मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

आग व संशयाचा धुर

बाजीगर ·
लेखनविषय:
दिल्ली न्यायाधीशाच्या घरी लागली आग, अग्निशमन कर्मचाऱ्यांना, घरात दिसली नोटांची थप्पी, काढता आगीचा माग ।। होते म्हणे 15 कोटी घबाड, तरीही नाही धरला लबाड ।। वर्मावर बोट आल्यावर, केली त्यांनी रदबदली, राजीनामा न घेता, त्यांची फक्त केली बदली ।। दिल्ली न्यायाधीशाच्या घरी लागली आग, पैशाचा पूर, संशयाचा धुर तरीही न्यायाला आली नाही जाग ।।

तुकाराम बीज सोहळा...

बाजीगर ·
लेखनविषय:
तुकाराम बीज सोहळा... (375 वर्ष पूर्ण सोहळा ) तीर्थ देहू, झाले सज्ज बीज आज, तुकाराम ।। त्रिशतकोत्तर, अमृतमहोत्सव, हा सण उत्सव, देहू क्षेत्री ।। बीजसोहळा, टाळ मृदंग, भाविक दंग, विठूनाम ।। लाखो भाविक, फुलांची सजावट, दु:खाची वजावट, नाचू रंगे ।। सोळा कॅमेरे, करती देखरेख, रांगोळी रेख, सुबकशी।। चोख व्यवस्था, स्वच्छता कर्मचारी, व्यस्त ते आचारी, वैकुंठस्थान ।। तरले अभंग, जुन्या आठवणी, उचंबळे इंद्रायणी, भेट घेण्या ।। वरून तुका, विमान गरुड अभंग गारुड, पाहतसे ।। अभंग गाथा, एकेक अक्षर, आहे ते अक्षय, अमृताचे ।। अभंग फॉर्म, शब्दप्रतिमा ध्यास, जाणकार अभ्यास, रात्र

नाराजीनामा

बाजीगर ·
लेखनविषय:
अखेर ते घडले दागी मंत्री पडले ।। मंत्रिपदाचे ते कवच, भ्रष्टांना असते हवंच ।। कवच असता न्याय ओलीस, कवच नसता ओढतील पोलीस ।। म्हणे फोटो पाहून हेलावले, राजीनाम्याला पेन लावले ।। पोलीस,राजकारणी, मीडिया, डॉक्टर, न्याय, सर्वांची आहे मिलीभगत, वोटर जनता पाहतेय भांबावल्यागत ।। एकेक निर्णयाला लागतेय सदी, एक पडला, दुसरा कधी ?!

दिसे ची ना

बाजीगर ·
लेखनविषय:
प्रसंग बाका, वाल्या च आका, दिवसा डाका, दिसेचीना।। पवन चक्की, जेल ची चक्की, गोष्ट पक्की, होईचिना।। सरपंच, रंगमंच, भ्रष्ट संच, न्याय चि ना ।। दागी मंत्री, गुन्हे जंत्री, राजीनामा, मागेचीना।। पळालं आंधळं, पोलीस पांगळं, दिसतंय सगळं सापडेचीना ।।

लाडकी झाली दोडकी...

बाजीगर ·
लेखनविषय:
लागली कडकी, घटली लाडकी ।। 9 लाख अपात्री, 135 कोटी/महिना खर्चाला कात्री ।। लाडकी बहिणीमुळे जिंकले, आता माशी शिंकली ।। चारचाकी नाहीना, कितीउत्पन्न महिना ?। आला 'त्यांचा ' आदेश, आता तपासा निकष ।। गरजू बहिणी राहूद्या अपात्र बहिणी जाऊद्या ।। म्हणे वेळ कमी होता, ना केलाआधार लिंक कोटा ।। 9 लाख मोठा आकडा, विरोधकांचा लावला निकाल वेडा वाकडा ।। नाना,दादा,भाऊ ची चलाखी, विरोधकांची केली हलाखी ।। आता गरज सरो, लाडकी मरो ।।

परीक्षा...कुणाची ?

