कीव करा त्या देशाची, जो तुकड्या तुकड्यात वाटला गेलाय आणि प्रत्येक तुकडा स्वत:ला एक स्वतंत्र देश समजतोय.
कीव करा त्या देशाची, जो धटिंगणाला आपला हीरो समजतो आणि त्याचीच संपत्ती लुटून त्याच्यावरच चार तुकड्यांची खैरात फेकणा-या आक्रमकाला दानशूर मानतो.
कीव करा त्या देशाची, ज्याचे मुत्सद्दी हे कोल्हे आहेत, तत्वचिंतक हे हातचलाखीचा खेळ करणारे मदारी (juggler) आहेत आणि ठिगळे लावून जोडजाड करणे व पोपटपंची करणे ही ज्या देशाची कला आहे.
कीव करा त्या देशाची, जो उगवत्या नेत्याचे तुता-या वाजवून स्वागत करतो. त्याच नेत्याला निरोप देण्याची वेळ येते तेंव्हा त्याची हुर्रेवडी उडवतो आणि पुन्हा आणखी एका नव्या नेत्याच्या स्वागताच्या तुता-या वाजवतो.
कीव करा त्या देशाची, जो ती वस्त्रे वापरतो जी त्याने विणली नाहीत, ती भाकरी खातो जी त्याने पिकवली नाही आणि ती मदिरा प्राशन करतो जी त्याच्या वायनरीत वाहिली नाही.
कीव करा त्या देशाची, जो स्वप्नात ज्या गोष्टीचा अत्यंत तिटकारा करतो, जागेपणी त्याच गोष्टीच्या आधीन होतो.
कीव करा त्या देशाची, जो (प्रेतयात्रेचा अपवाद वगळता) कोणत्याच गोष्टीविरुद्ध कधीच आवाज उठवत नाही; फक्त आपल्या इतिहासाबद्दलच तोंड भरभरून डरकाळ्या फोडतो आणि जेव्हा त्याच्या मानेला तलवार टेकते तेंव्हाच बंड करून उठतो.
कीव करा त्या देशाची, ज्या देशातील महात्मे वर्षानुवर्षे तोंडात मिठाची गुळणी धरून बसतात आणि ज्या देशातील योद्धे अद्याप पाळण्यातच असतात.
कीव करा त्या देशाची, जो फक्त अंधश्रद्धांनी भरलेला आहे आणि ज्याचा धर्म पोकळ आहे.
खलील जिब्रान (जन्म - ६ जाने १८८३, मृत्यू - १० एप्रिल १९३१)
वाचने
3032
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाटते तसेच
थोडेसे वाटते पण
कोणत्याही
हे वर्णन
धी प्रोफेट