होळी २०११

Antarang जनातलं, मनातलं
पुण्यात येवुन जवळ ४ वर्ष होत अलीत.... पण कधीच पुण्यातील होळी पाहण्याची इच्छा अथवा योग आला नाही... घरी होतो तेव्हा या सणाना फार महत्व होते आणी आज पण आहे... तेव्हा कमीत कमी शाळा/कोलेजला सुट्टी तरी असायची कीव्हा घरात काहीना काही गोड धोड बनत असायचे ... पण बाहेर असल्यावर ह्या गोष्टी अनुभवायला काय पहायला पण मीळत नाही... काल आमच्या सोसायटीतल्या (आमची एक अपार्टमेन्ट) मन्ड्ळीनी होळी साजरी करायचा बेत आखला होता..त्यात शनीवार असल्याने बाजुच्या काकु आणि ताईनी होळी बघायला बोलावले होते.... रुमवर माझा एक रुममेट आणि मी दोघेच तेवढे इच्छुक्...बाकी कुणाला असल्या प्रकारात रस नसतो... सध्याकाळी होळी साठी काकुनी परत एक वेळा आवाज दिला ...मी आणि रुममेट बाहेर अन्गनात गेलो.... होळी सजवुन तयार होती.... सर्वे काकु बाया पुज्या करत होत्या... माणस बाजुला उभी ... काही जण मदत करत होती... लहान मुल आपल्याच आनन्दात खेळत होती.. त्याना यातील एक काहीच कळत नाही... पण प्रश्न जगाभरचे आपल्या बाबाना किवा आजोबाना वीचारतात त्यातल्या काहीचे उत्तर मीळते काही ..... हे सर्वे आम्ही थोडे दुर उभे राहुन पाहत होते... पण हा एक क्षण आप्ल्याला भुतकाळात कितीतरी मागे घेउण जातो.. त्यामुलाना पाहुन जणु स्वतालाच आपण शोधत असतो ... कारण ह्या गोष्टीचा आनन्द हा बालपणातच जास्त असतो... मोठे झाल्यावर सण म्हणजे फक्त ओपचारीकताच राहुन जाते... तरीहि पण मागच्या ४-५ वर्षातली एकमेव साजरी केलेली होळी खरच खुप सुन्दर होती...
वर्गीकरण
लेखनप्रकार

7 टिप्पण्या 2,368 दृश्ये

Comments

रामदास नवीन

सुरुवात चांगली केली आहे. लिहीत रहा .

छोटा डॉन नवीन

In reply to by रामदास

>>सुरुवात चांगली केली आहे. लिहीत रहा . +१, हेच म्हणतो. छान लिहले आहे, पुढील लिखाणाची वाट बघत आहे. - छोटा डॉन

सूर्यपुत्र नवीन

>>मोठे झाल्यावर सण म्हणजे फक्त ओपचारीकताच राहुन जाते एकदम खरंय... त्यामुळे सणाच्या दिवशी आंघोळ उशीरा/न करणे असे होते, म्हणून सण साजरे करतच नाही... पण; "आई, आज होळी ना? मग पुरणपोळी कधी करणारेस?" असा प्रश्न विचारल्याशिवाय रहावतच नाही. मग जे घडते... :) -सूर्यपुत्र.

पैसा नवीन

'मिसळपाव'वर स्वागत! पहिलाच लेख असल्यामुळे टाइप करायला जरा कठीण वाटलं असेल. हळूहळू जरा मोठे लेख लिहा!