मामलेदार मिसळ पंढरी
लेखनप्रकार
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला.
रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते.
अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले.
पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती.
अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला.
आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले,
मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान?
सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??",
बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली.
क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं.
अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय )
त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो.
गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते".
अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास !
मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो
आमचे काही अलिखित नियम आहेत
रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही
आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे
टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे
वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे
समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे,
नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे
पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे
सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे
पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे.
मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
वाचने
33992
वाचनखूण
प्रतिक्रिया
209
आयला हा लेख तर पुण्यातुन
मामलेदार मिसळ मंदिर.....अरे बाप रे....
In reply to मामलेदार मिसळ मंदिर.....अरे बाप रे.... by माम्लेदारचा पन्खा
माफ करा ते राहून गेलं
मामलेदारला वड्याबरोबर मिळणारी
In reply to मामलेदारला वड्याबरोबर मिळणारी by प्रचेतस
धैर्यवान आहात.....
In reply to धैर्यवान आहात..... by माम्लेदारचा पन्खा
=))
In reply to =)) by प्रचेतस
फडतरे रॉक्स!
In reply to फडतरे रॉक्स! by वेल्लाभट
कधी गेलो तर खाईन नक्कीच.
In reply to फडतरे रॉक्स! by वेल्लाभट
+१००
In reply to +१०० by स्वच्छंदी_मनोज
गोपाळपेक्षा
In reply to गोपाळपेक्षा by पैसा
नको नको.. रत्नागिरीच्या खाद्य
In reply to नको नको.. रत्नागिरीच्या खाद्य by गवि
आहे आहे!
In reply to नको नको.. रत्नागिरीच्या खाद्य by गवि
टपरी??
In reply to टपरी?? by नन्दादीप
साईश्वरी सोबत वायंगणकरचा
In reply to साईश्वरी सोबत वायंगणकरचा by विशाखा राऊत
बोंद्रेकाकांनी थिबा
In reply to बोंद्रेकाकांनी थिबा by गवि
वैशाली मला वाटते
In reply to वैशाली मला वाटते by पैसा
मारुतीमंदिराच्या जवळ भाटवडेकर
In reply to मारुतीमंदिराच्या जवळ भाटवडेकर by गवि
विहार डिलक्स,
In reply to विहार डिलक्स, by पैसा
आहाहा...
In reply to आहाहा... by स्वच्छंदी_मनोज
पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा
In reply to पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा by गवि
करेक्ट
In reply to करेक्ट by स्वच्छंदी_मनोज
कृपया लगेच रत्नागिरी असा धागा
In reply to कृपया लगेच रत्नागिरी असा धागा by गवि
+१००
In reply to कृपया लगेच रत्नागिरी असा धागा by गवि
खरच खुप आठवणी जाग्या झाल्या.
In reply to कृपया लगेच रत्नागिरी असा धागा by गवि
खरंच, खरंच.
In reply to विहार डिलक्स, by पैसा
मी ह्यावेळी कोहाळेपाक आणला
In reply to मी ह्यावेळी कोहाळेपाक आणला by विशाखा राऊत
कोहाळेपाक = पेठा
In reply to कोहाळेपाक = पेठा by सुनील
अगदी = नाही
In reply to कोहाळेपाक = पेठा by सुनील
पेठा वेगळा.. कोहाळेपाक वेगळा.
In reply to फडतरे रॉक्स! by वेल्लाभट
एवढी भारी असते? गेली सहा
In reply to फडतरे रॉक्स! by वेल्लाभट
लय भारी...
In reply to लय भारी... by नन्दादीप
रसराज की काय... गोपाळच्या
In reply to रसराज की काय... गोपाळच्या by विशाखा राऊत
रसराज जुनं ग
In reply to रसराज जुनं ग by पैसा
रसराजच
In reply to रसराजच by नन्दादीप
भेळेने सुरुवात केलेली!
In reply to भेळेने सुरुवात केलेली! by पैसा
ताई तेच ते पण आता सध्या नवीन
In reply to ताई तेच ते पण आता सध्या नवीन by विशाखा राऊत
+१
In reply to ताई तेच ते पण आता सध्या नवीन by विशाखा राऊत
मी +१
In reply to =)) by प्रचेतस
+१०० फॉर फडतरे
In reply to +१०० फॉर फडतरे by कपिलमुनी
गर्दीमुळे फक्त!
बेश्ट मिसळ मिळण्याची ठिकाणे
In reply to बेश्ट मिसळ मिळण्याची ठिकाणे by मीउमेश
अहो ती मुनमुन मामलेदारकडूनच
In reply to अहो ती मुनमुन मामलेदारकडूनच by प्रचेतस
किधर हय?
