Skip to main content

कविता

"आई"

लेखक sanjubaba यांनी बुधवार, 07/01/2009 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आणू शब्दामध्ये सुगंधी दर्वळ..... "आई " म्हणजे वात्सल्याची श्रावणी हिर्वळ..... "आई" तुझ्या आठवणी चांदण्यातले कोवळे ऊन..... तुझ्या मायेचा स्पर्श माझ्या पाठीवर अजुन... "आई" तुझे स्वरुप कसे शब्दरंगात चिता रु..... तू वात्सल्याचे आकाश माझे शब्द इवले पाखरू... "आई" संस्काराची शिदोरी "आई" त्यागाचे प्रमाण..... "आई" प्रेमाची मूर्ती "आई" त्या ईश्वरा समान.... "आई" तुझ्या आठवणीने आज मन हेलावते.... पण तूच दिलेल्या मायेने दु:ख माझे सावरते.... हीच प्रार्थना माझी त्या दयाळु ईश्वराला..... तुझ्याकडे
Taxonomy upgrade extras

अर्धांगीनि

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 06/01/2009 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिळता नजरेस नजर गोड्शी लाजलिस तु पुन्हा भेट झाली मधाळशी हसलिस तु, विचारता नाव तुझे किति बावरलीस तु नावाने मारता हाक किति खुललीस तु चुंबिता अधर तुझे पाकळी झालिस तु घेता मिठित तुजला रतिरुप झालीस तु शब्द माझे होते कविता झालिस तु शब्द संपले होते, मौनातुन संवाद्शी तु पुर्णत्व आले पौरुषत्वाला जशी अर्धांगीनि झालिस तु @Avinash

क्षितीज

लेखक शाल्मलि यांनी रविवार, 04/01/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
अदम्य इच्छा ही मनत क्षितीज होण्याची, असते जेथे ओढ वेडया धरतील नभाला भेटण्याची; मात्र तो असतो फक्त एक अभास तरी आहे वेडया मनला अजुनही कोणाची आस?

जुना ओसाड वाडा

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 03/01/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वाड्याच्या आठवणीची कविता तुटलेल्या दिंडीमधुनी अवचित आत मी येते चाफ्याच्या सोनफुलांचे आठवून सुगंधी नाते भिंत जरी खचलेली ती गवत पांघरुन बोले लखलखत्या आठवणींचे अवशेष मोहरून आले आठवे देवघर इथले श्रध्देच्या सांज सकाळी फिरतात आता बेताल मुंग्यांच्या काळ्या ओळी अल्लड अंगणामधला प्राजक्त फुलांचा भार शिडकाव्यामधुनी ठेवे अंगणावर अधिकार आटला अभागी आड डोळ्यात साचले पाणी ह्या लगबग काठावरती मी कितीक गाईली गाणी परतूनी निघाले जेव्हा तोडून भरजरी धागे दिंडीच्या दरवाज्यातून हे कोण खेचते मागे ?

मी आलो.

लेखक रेझर रेमॉन यांनी शुक्रवार, 02/01/2009 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी आलो आणि नवी पृथ्वी, माझ्या पायी पसरली. मी आलो आणि नवा स्वर्ग माझ्या शीरी उतरला मी या पृथ्वीवर आलो आणि हा माझ्यासाठी शांत निवारा ठरला हे ग्रह-तार्‍यांच्या देवतांनो.... हा राजा तुम्हाला नम्रपणे आपल्या हॄदयाचा नजराणा अर्पण करतोय.

दिव्याभोवती अंधार (गीतांजली - अनुवाद)

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 29/12/2008 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधल्या मला आवडणार्‍या एका कवितेचा स्वैर अनुवाद करत आहे. कवितेचे नाव मला माहित नाही. बहुधा कवितेला स्वतंत्र नावंच नसावे.
Taxonomy upgrade extras

एक द्वाडीक कविता

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/12/2008 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही सदरा मळवला असं पोर्‍यानी सांगावे. आम्ही साबु घेउन यावं तुम्ही उगा चेकाळावे. हे असं काय होतं बुवा ?....... तुम्ही उगा चेकाळावे त्यात साबणं नासावे. आणि करुन फेस सारा आख्खे घर पाणी पाणी अशी दुपार कशी जावी.... तुम्ही जोर बोंबलावं सारी झोप खोबरी तुम्ही लाथा झाडाव्या आम्ही उसण धरावी. कशी जीवघेणी अदा..... आम्ही लपत छपत तुमची पाठ सोलावी तुम्ही ओढत पदर आणिबाणी जाहीर करावी. कस्सा जीव कातावला...... ( संदर्भ : रामदासांची एक लाडीक कविता http://misalpav.com/node/5271 )
Taxonomy upgrade extras

पाणि

लेखक मॅन्ड्रेक यांनी शनिवार, 27/12/2008 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाणि प्रसंगी डोळ्यातून येतं, काळजाचं होतं, अंगातही असतं, आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं! तेवढंच पुरत असतं तर , किती बरं झालं असतं! -vinya pandit.
Taxonomy upgrade extras

मी शतजन्म घेतले

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/12/2008 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी शतजन्म घेतले मिस्किल हास्यावर तुझ्या ,मी फिदा जाहले, ते बोलणे ऎकता ,कसे रे मंत्रमुघ्ध झाले तुझ्या प्रेमात साजणा ,मी वाहुन गेले तुझ्यासाठीच साजणा ,मी शतजन्म घेतले स्वप्नात रोज माझ्या ,कोण भेटुन गेले? कोण अशी वेडी ,चुट्पुट लावुन गेले.. अधरावर कोण ,प्रेमगीत लिहुन गेले? ते गुणगुण्या साठीच, मी शतजन्म घेतेलेले स्मरता आपली भेट, अंग अजुनहि शहारलेले, मीळता नजरेस नजर, श्वास माझे थांबलेले सुर बासरीचे तुझ्या,मनांत माझ्या रेंगाळलेले ते ऎकण्या साठी साजणा,मी शतजन्म घेतेलेले आठवणींचे देहात, लक्ष सागर उसळले आठवता छबि तुझी, नाजुक तनु उन्मळे कुठे शोधु तुला,मीच तुझ्यात हरवले शोधण्यास रे मी शत जन्म घेतलेले
Taxonomy upgrade extras