Skip to main content

मी कोण ......

लेखक चिंतामणराव यांनी मंगळवार, 17/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मी कोण , कोण मज सांगा प्रतिमाच हरवली माझी वचनांत करुणता माझ्या शापांत क्रुरता माझी वर प्रवाह नक्रांश्रुंचा शुष्कता तळाशी माझी मोज्यांत नम्रतेच्या नखदर्प पाउले माझी मायेचा मुखवटा माझा मापतो हिंस्त्रता माझी बेगडी हास्य हे माझे झांकते खिन्नता माझी केवडा हळुच बाळगतो नागांची स्रुष्टी मुळांशी द्वंद्वात गुंगलो या शोधितो अस्मिता माझी मी कोण , कोण मज सांगा प्रतिमाच हरवली माझी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1261
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया