Skip to main content

सुख पुढे वाटे....

लेखक संध्यानंदन यांनी मंगळवार, 10/02/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
फुले चिखलात कमळ नाजुक सुंदर, काटेरी फणसात गरे रसाळ मधुर, दगडधोंडयातून वाहे ठंडगार झरा, ऊस असे कठीन पण रस वाटे बरा, झाड उभे उन्हात पण सावली का गार ? प्रकाशमय सूर्यास जन्म देई अंधार, घाव घातल्यावर दगडावर देव प्रगटतो, भाजल्यावर माठ गार पाणी देतो कोळसाच्या खाणीत मीळतात हीरे, कोशातली अळी फुलपाखरु बनून फिरे, गुलबासंगे असतात काटे, काट्यातून चालल्यास हिरवळ पुढे भेटे, दु:खातून गेल्यास सुख पुढे वाटे!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1035
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया