Skip to main content

खूण

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 28/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
जा सखे गं शोधुन ये मोहन मुरलीवाला, कुठे हरवला? ना कळे, ना क्षण उसंत जीवाला - १ काल रातीला भेट जाहली कालिंदिच्या तीरी, श्याम - सावळा समोर आणिक चुकार पावा करी - २ रात्रभर जागी होती चांदणवेडि चंद्रकला, जरा स्पर्शता तरंग उठले कालिंदिच्या गुढ जला - ३ स्पर्श असे कि मोरपिस जणु शरीरभर थरथरते, क्षितीजावरती शुक्र मनोहर रात्र अशीच सरते - ४ श्याम - सावळ्या मिठीत अवचित किनखापी जर खुपते कुणा न कळता ओठांवरची अजुन पण खूण जपते - ५ - सौरभ वैशंपायन.
लेखनविषय:

वाचने 1732
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

रात्रभर जागी होती चांदणवेडि चंद्रकला, जरा स्पर्शता तरंग उठले कालिंदिच्या गुढ जला - ३ अप्रतिम कल्पना.. मस्तच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अप्रतिम कविता !!