Skip to main content

कविता

शोध

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 15/01/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
शोध बांधलेला आहे गुलाम अवघा समाज त्यांच्या कासरा नसलेल्या दावणीला, रक्ताचे पाट वाहत आहेत डोळ्यातुन पण त्याचा पत्ता लागत नाही पापणीला ! छप्पर उडुन गेल्यावर आधार देणारे स्तंभ कोसळुन पड्तील जमीन मात्र तीच राहील फक्त नात्याचे संदर्भ बदलुन जातील ! प्रुथ्वी पुन्हा फिरत राहील घड्याळाच्या काट्यासारखी अनन्त कालापर्यंत आणी माणुस हातात अण्वस्त्र घेउन फिरत राहील हरवून गेलेल्या माणुसकीचा ! अनिरुद्ध>
Taxonomy upgrade extras

बाला,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 15/01/2009 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
तू मुसमुसलेली, षोड्शा,सुंदर बाला, घातला नजरेन,तू,ह्रुदयावर की घाला. नजर धारधार, यौवनाचा कहर, तू तिलोत्तमा नि रतीहुन भासे सुंदर. साडीत लपेट्ले,गोरे कोवळे तन, काचोळीत बांधले, खट्याळ ते यौवन यौवन गंध दरवळे अवती भवती, उन्मादक नजर आग भडकवे वरती. तो मुखडा सुंदर,गोजिरा अन लाजरा ते नयन चेट्की, त्यावर पापण्यांचा पहारा. ओठांची महीरप,करे मम मनांस दंग आत असे दंतपंक्ती कि शुभ्र मोत्याची रांग. तू मधु शर्वरी, चांदणी तु शुक्राची सुंदर चाफेकळी तू, कळी लावण्याची, उतरली भू तळी रंभा की अप्सरा वळती तुझकडे वारंवार की नजरा. काय करावी शायरी तव रुपावर शब्दांचा खजीना,अपुरा वाटे खरोखर कीती करु गोळा मी शब्दांचे हे क

खाज!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/01/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
'माज!' वाचल्यावर 'खाज' सुटली नाही तर रंग्या कसला? तेव्हा सादर आहे .. कालचा 'गजकर्ण' थोडा आज आहे , आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कोणत्या वैद्याकडे मी जात नाही, आपल्या वैदूगिरीचा माज आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कालच्या 'पेल्यातले' तात्पर्य थोडे, अन उद्याचा 'बेवडा' अंदाज आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ घोरण्याचा ध्यासही आहे कधीचा, अंगणातच घोंगडी अन 'बाज' आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ तोंड मी कोठे कधी लपवू पाहातो ना जनाची वा मनाची 'लाज' आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे चतुरंग
Taxonomy upgrade extras

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी बुधवार, 14/01/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक ढकल पत्रा द्वारे आलेलि कविता मजकूर काढून टाकला आहे, क्षमस्व! कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती.. -- मुख्य प्रशासकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.
Taxonomy upgrade extras

संक्रांती

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 14/01/2009 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
पुरे जाहले "केश्या" मेल्या सोड अता ही निवृत्ती तुला न जमणे गप्प बैसणे ही न तुझी रे प्रवृत्ती तू गेल्यावर 'ब्याद टळाली' कुजबुजले हे जालकवी तू गेल्यावर आणि निघाल्या तुझ्या किती या आवृत्ती 'कट्टे' झाले, 'हल्ले' झाले, नि झाले 'नेहरू' 'गांधी' 'शिल्पे' झाली, 'चर्चा' झाल्या आणिक जळजळ 'भटकंती' कौल लावले कुणी फुकाचे, चित्रे संगणकी कोणी बक्कळ झाली भाषांतरे , अन प्राण्यांच्या पाककृती परीक्षणे आली शिणमांची, अन पडली व्यक्तिचित्रे दिसू लागल्या 'अर्ध्या चड्ड्या' अन 'स्वेटर' अवतीभवती जुनी स्थळे नि नवीन खोड्या, अजीर्ण झाले 'विषया'चे लैंगिकता अन समोपदेशन, वाचून झाली गुंगमती येतो आम्ही घडीभर

ती संध्याकाळ

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 13/01/2009 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
तु बोललीस ते मी ऐकले नाही मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही जरूर नव्हतीच तेंव्हा त्याची शब्द मुके झाले होते हातात हात तुझा घेता स्पर्ष भाषा उमगले होते ती संध्याकाळ थोडी आगळीच होती प्रकाश रंगांची सुगंधी उधळण वेगळीच होती असतो मी एकटाच जेंव्हा ते सारे गूज आठवते तेंव्हा तो सोन प्रकाश धावून येतो रंगांची ती पखरण पुन्हा सवे घेऊन येतो मी मोहोरतो , बावरतो तू नाहीस म्हणून कावरा बावरा ही होतो. मग काय अचानक जादू होते; मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते मी माझीच बोटे चुंबतो डोळे मिटुनी तुला अनुभवतो

कवी नडू पाही...

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 13/01/2009 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
'हंस उडू पाही...' हे काव्य वाचून आमच्या कल्पनेचा हंस विडंबनप्रांती उडू लागला! ;) 'रंग्या'चा पहारा विडंबनी कायदे कवी नडू पाही अवघड इरादे! असे कसे शब्द? अर्थ कुणीकडे? कल्पनेपल्याड झेपावती वेडे ओळी सैरभैर, बाभळीचे काटे धिटाईने लिही कुणी एकटे एकटे लावले कुलुप, बंद केली दारे असल्या कविता कशाला करा रे! चतुरंग
Taxonomy upgrade extras

बर्फ जादाचा जणू...

लेखक केसुरंगा यांनी मंगळवार, 13/01/2009 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्याचे 'स्वप्न एखादे जणू...' वाचताना आम्हाला सत्याची जाणीव झाली! ;) चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले टेबलाला धडकुनी पडलो कितींदा मी जरी भंगले नाही तरी प्याले कधी हातातले घेतली काढून त्यांनी बाटली हातातली वाटले मी टुन्न झालो; ग्लास सारे तोडले दोष हा माझा कसा? जर पाजले त्यांनी मला मीच हवर्‍यासारखे प्याले 'विरोधी' ढोसले? मी किती ठोठावले पण दार ती उघडेच ना का असे अमुचे कलत्र आज ही रागावले? हाय!
Taxonomy upgrade extras

हंस उडू पाही...

लेखक नीधप यांनी सोमवार, 12/01/2009 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे हंस उडू पाही अवघड इरादे अशी दरी खोल असे उंच कडे आभाळापल्याड झेपावती झाडे वारा सैरभैर, वेडी लाट फुटे धिटाईने घुसे कुणी एकटे एकटे लावले कुलुप, बंद केली दारे आतला हुंकार तरीही थरारे
Taxonomy upgrade extras

रिक्त

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 11/01/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
रिक्त ========================= . . काही शब्द.. नुसते, आतल्या आत उकळत राहतात.. उतूच जात नाहीत. रटरटत्या पाण्यासारखे.. नुसती वाफ होत राहते.. साठलेल्या भावांची.. चरचरत.. शेवटचा थेंब उडून जाई पर्यंत. पात्राला फक्त जाणवत राहत.. रिक्त होण्या आधीच.. वाफाळ रटरटणं..! . . ========================= स्वाती फडणीस ..... ११-०१-२००९
Taxonomy upgrade extras