मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौनाइतके कुणीच नाही

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अथांग, उत्कट, उधाणले तरि किनार ओढुन जसा समिंदर.. स्थितप्रज्ञ कधि सळसळणारे जळाकाठचे वा औदुंबर.. प्रेमळ, नाजुक, पोक्त, समंजस प्राजक्तासम हळवे लोभस.. काजळ रेखुन कधि भिडणारे खट्याळ हट्टी अवखळ ओजस.. कितीहि काही आत उकळले संतापाला घट्ट आवरे.‌ शालिन कधि तर भळभळणारे मिटल्या ओठी दु:ख गोजिरे.. ....... असे देखणे, असे बोलके मौनाइतके कुणीच नाही.... कुणीच नाही.

वाचने 6835 वाचनखूण प्रतिक्रिया 11

नाखु 10/11/2019 - 09:41
आहे, ना बोले तुम या गाण्याच्या जातकुळीतले. मौन राखण्यात सतत अपयशी मिपाकर नाखु

सोत्रि 10/11/2019 - 10:04
पद्यात मला गती नाही पण ह्या रचनेमागचा भाव एकदम भावला! - (मौनात राहायला आवडणारा) सोकाजी