Skip to main content

कविता

यंदाचा पाऊस .

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 20/06/2025 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय . इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय ! बराच चिखल मग बरेच उन्ह मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून निसरडा कधी , गच्च ओला क्षणात रस्ता भिजवतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥ गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा , तरिही अंगावर आणवून काटा मोठ्या भावासारखा घाबरतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥ पाऊस कधी छपरावर नाहीतर गटारातल्या डुकरावर त्याची मर्जी फिरेल तसा हवं त्याच्या नशिबावर स्वतःची शक्ती पाऊस दाखवून "मीच परमेश्वर" , म्हणतोय पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .

अरे महिरावणा

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 19/06/2025 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
(सुधारित आवृत्ती) अरे महिरावणा । विडंबन घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी ॥ अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला ।

चा-वट पॉर्निमा!

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 11/06/2025 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
तिचे बोलणे खरे करते ती असे नखरे करते पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण जेवण सुद्धा बरे करते राग नक्की झूठ असावा प्रेम बहुदा खरे करते मिठी मध्ये घेते आणिक हट्ट सारे पुरे करते

शाळेचा पहिला दिवस...

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 10/06/2025 07:35 या दिवशी प्रकाशित केले.

उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले. कुणी घराकडे तर कुणी जाॅगर ट्रॅक कडे वळाले.

न्यायाधीश 'कॅश'वंत वर्मा...

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 09/06/2025 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
घ्या कविता... 'कॅश'वंत वर्मा, भोग आता कर्मा, महाभियोगधर्मा सामोरी जा || जर दिला राजीनामा, तर नाही काजीनामा, सांग तुझा कारनामा, निवृत्ती जा || न्यायाधीशाच्या घरी रोकड, आता तो शोधतो बोकड, जो घेईल खांद्यावर जोखड, वाचवण्या || संसदेत घेराव, मांडला ठराव, तरी हे राव, ढिम्म नाही || न्यायाधीश यशवंत पकडला गेला 'कॅश'वंत आता करणार बस वंत घरातच ||

मागवणे

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 29/05/2025 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
ते मागत गेले आम्ही देत गेलो, ते हागत गेले आम्ही होतो मेलो || लाखो रुपये हुंडा 'कस्पटा'समान दिले, त्यांचे काम मा(ह )गवणे आम्ही भरली बिले || आता वकील करतील चारित्र्य हनन, व्यर्थ ठिकाणी हृदय गुंतले तन मन||

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 05/05/2025 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.

लैराईदेवी जत्रा चेंगराचेंगरी

लेखक बाजीगर यांनी रविवार, 04/05/2025 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानात सर्वात स्वस्त गोष्ट माणसाचा जीव. रोज मरताहेत अकाली कशी करावी कीव? गोवा,शिरगाव येथील लैराईदेवी जत्रा जमले होते 40 हजार नऊ शे सतरा. गेले होते आशीर्वाद घेण्या, मिरवणुकीत सहभाग देण्या. करण्या कुटुंबाची हौस आणि मुलांची थोडी मौज. मिरवणुकीदरम्यान, एका ठिकाणी उतार, लोकांना नाही कळले ना रांग, नाही कतार गोंधळात लोक पडले, काही जोरात ओरडले एकमेकांवर लागले पडू बायका,मुले लागले रडू झाली भयानक चेंगराचेंगरी, 7 जण जागीच मेले, जशी मेंढरी 80 जण जखमी झाले त्यांना हॉस्पिटल नेले. संयोजकांचा आहेच दोष, तसेच भक्तांचा उन्माद जोश. मागे मांढरादेवी च्या जत्रेत मेले अनेक, कोर्ट शोधू शकले नाही कारण एक

धामणस्करांची 'वोक' कविता

लेखक माहितगार यांनी रविवार, 04/05/2025 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती.

ज्ञानेश्वरी- भाग-२- चंद्रबिंब झरतसे हिमार्त माळरानी या !

लेखक मारवा यांनी शनिवार, 03/05/2025 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
॥ हा अनुरागु भोगितां कुमुदिनी जाणे ॥ ज्ञानेश्वरी वाचतांना वाचकाचे काय होते माझा अनुभव सांगतो सर्वात अगोदर ज्ञानेश्वर आपल्याला मराठी पहिली च्या वर्गात बसवतात. आपलं मराठी भाषेचं ज्ञान तर जाऊच द्या शब्दसंग्रह कीती तोकडा आहे हे दाखवुन देतात. ज्ञानेश्वरीतल्या नुसत्या मराठी शब्दांवर एक फ़ार मोठं प्रकरण होइल. वाचतांना अनेक ठिकाणी सेरेनडिपीटी चा अनुभव येतो अनेक सुखद धक्के अनेक ओव्यांमधुन आपल्याला बसतच असतात.ज्ञानेश्वरी तशी सरळ वाचता येत नाही, एक झालं की दुसरां अध्याय अस होत नाहीच.