श्वास
लेखनविषय:
- Read more about श्वास
- Log in or register to post comments
तुझ्याच आठवांमधुनी सखे काही श्वास तरंगून गेले
घडा रिताच राहीला आयुष्याचा अन प्राण कलंडून गेले
हात तुझे ते हातांमधले एकांती स्मरुनीया गेले
रंग हळवे ते शपथांचे भासात विरुनीया गेले
आधार वाटणारे तुझे ते डोळे काल स्वप्नात दिसुनीया गेले
दडपलेले दुःख मनातील शब्दात उतरुनिया गेले