मिशन हस्ताक्षर

पिंगू जनातलं, मनातलं
सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले. काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही. तेव्हा जरा भूतकाळात डोकावण्याची इच्छा झाली. शाळेतील ते दिवस आठवले. पाचवी-सहावीला असताना माझे अक्षर म्हणजे शाळेत असताना एक अगम्य होतं. शिक्षक म्हणायचे कार्ट्या काय ह्या कोंबडीच्या नख्या काढल्यात. त्यामुळे कधी कधी गृहपाठाची वही डोक्यात पडायची. हा नित्यनेम सातवीत जाईपावेतो असाच होता. सातवीला एका भल्या शिक्षकांनी मला अक्षर सुधारण्यावर भर दिला आणि त्या गुरुंच्या कृपेने माझे अक्षर अगदी दृष्ट लागण्याइतके सुरेख झाले. तेव्हापासून ते शिक्षण पुर्ण होईपर्यंत माझे अक्षर अतिशय उत्तम राहिले. पण काही म्हणजे तीन-चार वर्षांपूर्वी जेव्हा आयटी क्षेत्रात प्रवेश केला आणि कळफलक बडवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझे अक्षर लेखन बिघडायला लागले. सुरुवातीला काही लक्ष दिले नाही. पण आता वाटतयं की काहीतरी गमावतोय. सहज हातात पेन घेउन लिहण्याचा जरी प्रयत्न केला, तरी मी काही शब्द नीट लिहू शकत नाही. म्हणजे काय तर एकंदरीत मी माझी लिहण्याची क्षमताच गमावून बसलोय. मग पुन्हा एकदा अक्षरप्रपंच सुरु करावासा वाटला आणि त्याला सुरुवात करतोय, पुन्हा तीच ती जुनी शाईची लेखणी घेउन.. मग तुम्ही केव्हा सुरु करताय. लिखाण करायला.... शाईची लेखणी घेउन..
वर्गीकरण
लेखनप्रकार

16 टिप्पण्या 2,735 दृश्ये

Comments

सुहास.. नवीन

http://misalpav.com/node/15094 मनापासन लिहीलेला स्पावड्याचा लेख आठवला .. माझ हस्ताक्षर हल्ली थोडं बिघडत चालले आहे ..

विसुनाना नवीन

लेखातील विचाराशी सहमत. - हेसुद्धा पेनाने लिहिता आले असते तर बरे झाले असते.

विनायक बेलापुरे नवीन

टंकताना सगळे क्लोन्स वाटतात , एकाच मापाचे एकाच वळणाचे.( किंवा आडवळणाचे :)) हस्ताक्षर वाचताना लिखाणासोबत माणूसही वाचला जातो नकळत. मनापासन लिहीलेला स्पावड्याचा लेख आठवला .. +१

आत्मशून्य नवीन

तसही टच स्च्रीन वर थोडे अक्षर बीघडले तर काही फरक पडत नाही, त्याचं ते सांभाळून घेते. अथवा जर स्वतःचे हस्ताक्षर इतके आवडत असेल तर तूमच्या हस्ताक्षराचा फाँटही करून भेटतो. माझा मीत्र आहे जो हे प्रकार करायाचा त्याला जॉब नसताना. आताही करता येइलच. अथवा लेखन केलेला कागद स्कॅन मारून इथे दाखवणे हा पण एक पर्याय आहेच, पण काही काही लोकांना तो दीसू शकणार नाही.

सर्वसाक्षी नवीन

पण कारण वेगळे आहे. अस म्हणतात की शाईच्या लेखणीने लिहिले तर अक्षर जरा बरे येते, तेव्हा त्या आशेवर आहे. बाकी अक्षर वाईट असणे अगदीच वाईट नाही, बहुधा मी परिक्षकांना अक्षर फारसे न लागल्याने उत्तिर्ण होत गेलो असे वाटते. पहिल्या दोन ओळी म्हणजे जे पक्के माहित आहे ते बर्‍या अक्षरात मग उरलेला परिच्छेद फराटायचा. पोराने बरीच मेहनत केली, तर त्या पाचातले दोन अडीच द्यावेत म्हणुन ती भली माणसे दान द्यायची.

पंगा नवीन

In reply to by सर्वसाक्षी

बहुधा मी परिक्षकांना अक्षर फारसे न लागल्याने उत्तिर्ण होत गेलो असे वाटते. पहिल्या दोन ओळी म्हणजे जे पक्के माहित आहे ते बर्‍या अक्षरात मग उरलेला परिच्छेद फराटायचा.
परीक्षक संपूर्ण उत्तर वाचत नाहीत, केवळ पहिल्या एकदोन वाक्यांत जे काही दिसते ते पाहून त्याच्या योग्यायोग्यतेच्या आधारावर, उरलेले संपूर्ण उत्तर वाचायचे कष्ट न घेता, गुण देतात, यात फारसे तथ्य नसावे. किंबहुना, हेच गृहीतक वापरण्याबद्दलचा माझा वैयक्तिक अनुभव काही वेगळे सांगतो. असेच एकदा गणिताच्या परीक्षेत कशाचीतरी सिद्धता लिहिताना, सुरुवातीच्या काही पायर्‍या व्यवस्थित माहीत असताना मध्येच कोठेतरी अडखळल्यावर, जेवढ्या येत होत्या त्यातील सुरुवातीच्या काही पायर्‍या व्यवस्थित अक्षरांत आणि त्यापुढच्या येत असलेल्या पायर्‍या काहीशा गचाळ अक्षरांत मांडून, त्यापुढील आठवत नसलेल्या पायर्‍या सोडून देऊन थेट साध्य मांडून त्यापुढे 'हेन्स प्रूव्ड' असे लिहिण्याचा प्रयोग करून पाहिला होता. परीक्षकांनी जेवढे द्यायचे तेवढेच गुण देऊन, तेवढ्या 'हेन्स प्रूव्ड'वर काट मारून त्याजागी 'हेन्स नॉट प्रूव्ड' ('नॉट' मोठ्या अक्षरांत, दोनदा अधोरेखित) असे लिहिले होते. तेव्हा, 'परीक्षक संपूर्ण उत्तर वाचण्याचे कष्ट घेत नाहीत' हे सरसकट सत्य असण्याबाबत साशंक आहे.

