मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सैराट

एपी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सैराट पाहता तिला भर दुपारी, पहाट होत जातो मी चाकरी कुणाची असो, कंत्राट होत जातो मी. * तसा बर्फ-गोळा हेच नाव साजरे मला बोलता ती कुणाशी, सैराट होत जातो मी. * मार्गिका असे माझी, सरळ नाकासमोरी उल्लेख होता तिचा, भन्नाट होत जातो मी. * मी कुणाला काय द्यावे? लायकी माझी नव्हे कफल्लक होत असता, खैरात होत जातो मी. * -डॉ. अशोक कुलकर्णी (एपी)

वाचने 903 वाचनखूण प्रतिक्रिया 0