नाटके केलीस तर खाली फेकून देईन. पोपट: गाढवा ही नुसत्या पोकळ धमक्या देते.तू बोलव परत तिला. काय करती बघू. गाढवच ते.....................बोलावते. . हवाईसुंदरी: उठा दरवाज्याकडे चला. . . हवाईसुंदरीच्या मस्त लाथेसोबत पोपट आणि गाढव विमानाबाहेर........ . आता.........

फ्लर्टिंग-दि संस्कृत वे.

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 10/07/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स, हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे.

गेटींग थिंग्स डन - डेव्हीड अ‍ॅलन

लेखक सुधीर यांनी रविवार, 30/06/2013 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
कधी असं होतं का? एखादं काम करायचं आहे हे आपल्याला फार पूर्वी लक्षात आलेलं असतं. पण इतर महत्त्वाच्या कामांच्या उपद्व्यापात आपण ते छोटंसं काम पूर्णपणे विसरून जातो आणि मग एक वेळ अशी येते की ते काम "आज, आता, ताबडतोब" म्हणून बोंबलतं. मग हातातली सगळी इतर कामं सोडून आपल्याला त्या कामाच्या पाठी लागण्याशिवाय गत्यंतर नसतं. असं बर्‍याच वेळा होतं आणि सगळी कामं सोडून ते काम करण्यात फारसं विशेषही नसतं. पण कधी कधी असं झाल्याने आपल्याला चांगलाच आर्थिक वा इतर फटका पडतो.

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 26/06/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! ....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो.

मनरक्षिता (२)

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 25/06/2013 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनरक्षिता (१) चैतीला आठवत होतं तसं ती अन आई दोघीच रहात होत्या. तिचा बाप मोठा उमदा माणूस होता असं आई सांगे. गावाशी दावा मांडून जोगतिणीच्या पोरीबरोबर लग्न करणारा हिम्मतवान गडी ! ताराबरोबर लग्न केल्यावर तिला गावाचा त्रास व्हायला नको म्हणून राहता गाव सोडून दहा गावापलीकडच्या उंबरगावात राहायला आलेला. चैती तीन वर्षाची असताना एका दहा वर्षाच्या पोराला पुरातनं वाचवायला म्हणून गेला अन परत आलाच नाही. पोर वाचलं पण हा नदीतनं धारेला लागला. तो गेल्यावर तारानं दुसरा घरोबा केला नाही. चरितार्थाला काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला.