Skip to main content

सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया |

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 03/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया | अंतरीचा ठेवा | पाहसी ना || जगी या मांडल्या | सुखाचिया पेठा | सुख घेता ओठा | नष्ट शून्य || दया करोनिया | संते दिले गुज | रामनाम बीज | उच्चारी तू || नामे उद्धरिल्या | पापियांच्या व्यथा | तुझी काय कथा | सांगसी तू || सागर लहरी | अनंत उठती | शमवुनी चित्ती| शांत व्हावे || - सागरलहरी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1732
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वाहवा .... फारच मस्त.. सागरलहरीचे कडवे तर मस्तच ! जय जय रघुवीर समर्थ !! -- लिखाळ.

In reply to by चाणक्य

असेच म्हणतो --अवलिया

अतिशय सुंदर लिहिलेत! प्रचिती असेल अशीच तर क्या बात है!! :) येऊ देत अजून.. लिखाळरावांशी सहमत. मुमुक्षु

खूप छान! संत कवींची रचना वाटते आहे अगदी. क्रान्ति