Skip to main content

कविता

(पाहिजे वीकांत मोठा)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे वीकांत मोठा पाहिजे सोडा, टकीला पाहिजे वोडका थोडी पाहिजे पोकर, पसारा होउ दे मग रात्र कितिहि डाव हा खेळून जाउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ मिटुनि तू डोळे तुझे रे पापडी भरपूर खाशी सोबतीला श्रिम्प थोडे तू बशा घेऊन बससी छेडुनी कोणा सखीला हास्यकल्लोळात बुडवु विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ तृप्तता नरड्यात थोडी तृप्तता लीवर् मधेही शांतता विश्वात सार्‍या शांतता खोलीमधेही सटकताना रामप्रहरी काहिशी चलबिचल व्हावी झोपलेल्या बांधवांची थोडिशी चुळबूळ व्हावी सोमवारी ब्याद परते शुक्रवारी चाट देउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रवि

प्रवास

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 06/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास मन भिजवून गेल्या कोवळ्या स्मृतींच्या लाटा अजूनही चालते मी पूर्वसंचिताच्या वाटा रित्या आयुष्यासारखी वठलेली झाडे कुठे, कुठे पळसफुलांनी सजलेल्या रानवाटा कधी चालता चालता अडखळती पाउले, कधी मन ठेचाळते, सलतो उरात काटा किती वळणे घेऊन जाऊ किती मी दुरून? तुझ्या घराकडे जाती ओळखीच्या सा-या वाटा वेड्या मना, अविचारी, उतावीळ होऊ नको, तुझ्या क्षणिक मोहाचा उगा होईल बोभाटा नाही ठाव किना-याचा, असा प्रवास हा माझा, शीड फाटलेली नाव आणि भरतीच्या लाटा क्रान्ति
Taxonomy upgrade extras

पाहिजे एकांत थोडा--

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 06/03/2009 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे एकांत थोडा पाहिजे थोडा अबोला पाहिजे पहाट थोडी पाहिजे निशब्द वारा होउनी मग एक तेव्हा अंतरी मिसळून जाउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ मिटूनी तू डोळे तुझे ग काहीशी हरवून जासी स्पर्शता लाभे दिलासा तू मला बिलगून जासी छेडूनी तारा मनाच्या शब्द तू मी सुर होउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ त्रुप्ताता ह्रद्यात दोन्ही त्रुप्ताता देहात ही त्रुप्ताता विश्वास सार्‍या त्रुप्ताता श्वासास ही संपता पहाट थोडी काहीशी हुरहुर व्हावी धुसरत्या तारकांना भेटीचे संकेत देउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ -पुष्कराज
Taxonomy upgrade extras

कंपूबाजी

लेखक घाटावरचे भट यांनी शुक्रवार, 06/03/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

बोल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 06/03/2009 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच का रे कळत नाही तुला प्रेमातल ? नेहमीच ते पुस्तकात नाक खुपसून बसायच ! डोळ्यांत उतरवायची ती दुसर्‍यांची आत्मचरित्र नी कथा जाणशील तरी कधी तू माझ्या मनातली व्यथा ? मला म्हणे रोमॅन्टीक बोलता येत नाही रोजच्या वाचनात एक वाक्य पण येत नाही ? पुस्तकांतल्या कथांमध्ये कोणी प्रेमच करत नाही ? म्हणे बोलायला कशाला हव ? समजायच असत ते ! काय समजू मी की तुझ प्रेम मुक आहे ? चंद्र तारे तोडायच नको बोलू ते सर्व काल्पनीक आहे पण माझे तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य काय अवघड आहे ?
Taxonomy upgrade extras

एखादा दिवस

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 05/03/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
(|: एखादा दिवस एखादा दिवस असा रेंगाळतो, एकेक क्षण युगासारखा नुसते नगारे वाजवणा-या कोरड्या पोकळ ढगासारखा सकाळ सरता सरत नाही; विस्कटलेले किरण सांडून सुस्तावलेला सूर्यही दिसतो उनाड, हट्टी मुलासारखा कंटाळवाणी दुपार पसरते, कातावलेली नागीण जशी दिवस बिचारा वाट चुकलेल्या, भांबावलेल्या पिलासारखा संध्याकाळचा तोच पसारा; धूसर, धुरकट रंग उधळून भरकटलेला वारा फिरतो ओढाळ, नाठाळ गुरासारखा रात्रही तशीच मरगळलेली; पेंगुळलेल्या मंद चांदण्या धुक्यात गुरफटलेला चंद्र कोमेजलेल्या फुलासारखा पुन्हा उद्याची वाट पहाणारा एकेक क्षण युगासारखा परीकथेतील राजकन्येच्या स्वप्नामधल्या जगासारखा क्रान्ति
Taxonomy upgrade extras

ती पहाट

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 05/03/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
ती देखणी पहाट हासुनी हळूच गाली फुलवीत पाकळ्यांना वार्‍यासवे निघाली दंवबिंदूचे तुषार उधळीत आसमंती थरकून पैंजणाना जणू चालते रति ती रक्तिम ओठ हसरे दिसताच पाखरांना घुमवीत शीळ निघती नादावूनी स्वरांना लयदार चाल बघुनी तिजला फुले म्हणाली घेऊनी गंध वारा कोठे गडे निघाली ? लाजूनी ती पहाट त्यांना हळूच सांगे दिवसाशी घेत असते जुळवून प्रेम धागे
Taxonomy upgrade extras

बाकी ते रुसणेच खरे....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/03/2009 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे ते लाजणे गालात आठविता गं रात्र सरे शब्द ओलावणे ओठात स्मरण्यां दिवस ना पुरे तु नसशी कवेत आता बघ अशांत मन झुरे बांध वेदनांचा तुटेना शुष्क डोळ्यांत स्वप्न तरे मन विसरु पाही तुला मज सुन्न एकांत सावरे पुन्हा डोकावणे स्वप्नात जखमांचे ते भान ना उरे अन थांबलेले डोळ्यात आसवांचे वाहते झरे लटके ओशाळणे तुझे बाकी ते रुसणेच खरे विशाल कुलकर्णी

खेळ दोन ओळींचा - ४

लेखक राघव यांनी गुरुवार, 05/03/2009 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच. फक्त यावेळेस दुसरी ओळ दिलेली आहे अन् पहिली जमवायची आहे! ..... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या ओळीशी निगडीत अशीच पहिली ओळ असायला हवी! शुभेच्छा!! मुमुक्षु

तुझे आगमन

लेखक जागु यांनी गुरुवार, 05/03/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज तु जेंव्हा येशील सुर्य तुला लाजलेला असेल चंद्र खट्याळ तुला डोकावत असेल चांदण्या लागतील कुजबुज करु दवबिंदुंची पाझर होईल सुरु रातराणी लागेल सुगंध पसरवू वार्‍याची झुळूक देईल चाहुल तुझ्या आगमनाची पाहुन तुला मी होईन बावरी राधा झाली होती जशी कृष्णासाठी तु शोधशील माझ्या नजरेतील प्रिती ठेवील गुपित नजर माझी झुकली गारवा करेल आतुर तुला स्पर्शासाठी मीही असेन बेफान तुझ्या अंधारी गाढ मिठीसाठी.
Taxonomy upgrade extras