'सत्य म'ला उमगले आणि फुटला भ्रमाचा फुगा
किती मिरवला आयटीचा रंगीत पण आखूड झगा
कोटीच्या कोटी उड्डाणे उगीच दाखविली जगा
सत्य कळले तेव्हा सत्य सगळ्यांना डसले बघा
रिसेशनने धरलाय सगळ्यांच्या धोतराचा सोगा
ई एम आय चे आकडे करतायत मेंदूमध्ये योगा
नशीब पेपर सेट करतयं, म्हणतयं "आता भोगा"
आऊट ऑफ सिलॅबस आहे पेपर, नशीबच देतयं दगा
आयपॉड आणि आयफोन चा 'आय'शप्पथ क्षीण झाला दंगा
पिझ्झा? अरे 'हट!', पोटापोटात घाली आता थालपीठ पिंगा
पॉलीस्यांचे पट्टे बांधून कंपन्या म्हणतायत "कुत्र्यासारखं जगा"
नुसतं हुंगायला देखील आता कुठेच शिल्लक नाही जागा
एंट्री करा, 'घाईत' असतांना मी, गुरगुरला गार्ड मघा
कडक पॉलीस्यांचा असा चालला आहे नाच आसुरी नंगा
लेऑफची भीती जणू सांगतेय की आता उकीरडे हुंगा
छोड ना यार टेंशन, डरना कायकू, जो होंगा सो होंगा!!
--समीर
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4046
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
व्वा |
सही....
छानच!
मस्त
रिसेशनने
व्वा ! मस्तच जमली कवीता !
सत्य "म"ला उमजले
धन्यवाद!
+१
वा समीरशेट!
लै भारी
एकदम चपखल
मस्तच..
मनापासून धन्यवाद!
१००%
In reply to मनापासून धन्यवाद! by समीरसूर
हाहा...
नाय ओ , आधीच
In reply to हाहा... by समीरसूर
मात्र