Skip to main content

कविता

यशदा

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 11/01/2009 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
यशदा ============================ . . ती म्हणाली.. मी समर्पित आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांसकट. इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही. . ती म्हणाली.. मी सुखात आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांशिवाय. इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही. . ती म्हणाली.. मी यशदा आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. आणि माझ्या स्वप्नांची. इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही. . . ============================ स्वाती फडणीस ............................ १०-०१-२००९

कलाकार

लेखक पंचम यांनी रविवार, 11/01/2009 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
कलाकार
मला कोण म्हणून विचारतात ते, मी एक कलाकार आहे.. तुमच्यातलाच एक चेहरा, तुमच्यातलाच एक विचार आहे; सर्व बंध तोडून मी, झेप घेतो आकाशात.. उरुन राहतो कोठेतरी, तुमच्या ओझरत्या स्पर्शात; मी स्वर आहे भैरवीचा, कधी मल्हाराची तान.. कधी भिजरी पायवाट, कधी रखरखणारे रान; मी स्पर्श आहे, मी भाव आहे.. मी तुमच्याच ओळ्खीचे, अनोळखी नाव आहे; मी एक रंग आहे, कधी तुम्हीच रंगविलेला.. रंगमंचाच्या शुभ्रपटावर, मुक्त उधळलेला; होउनी सात रंग, स्वतःला सांधतो
Taxonomy upgrade extras

हे असं चालू शकेल?

लेखक अनंत छंदी यांनी शुक्रवार, 09/01/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
फराजची एक लोकप्रिय गझल आहे, मेहदी हसन यांनी गायिलेली शोला था जल बुझा हूं, हवाएं मुझे न दो मै कबका जा चुका हूं, सदाएं मुझे न दो. या ओळींचा स्वैर अनुवाद अंगार होतो मी, आहे विझून गेलो घालू नका मजला, फुंकर तुम्ही लोकहो पैलतिरावरी त्या, मी आहे निघून गेलो हाकारीता कशाला, आता तुम्ही लोकहो असा केला तर तो चालू शकेल का? जाणकारांनी कृपया अभिप्राय द्यावा
Taxonomy upgrade extras

'सत्य म'ला उमगले!

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 09/01/2009 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
'सत्य म'ला उमगले आणि फुटला भ्रमाचा फुगा किती मिरवला आयटीचा रंगीत पण आखूड झगा कोटीच्या कोटी उड्डाणे उगीच दाखविली जगा सत्य कळले तेव्हा सत्य सगळ्यांना डसले बघा रिसेशनने धरलाय सगळ्यांच्या धोतराचा सोगा ई एम आय चे आकडे करतायत मेंदूमध्ये योगा नशीब पेपर सेट करतयं, म्हणतयं "आता भोगा" आऊट ऑफ सिलॅबस आहे पेपर, नशीबच देतयं दगा आयपॉड आणि आयफोन चा 'आय'शप्पथ क्षीण झाला दंगा पिझ्झा?
Taxonomy upgrade extras

मॅट्रिक्स...[Matrix]

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 09/01/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
मॅट्रिक्स...[Matrix] तु एक चैतन्यमय,अथांग मन,ना आदि ना अंत, तु स्वयंभु उर्जा स्रोत,मनात तुझ्या विचार अनंत अनंत कोटी ब्रह्मांडाची रचना करतो,लागे क्षणाचाच वेळ निर्मीति करणे अन,लय करणे,हा तुझा आवडता खेळ अतर्क्य,अगम्य,गुढ चमत्कारीक स्वभाव तुझा,न लागे मेळ, ब्रह्मांडा तल्या उलटा पालटी म्हणजे ,सारे तुझ्या मनांतले खेळ. मनातच निर्माण केले हे ब्रह्मांड तु,मधे पडदा टाकला Matrix चा, मायेचा दिले आव्हान आम्हाला, शोध मला,माझे अस्तित्व,खेळ तुझा, डोक्याबाहेरचा. तुझ्या Matrix मायेची जादु अशी, सारे आज्ञानी "ज्ञानी" झाले मीथ्या जग सत्य समजु लागले,आणि तुला मिथ्या ठरवण्यास पुढे सरसावले. जिथे हरते बुध्धी,ज्ञान

मी अगदी मजेत आहे

लेखक मोगॅम्बो यांनी गुरुवार, 08/01/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
(हा एका इंग्रजी कवितेचा अनुवाद आहे. मूळ कवी कोण ते मला माहीत नाही. कविता कधी आणि कुठे वाचली ते सुद्धा आठवत नाही. पण आवडली म्हणून लगेच अनुवाद करून ठेवला होता. तो आज तुमच्यासाठी प्रसिद्ध करतोय.
Taxonomy upgrade extras

एक दिवस

लेखक ज्ञानदा कुलकर्णी यांनी बुधवार, 07/01/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस आयुष्यातील एक दिवस ... जगु दया मला माझ्यासाठी ... तो दिवस राखून ठेवलाय मी माझ्या यशाचा आनंद लुटन्यासाठी तो दिवस राखून ठेवलाय मी माझ्या अपयशाला चुचकारण्यासाठी मी असेन फक्त एकटी फक्त एकाच दिवसासाठी दुसरे कोणीही नसेल सोबत 'तो' दिवस उपभोगान्यासाठी इच्छा नाही मला त्या दिवशी काहीही करण्याची इतरांसाठी इच्छा नाही मला share करण्याची ते क्षण कोणाही सोबत जे मी lock केले असतील माझ्यासाठी पण आता नाही वाट पहायची मला त्या दिवसाची आता प्रत्येक क्षण जगायचा आहे मला फ़क्त अणि फ़क्त माझ्यासाठी --ज्ञानदा कुलकर्णी

तिचा मोकळा वावर

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 07/01/2009 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा मोकळा वावर तिचा मोकळा वावर माझ्या अवती भवती माझ्या रोमरोमातून तिचे रोज येणे जाणे माझ्या ह्रद्यी रहाणे कशी जाइल ती दूर तिचा मोकळा वावर तिची रुणूझुणू चाल पायी कळ्या होती फुलं गंध फुलत्या फुलांचा दाटे तिच्या सभोवार तिचा मोकळा वावर तिच्या जीवघेण्या अदा सारे जग होइ फीदा परि माझीच ती सदा माझ्या डोळ्याची झालर तिचा मोकळा वावर तिचे बोलणारे डोळे जणू चांदणे कोवळे त्या डोळ्यांमध्ये खेळे माझ्या प्रेमाची पाखंर तिचा मोकळा वावर तिचे माझे एक होणे नभ धरती मिळणे माझ्या मनातिल गाणे येइ तिच्या ओठावर तिचा मोकळा वावर अशी तीची माझी साथ किती युगांच हे नात माझे ह्रद्य छेडते
Taxonomy upgrade extras