मावशी... मीनल मावशी
आईची बालमैत्रीण...
पूर्ण नाव मीनल कवळे.
लग्ना आधीचं मीनल राउत.
मुळची आक्षीची...
आई आणि ती खुप धमाल करायचे म्हणे, कबड्डी चैंप होती म्हणे! नेशनल लेवल पर्यन्त मजल!... आई आणि मावशी आणि ग्रुप सायकल चालवायचे आक्षिच्या अरुंद रास्त्यांवरून आणि मी त्यांना बघुन घराच्या फाटकावर रडरड रडायचो... हा सीन अगदी नीट आठवतो मला, एकूणच सॉलिड मैत्री!
लकीली लग्न होऊन मावशी बोरिवलीत आली...
आम्ही ही बोरिवलीतच राहायचो, शाळेच्या ५मिनट अंतरावर मावशी आणि १५मिंटावर आमचं, त्यामुळे शाळा झाली की आई मावशी कडून मला घ्यायला यायची... आई माझ्या 'प्रगती'पुस्तकावर खुश नसायची म्हणून माझी शिकवणी मावशी कड़े...
मिसळपाव