मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कलाकार

पंचम · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कलाकार
मला कोण म्हणून विचारतात ते, मी एक कलाकार आहे.. तुमच्यातलाच एक चेहरा, तुमच्यातलाच एक विचार आहे; सर्व बंध तोडून मी, झेप घेतो आकाशात.. उरुन राहतो कोठेतरी, तुमच्या ओझरत्या स्पर्शात; मी स्वर आहे भैरवीचा, कधी मल्हाराची तान.. कधी भिजरी पायवाट, कधी रखरखणारे रान; मी स्पर्श आहे, मी भाव आहे.. मी तुमच्याच ओळ्खीचे, अनोळखी नाव आहे; मी एक रंग आहे, कधी तुम्हीच रंगविलेला.. रंगमंचाच्या शुभ्रपटावर, मुक्त उधळलेला; होउनी सात रंग, स्वतःला सांधतो मी.. कधी होउनी इंद्रधनुष्य, सात रंगात वाहतो मी;
-पंचम

वाचने 1441 वाचनखूण प्रतिक्रिया 3

sanjubaba 12/01/2009 - 14:11
मी स्पर्श आहे, मी भाव आहे.. मी तुमच्याच ओळ्खीचे, अनोळखी नाव आहे; पंचम खरच, छान ओळि......