बाजीगर ·
लेखनविषय:
परीक्षा...कुणाची? 'सी ई ओ'समोर पडला कॉप्यांचा पाऊस ! डोके गरगरले,संताप आला भाऊस ।। 'विकास मीना'- करारी, मारली धडक भरारी ।। बारावी चा गणिताचा पेपर, खोके भरून कॉप्या,गाईड, पाहून आले फेफरं ।। परीक्षाकेंद्रातून अनेकांनी मारली धूम, कॉपी फॅक्टरी हँडलूम ।। आता त्यांची सटकली, जबाबदारी ना झटकली ।। इमानदारीची लढाई आरपार, पूर्ण प्रशासन व पर्यवेक्षक यांच्यावर, केला पोलीस ठाण्यात FIR ।। आदर्श(?!)विद्यालय फुलंब्री संचालक पर्यवेक्षक नंबरी ।। कुंपण च शेत खाते, पर्यवेक्षक कॉपी देते ।। कशासाठी हे सर्व? शिक्षण न देता पास व्हावेत सर्व ।। विद्यार्थांना शिकायचे नाहीये. श

घरगुती हिंसा व पोटगी

बाजीगर ·
लेखनविषय:
https://marathi.freepressjournal.in/maharashtra/court-slaps-dhananjay-munde-order-to-pay-alimony-to-karuna-munde घ्या कविता faster than instant coffee कुणाची घ्यावी बाजू, confuse झाला तराजू ।। महीना 15 लाख मागणा-या पीडीतेची, कि बीडच्या दलाल, अडत्याची !! सामाजिक न्याय मंत्री, घरगुती हिंसाचाराची जंत्री ।। एकीकडे पैसा आणि सत्ता धन अन् जय, दूसरीकडे कोर्टाने दिला, करुणामय विजय ।। द्विभार्या कायद्याचा सविनय भंग, बीडमधे सामाजिक कार्य दबंग ।। तिकडे त्रासले दादा, मित्राला वाचवायचा वादा ।। जनता पहातेय तमाशा, डेमोक्रेझी चा ढोलताशा ।।

आयकर सुट

बाबुराव ·
लेखनविषय:
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट! पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट! सायकल चालवली जरा, फिटनेसची शान बजेट ऐकत बसलो, झाला गोड ताण टॅक्सचा जुगाड संपला, हसू फुटलं मुक्त निर्मला ताईंनी दिली सूट, मिळालं आयुष्याचं गिफ्ट! साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट शेअर्स घेतले थोडे, पण मार्

मौनी कुंभ

बाजीगर ·
लेखनविषय:
मोक्षाची ती घाई, संगम त्रिवेणी नेई, मौनी डूबकी देही, अमृतस्नान ।। नेत्यांचे स्नान, गर्दी ही बेभान, गमावले प्राण, निष्पाप तीस ।। सर्वा तीच वेळ, मग तोच खेळ, कसा करील मेळ, प्रशासन ।। मौनी अमावस्या, मोक्षाची समस्या, कीव आली मत्स्या, तैरतांना।।

खरा तरुण !

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
(सासवड - कस्तुरबा आश्रम येथील एका सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी , एका ८५ वर्षाच्या आजोबांनी खणखणीत आवाजामध्ये गीतरामायणातलं एक गाणं सादर केलं . त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या माझ्यातल्या तुलनेबद्दल जी भावना झाली, ती मी या कवितेतून मांडलेली आहे . ) ------------------------------ पंच्याऐंशीतला तरुण उभा माझ्या समोर ताजा ! पंचेचाळीशीतला बसलेला मी, अन् गुडघा दुखतो माझा ! त्या वेळचं हवा पाणि, अन् त्यांनी खाल्लेलं अन्न ताजं ! आणि प्रिझर्वेट पिझ्झा बर्गरवर फुगलेलं पोट माझं ! सांगा तुम्हीच आमच्या दोघातलं नक्की तरुण कोण ?