सहज नवीन

In reply to by पंगा

आता तर म्हणे 'माहीती अधीकार' आल्यापासुन उत्तरपत्रीका द्यावी लागू शकते म्हणुन अजुनच काटेकोरपणे तपासायला लागते असे ऐकले आहे. जाणकार मंडळी आधीक खुलासा करतील. शुद्धलेखन 'चांगले' होण्याकरता 'नेमके/ शास्त्रोक्त पद्धतीने अक्षर गिरवणे, अक्षरांचा आकार शक्य तितका समान ठेवणे' आत्मसात करणे गरजेचे. शुभेच्छा!

क्रान्ति नवीन

आजकाल खरंच लिखाणाची सवय मोडलीय. त्यामुळे अक्षर बिघडतंय. पुन्हा हातानं, शाईच्या लेखणीनं लिहायची सवय करायलाच हवीय!

पिंगू नवीन

अक्षर सुधारणा ही परिक्षकांसाठी नाही. तर स्वतःसाठी करायची गोष्ट आहे. कारण माझे एक ठाम मत असे आहे की सुंदर हस्ताक्षर हा तुमच्या उत्तम व्यक्तिमत्वाचा आरसाच नाही का.. - पिंगू

पिवळा डांबिस नवीन

पिंगूशेठ, तुमच्या ह्स्ताक्षरविषयी आत्मियतेबद्द्ल आम्हाला संपूर्ण आदर आहे. परंतु, मग तुम्ही केव्हा सुरु करताय. लिखाण करायला.... शाईची लेखणी घेउन.. नो चान्स! एका मृतकलेमागे अजिबात वेळ दवडणार नाही! :) सदैव सैनिका, पुढेच जायचे... न मागुती तुवा, कधी फिरायचे!!!!

Nile नवीन

In reply to by पिवळा डांबिस

सहमत! पेनने लिहणे जितके कमी तितके उत्तम असे वाटु लागले आहे. कशाला उगाच कागदावर घाण करायची? बाकी पंगाशेटबरोबर पण, एक परिक्षक या नात्याने, सहमत. नसा बरोबर पकडता येतात.

कलंत्री नवीन

एका चांगल्या कथेचा विषय आहे हा.... एक ग्रामिण भागातील मूलगा ---- शाळेत अक्षर आणि आपली कामगीरी सूधारत असतो---- शहरात येतो----- भरपूर पगाराची नौकरी ( संगणक क्षेत्रात)---- लग्न होते तेही एका संगणकीशी----भरभराट होते----- काही काळानंतर बिनसत जाते---- मनभंग होते----- शेवटी कोलमडतो----- अमेरिकामध्ये वैद्यकिय मदतीसाठी जातो------ तेथले वैद्यही हतप्रभ ------- निराश होतो---परत गावी येतो---- जूने शिक्षक भेटतात - शिकवणी घेतात --- अक्षर काढता काढता जून्या स्मृती जागतात---- परत बरा होतो. दूरचित्रवाणीवर कमीत कमी २५० तरी धारा पडतील. हलके घ्या......

हृदय भेदी नवीन

श्री पिंगु यांनी एक कळीचा मुद्दा उचललेला आहे. अहो हस्ताक्षर ही एक अडचण आहेच त्या पेक्षा मोठी अडचण व्याकरण आहे.आजकाल लघुसंदेशांच्या जमान्यात ईंग्रजीची वाट लागली आहे तिथे पहिली दुसरी वेलांटी किंवा उकारांना विचारतो कोण ? पण मी सुद्धा काही महिन्यांपूर्वी अत्यंत कसोशीने प्रयत्नं करुन मराठी टंकलेखन शिकलो. तसेच मी चक्क एक दौत आणि टाक पण विकत आणला. तो वापरुन आठवड्यातुन काही मिनीटे तरी मी मराठीत काहीतरी लिहीतो. कार्यालयात जेंव्हा फोनवर बोलतांना काही टिपुन घ्यायचे असल्यास आवर्जुन मराठीत लिहीतो. प्रयत्नं करुन बघा -हे आणखीनच अवघड असतं. हात मराठी अक्षर लिहायला पटकन वळतच नाही. आउटलुकच्या टु डु लिस्ट मधेपण ' अमक्याला फोन करणें' तमका स्प्रेड्शीट अपडेट करणे ' ' याला ईमेल करणे ' अश्या एन्ट्री करतो. मराठी अक्षरे संगणकात खास टाकुन घेतली आहेत. आणि आज विषय निघालाच आहे तर कोणी मला हे सांगु शकेल का की खरेखुरे उत्तम टाक कुठे मिळु शकतील ? मला खुप शोधल्यानंतर एका प्लास्टीकच्या खाच्यात निब खोचलेले टाक मिळाले. पण पूर्वी पुस्तिका लेखन करतांना वापरायचो तशे टाक कुठे मिळतील का ? मी मुंबई-पुणे येथे कुठेही जाउन ते विकत घ्यायला तयार आहे. आणी चांगले आठ दहा घेउन ठेवेन. पुढच्या पिढीला एक पुरातन वस्तु म्हणुन जतन करायला सांगेन. धन्यवाद एका नव्या महत्वाच्या विषयाला फोडल्या बद्दल...... _________हृदय भेदी.