लेखकचतुरंगयांनी बुधवार, 04/03/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा मागल्यासारखंच! हे रामदास काही उ(हु)च्च लिहून जातात आणि आमचा धर्म आम्हाला सोडवत नाही हो! त्यांची 'गाण्याची शिकवणी' वाचली आणी आमच्या वेगळ्याच शिकवणीचे तास डोळ्यांसमोर येऊन गेले!
लेखकपुष्कराजयांनी बुधवार, 04/03/2009 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
सहज भेट्ली वाटेवर ती
बर्याच दिवसानंतर
ओळ्ख पटुनी गाली
बर्याच दिवसानंतर
रंग रेशमी उधळून आले
नभात दाटे लाली
क्षीतिजावरचे मुग्ध चांदणे
फुलुनी आले गाली
आनंदघन संध्या झाली
बर्याच दिवसानंतर
सहज भेट्ली वाटेवर ती
बर्याच दिवसानंतर
उपचाराच्या मोडूनी सीमा
हाती घेतला हात
वळ्णावरती अवघड वेड्या
सहज देशील साथ?
गडबडली आणि लाजली
मान घातली खाली
त्या मौनाचा अर्थ सांगण्या
कोकीळ धाउन आली
आनंदाची उधळ्ण झाली
बर्याच दिवसानंतर
सहज भेट्ली वाटेवर ती
बर्याच दिवसानंतर
लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी बुधवार, 04/03/2009 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी आज्ञा केली
म्हणुन फुले उमलत नाहीत
कोणी आदेश दिला
म्हणुन पक्षी गात नाहीत
तो असतो स्रुष्टीने सुर्याला दिलेला प्रतिसाद
क्रुतज्ञतेचा.....!
मला वाटते हीच खरी सुर्याची प्रार्थना
बाकी सगळ्या पोकळ शाब्दिक वल्गना...!!
लेखकबेसनलाडूयांनी बुधवार, 04/03/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली
आताच अमुच्या जेवणाची
आता कुठे सुरवात झाली
बघुया चला - या फोडणीची
नुकतीच टेट्रापॅकमधुनी
डालड्याला जाग आली
पदरही खोचला हिने अन्
जिरे-मिरीची आग झाली
प्रियेस माझ्या आजतर मी
दगडफुले कित्येक वाहिली
हिंग कुटला मी असा की
धुंदी आजही राहीली
त्याच गंधाने अजुनी
जेवणाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
भूक बाकी - कहर आहे!
समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते :)
लेखकनाटक्यायांनी बुधवार, 04/03/2009 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कराज यांनी केलेल्या "रात्र थोडी जाहली पण" याचे विडंबन.
पुष्कराज: ह. घ्या.
कोण म्हणतो रात्र झाली
आत्ताच आमुच्या पिण्याची
आत्ता कुठे सुरवात झाली
फिरुनी पुन्हा या चाकण्याची
नुकतीच वाटी सारी सरुनी
चाकण्याला केळी आली
कहर पुन्हा झाला असा की
जेवण्याची वेळ झाली
दारूस माझ्या आजवरी मी
गाली कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या सूराचा
नशा आजही राहीली
त्याच नशेने अजुनी
पिण्याला बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
सोंगे बाकी फार आहे
- नाटक्या
गैरसमज नको माझ वय फक्त ८५ आहे
लेखकचतुरंगयांनी मंगळवार, 03/03/2009 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
परवा संध्याकाळपासून इथे बर्फवृष्टी सुरु होती काल संध्याकाळी संपली! मिसळपावावरही अशीच धमाल हास्यवृष्टी घडवून आणण्यात कमालीचा उ(हु)च्च सहभाग असलेल्या सगळ्या बिनीच्या कलावंतांना ही आरती समर्पित!
लेखकलिखाळयांनी मंगळवार, 03/03/2009 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे
अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर
उह आह
गजबजलेल्या दवाखान्यातली बेभान लगबग
अन फत्तरासारख्या काळजातले गोठलेले काहूर
होणार मूल होणार मूल
असतोच दडलेला काहिंच्या मनात
बाजेवर उफाळणारा गुलाबी प्रणयपूर
भरपूर भरपूर
--लिखाळ.
(प्रेरणा-शरदिनी यांची कविता पूल )
लेखकशरदिनीयांनी मंगळवार, 03/03/2009 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
उमलत जाणारे प्राक्तनाचे ओझे
तणावाच्या पसार्यात गरगरताना
कोणी धाडलंय तुला
कल्पनेपलिकडील जगातून
माझ्या विसविशीत देहसावलीवर
हळूवार फुंकर घालायला
पण चालेल,
काळजात रुतलेला तुझा तो स्पर्श
आणि ती क्षणभंगुर भीक पेलताना
वृथा वैफल्याचा चोरटा सूर...