मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिचा मोकळा वावर

पुष्कराज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तिचा मोकळा वावर तिचा मोकळा वावर माझ्या अवती भवती माझ्या रोमरोमातून तिचे रोज येणे जाणे माझ्या ह्रद्यी रहाणे कशी जाइल ती दूर तिचा मोकळा वावर तिची रुणूझुणू चाल पायी कळ्या होती फुलं गंध फुलत्या फुलांचा दाटे तिच्या सभोवार तिचा मोकळा वावर तिच्या जीवघेण्या अदा सारे जग होइ फीदा परि माझीच ती सदा माझ्या डोळ्याची झालर तिचा मोकळा वावर तिचे बोलणारे डोळे जणू चांदणे कोवळे त्या डोळ्यांमध्ये खेळे माझ्या प्रेमाची पाखंर तिचा मोकळा वावर तिचे माझे एक होणे नभ धरती मिळणे माझ्या मनातिल गाणे येइ तिच्या ओठावर तिचा मोकळा वावर अशी तीची माझी साथ किती युगांच हे नात माझे ह्रद्य छेडते तिच्या ह्रद्यी सतार तिचा मोकळा वावर

वाचने 1338 वाचनखूण प्रतिक्रिया 2

झेल्या 07/01/2009 - 17:55
तिचे माझे एक होणे नभ धरती मिळणे ऐवजी तिचे माझे एक होणे नभ धरेसी मिळणे कसे आहे? इतर कडव्यांमध्ये वावर शी यमक साधले आहे.. पहिल्याच कडव्यात का नाही? कविता ठीकठाक. (...शुद्धलेखन...?!) -झेल्या काय वाट्टेल ते...! विसंगतींचे संदर्भ...!