In reply to अहो ती मुनमुन मामलेदारकडूनच by प्रचेतस
जयश्री
In reply to अहो ती मुनमुन मामलेदारकडूनच by प्रचेतस
चिंचवड ला अरिहंत मिसळ मस्त एकदम :) !!!!
साहेब जास्त तिखट म्हणजे मिसळ
त्या मिसळीला तिखटपणा
असं काहीही नाही , अफवा आहे
" होऊन जाऊदे" अशी हाक मारताच
मिसळ आख्यान वाचुन पोट तुडुंब
In reply to मिसळ आख्यान वाचुन पोट तुडुंब by भावना कल्लोळ
भावना कल्लोळ
In reply to मिसळ आख्यान वाचुन पोट तुडुंब by भावना कल्लोळ
मामिचा पत्ता
In reply to मिसळ आख्यान वाचुन पोट तुडुंब by भावना कल्लोळ
ठाणे पश्चिम स्टेशन जवळच चालत ५-७ मिनिट अंतरावर आहे
मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी by संदीप डांगे
अर्थात अण्णा! १०१% सहमत!
In reply to अर्थात अण्णा! १०१% सहमत! by बोका-ए-आझम
मिसळ जबराट असल्यामुळे नाव
In reply to अर्थात अण्णा! १०१% सहमत! by बोका-ए-आझम
वावी
In reply to अर्थात अण्णा! १०१% सहमत! by बोका-ए-आझम
राम भाऊ ची मिसळ.... नाव
In reply to अर्थात अण्णा! १०१% सहमत! by बोका-ए-आझम
राम भाऊ ची मिसळ.... नाव
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी by संदीप डांगे
ते म्मिसळीच प्रॉपर हॉटेल टाइप
In reply to ते म्मिसळीच प्रॉपर हॉटेल टाइप by मृत्युन्जय
अशी बरीच हॉटेलं आहेत.
In reply to अशी बरीच हॉटेलं आहेत. by संदीप डांगे
बर्फाचा गोळा
In reply to बर्फाचा गोळा by होबासराव
बावा आम्ही नवा मोबाइल घेतला
In reply to अशी बरीच हॉटेलं आहेत. by संदीप डांगे
आकोलेकी पाणीपुरी
In reply to आकोलेकी पाणीपुरी by अनिरुद्ध.वैद्य
बास बास. एकदम!
In reply to बास बास. एकदम! by संदीप डांगे
पावनेबॉ (पंत या अर्थाने)
In reply to पावनेबॉ (पंत या अर्थाने) by होबासराव
बापुसायेब सांगत होते ना हो की
In reply to बापुसायेब सांगत होते ना हो की by संदीप डांगे
आत्ता हाय मि बि थेच त म्हनुन राय्ल्तो
In reply to आत्ता हाय मि बि थेच त म्हनुन राय्ल्तो by होबासराव
स्वारी बर
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी by संदीप डांगे
आता नाशकात आलो की...
In reply to आता नाशकात आलो की... by मुक्त विहारि
कधीपासून वाट बघतोय तुमची
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी by संदीप डांगे
माफ करा
In reply to माफ करा by मीउमेश
कुठे आणि कधी खाल्ली ते
In reply to माफ करा by मीउमेश
हे वाचा. मग नाशिकची मिसळ असं का म्हणतात ते कळेल!
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी by संदीप डांगे
आठवणिंनी मन भरुन आलं.
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी by संदीप डांगे
+++११११
लढ बाप्पू
मामलेदार ची मिसळ नंबर १.
In reply to मामलेदार ची मिसळ नंबर १. by शान्तिप्रिय
मापं हे आमचे खास मित्र असले
In reply to मापं हे आमचे खास मित्र असले by अभ्या..
हायला....ऐकावं ते नवलच....
In reply to हायला....ऐकावं ते नवलच.... by माम्लेदारचा पन्खा
मापंदादा एक ठिकाण तर वर
In reply to मापंदादा एक ठिकाण तर वर by अभ्या..
भाक-या ज्वारीच्याच ना भाऊ?
In reply to भाक-या ज्वारीच्याच ना भाऊ? by बोका-ए-आझम
नरीबाला हे काय एकलेले नाय
In reply to मापंदादा एक ठिकाण तर वर by अभ्या..
निमंत्रितांच्या ??
In reply to निमंत्रितांच्या ?? by कपिलमुनी
माजघरातल्यांचा आहे का कट्टा?
In reply to माजघरातल्यांचा आहे का कट्टा? by टवाळ कार्टा
हम्म. म्हणू शकतोस. सगळे
In reply to निमंत्रितांच्या ?? by कपिलमुनी
:)
In reply to :) by चांदणे संदीप
घरच्यानी पत्रिकेची अपेक्षा
मिसळ वर तर्री ओतून घेणे हे
मिसळ-पाव म्हणजे नाशिक