रात्र थोडी जाहली पण--
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोण म्हणतो रात्र झाली
आत्ताच आमुच्या जीवनाची
आत्ता कुठे सुरवात झाली
फिरुनी पुन्हा या यौवनाची
नुकतीच साठी मागे सरुनी
यौवनाला जाग आली
बहर पुन्हा आला असा की
जीवनाची बाग झाली
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
वाचने
1901
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे =))
पण छान मांडलीये कविता ......:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
सुंदर आहे!
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
मस्तच ! :)
--(वय फक्त २७) दिपक
खूप आवडली...
आपल्या कवितेतून असेच आनंद देत राहा
.. धन्यवाद...
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
(गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे)
ते मुद्दाम सांगायची गरजच नाही!
ह. घ्या...
:)
कविता तर सुंदरच आहे.. पण डिस्क्लेमर एकदम छान आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मस्त कविता आहे.
क्रान्ति
सर्वांना धन्यवाद
गैरसमज नको